रब्बीतील बटाटे लागवड

रब्बीतील बटाटे लागवड

लागवड - १५ ऑक्‍टोबर नंतर, ३० नोव्हेंबर पूर्वी

मृदेची निवड - चांगल्या निचऱ्याची, भुसभुशीत, कसदार व चांगले सेंद्रिय घटक असणारी मध्यम प्रतीची, रेतीयुक्त पोयट्याची मृदा हवी. मृदेचा सामू 5 ते 6.5 च्या दरम्यान असायला हवा. त्यात गरजे नुसार एकरी २ ते ४ टन चांगले कुजलेले शेणखत, ३ किलो हुमणासूर, ३० किलो कंद स्पेशल ह्युमोल जी, २५ किलो कॅलनेट, १०० किलो युरिया, १५० किलो एस एस पी,  १०० किलो अमृत गोल्ड एस ओ पी, ५ किलो रीलीजर, एक मायक्रोकीट एकत्र करून मिसळावे. 

असे केल्याने मृदेत नत्र, स्पुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, लोह, मंगल, जस्त, बोरान हि दहा अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात पडतील. १० किलो कॅलनेट व १०० किलो युरिया हा वाढीव डोस लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसात द्यायचा आहे तो अगोदरच खरेदी करून ठेवावा. 

तयारी - गादी वाफा:  तीन फूट रुंद वाफे तयार करावे. त्यात दोन फूट अंतरावर बटाट्याच्या दोन ओळींत लागवड करावी.  दोन ओळींच्या मध्ये ठिबक सिंचनची एक नळी टाकावी

बेणे निवड - 30 ते 40 ग्रॅम वजनाचे, एकसारखे व निरोगी बेणे निवडावे. कार्बेन्डाझिम ५०% - 25 ग्रॅम आणि इमिडाक्‍लोप्रिड१७.८% - 4 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 मिनिटे बुडवावे. ह्युमोल जेली ची बेणे प्रक्रिया करावी. थंड, हवेशीर ठिकाणी पसरवून थोडे सुकवावे त्यानंतर लागवड करावी.

व्यवस्थापन - लागवडीनंतर त्वरित पहिले पाणी द्यावे. दुसरे पाणी लागवडीनंतर 4 ते 7 दिवसांनी द्यावे. 25 ते 30 दिवसांनी पहिली हलक्‍या प्रमाणात व दुसरी 45 ते 50 दिवसांनी माती लावावी. या वेळी उर्वरित नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. आवश्‍यकतेनुसार 3 ते 4 वेळा खुरपणी करावी.

बटाट्यातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे जाणून घेण्यसाठी इथे क्लिक करा 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog