निर्यातक्षम डाळींबासाठी कीट नियंत्रण

निर्यातक्षम डाळींबासाठी कीट नियंत्रण

डाळींब लागवडीतील सुनामी आता ओसरू लागली आहे. हजारो हेक्टर वर डाळिंब लावून आपण अतिरेक केला होता. त्यानंतर अपेक्षाभंग व रोग-किडीमुळे बागा मोठ्या प्रमाणात मोडण्यातहि आल्या. काही शेतकरी बांधवांनी बागा तश्याच ठेवून त्याकडे फक्त दुर्लक्ष केले. पावसाळी वातावरणात या दुर्लक्षित बागेत किडींचे साम्राज्य पसरू शकते. जाणून घेवू निर्यातक्षम डाळींबासाठी कीट नियंत्रण. 

सुरसा अळी (विरचोला/ड्यूडोरिक्स आयसोक्रेट्स)

हि कीड डाळींबा व्यतिरिक्त, चिंच, पेरू, चिक्कू, आवळे व लिंबूवर्गीय, मुख्यत्वे पावसाळ्यात मृग बहारावरील, फळांवर आढळून येते. वरील फोटोत आपल्याला या किडीचे अंडे, अळी व पतंग दिसून येईल. अंड्यातून बाहेर आलेली अळी फळात प्रवेश करते व दाण्यांवर ताव मारते. पूर्ण वाढलेली अळी २ से. मी. पर्यंत असते. अळी पाठोपाठ त्या फळात बुरशी व जीवाणू वाढीस लागून फळ पूर्णपणे कुजून खराब होते. नियंत्रणासाठी फुलधारणेच्या काळापासून दर पंधरा दिवसाला ३ ग्राम प्रती लिटर च्या दराने कार्बारील ची फवारणी करावी. जर कीड शेतात पसरली असेल तर प्रभावित फळे गोळा करून नष्ट करावीत.

फवारण्या:

 • सायपरमेथ्रीन २५% इसी (Super fighter-IIL, Superkiller-Dhanuka, Auzar 25 EC-Biostadt, CYPERHIT-25-HPM, COLT-PII, Cyper 25-National, Whitegold-sumitomo, Python-Toshi, Smash-Biostadt)
  • १५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी १०० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०५ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो
 • स्पिनोसॅड ४५ % एस सी (One-up-Dhanuka, TAFFIN-TataRallis, Spintor-Bayer)
  • ७.५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी ५० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०२ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो
 • इंडोक्झाकर्ब १४.५ % एस सी (Avval-IIL, Amsac-Atul)
  • ७.५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी ३० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०२ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो

झाडांची साल खाणारी अळी

हि बहुभक्षी कीड असून डाळींबाव्यतिरिक्त करंज, लिंबू (वर्गीय), आंबा, काजू, पेरू, कधीपत्ता या झाडांवर दिसून येते. अळी खोड व फांद्याच्या बेचक्‍यात छिद्र पाडून राहते. अळीची विष्ठा तसेचभुसा जाळीच्या स्वरूपात प्रादुर्भाव झालेल्या भागावर लटकलेला दिसतो. नियंत्रणासाठी प्रभावित भागा स्वच्छ करावा. केरोसीनने थोडे घासून साफ करावे. केरोसिनमध्ये बुडवलेला कापूस छिद्रांमध्ये  घालावा व छिद्र मातीने बंद करावे. कार्बारील (२.५ ग्राम प्रती लिटर), क्विनालफॉस (2 मिली / लिटर) किंवा मेथोमील (3.5 ग्रॅम / लिटर) या पैकी एका कीटकनाशकाची फवाराणी करावी. 

राखाडी/पांढरी माशी

प्रौढ माशी टोकाकडील पानांच्या खालच्या बाजूला गोलाकार पद्धतीने किंवा झुपकेदार पद्धतीने अंडी देते. आठवडेभरत पिले बाहेर येतात व त्यांचे जबडे पानात घुसवून खवल्यासारखे, पानांचा रस शोषत पडून रहातात. मधासारखा द्रव श्रवतात. हा द्रव पाने व फळावर पसरतो. हवेतील आद्रतेमुळे त्यावर पांढरी बुरशी वाढते ज्यामुळे प्रकाशसंश्ल्रेशणात व श्वसनात अडथळे येतात. पांढऱ्या माशीच्या रसपानामुळे पाने पिवळी पडतात, वाढ थांबते. दुर्लक्ष केल्यास पाने झडू लागतात.

 

नियंत्रणासाठी बागेत भरपूर पिवळे व निळेचिकट सापळे लावावे (वरती ऑफर दिली आहे त्यावर क्लिक करून घरपोच मागवू शकतात). पानाच्या खालच्या बाजूला वेगाने पाणी फवारून मधुरस, अंडी, पिले, कोश व प्रौढ माशी वाहून घालवावी. 


मावा (ऍफिड्स)

ही कीड कोवळी पाने व फळातील रस शोषून घेते. हिरवा, पिवळा व करडा रंग असू असतो. या किडीतूनही चिकटा स्त्रवतो. या स्त्रावावर बुरशीची वाढ होते. पाने वेडीवाकडी होऊन फांद्यांची वाढ खुंटते. हवेतील आद्रता या किडीला अनुकूल असते. 

पिठ्या ढेकुण

प्रौढ मादी अंडाकृती आते व तिच्या सर्व शरीरावर मेणाचे तंतू असतात. पिले व प्रौढ पानांचा व कोवळ्या काड्यांचा रस शोषतात. विषाणू आल्या प्रमाणे पाने गोल गोल वळतात. किडीने स्त्रवलेल्या द्र्वावर काळी बुरशी वाढते. दुर्लक्ष झाल्यास फळगळ होऊ शकते. कीड मातीत अंडी देते. हि अंडी सुप्त अवस्थेत राहून पुढल्या बहरापर्यंत टिकून रहातात. वातावरण लाभले कि अंड्यातून पिले बाहेर येतात व पुन्हा प्रादुर्भाव करतात. पुन्हा येवू शकतात. नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धत वापरावी. आसपासच्या परिसरातील किडीला आश्रय देणारी जंगली झाडे नष्ट करावीत. खोडावर पाच सेंटीमीटरचा ग्रीस चा पट्टा लावावा जेणेकरून फिरते ढेकुण चढू शकणार नाही. रससोशणारया ढेकणा पेक्षा भटकणारया ढेकणावर फवारणीचा उपयोग चांगला होतो कारण त्यावर मेणाचे आवरण नसते त्यामुळे कीड त्या स्थितीत असतांना फवारणी करणे अधिक संयुक्तीक आहे. मृदेतील कीड नष्ट करण्यासाठी २० ग्राम प्रती झाड या दराने फोरेट द्यावे.

पांढरी माशी, मावा व पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी फवारण्या खालील प्रमाणे आहेत.

 • डायमेथोएट ३०% इसी (Rogorin-IIL, ROGOHIT-HPM, Tafgor-TataRallis)
  • १५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी १०० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०२ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी हवा
 • इमिडाकलोप्रीड १७.८ % एस एल (M-con & Imidacel-sumitomo, Tatamida-TataRallis, Vector-IIL, Ultimo-Biostadt, Imidagold-UPL, Media-Dhanuka, JUMBO-PII, Confidence 555-Crystal, Conimida-National, Cohigan-Adama, Lizard-Toshi, HI- IMIDA-HPM, Confidor-Bayer)
  • ४.५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी ६० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०५ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो
 • थायमेथोक्झाम २५% डब्ल्यू जी (Evident-Biostadt, Maxima-PII, ACtara-Syngenta, Rockstar-Hindustan)
  • ३.७५ ग्राम प्रती १५ लिटर च्या दराने, काढणीपुर्वी ९० दिवस फवारणी करू नये. निर्यातीसाठी अंश ०.०५ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी असावा लागतो

 

खवले कीड

फांद्यावर व फळावर पसरलेले काळे फुगीर डाग म्हणजे खवले कीड. प्रौढ व पिल्ले रसशोषण करतात ज्यामुळे नाजूक फांद्या कोरड्या पडतात. दुर्लक्ष झाले तर संपूर्ण झाड वाळते. हि कीड देखील रस स्त्रवते ज्यावर बुरशी वाढल्यामुळे पाने व फांद्या काळ्या पडतात. वाढ थांबते. नियंत्रणासाठी परिसरातील किडीला आश्रय देणारी जंगली झाडे काढून टाकावे. दर पंधरवड्याला डायमेथोएट ३०% इसी १५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने फवारणी करावी.  काढणीपुर्वी १०० दिवस फवारणी बंद करावी. निर्यातीसाठी अंश ०.०२ मिलीग्राम प्रती किलो पेक्षा कमी हवा

फळमाशी

पावसाळ्यात हल्ला करणारी हि प्रमुख कीड आहे. मादी फळाच्या आवरणाला छेडून त्याखाली अंडी देते. यातून बाहेर येणारी अळी फळाचे दाणे खाते. फळाची वाढ खुंटते व ते गळून पडतात. हि कीड ७० ते ९० टक्के नुकसान करू शकते. या किडीच्या नियंत्रणासाठी कोणतीही फवारणी उपयोगाची नसते. एकरी ८-१० मक्षिकारी सापळे लावावेत. 

 

आमच्या फेसबुक गृपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

 संदर्भ:

 • केंद्रीय कीटकनाशक बोर्ड
 • तामिळनाडू कृषी विद्यापीठ 
 • भा. कृ. अनु. प. राष्ट्रीय कृषीकीटक कोष केंद्र
 • विकीपेडीया
 • विकासपेडिया

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog