Call 9923974222 for dealership.

बटाट्यातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

 

बटाट्यात स्टार्च व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात प्रथिने व मिनरल्स असतात. त्यामुळे अर्थातच पिक वाढीच्या काळात या पिकास मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची गरज असते. कोणत्याही पिकात एकही अन्नद्रव्याची कमतरता आली तर त्याची वाढ खुटते, पिक मागे पडते, उत्पादन कमी येते व आलेल्या उत्पादनाचा दर्जा देखील काही खास नसतो. बटाट्याच्या बाबतीत देखील तसेच आहे. 

इतर पिका प्रमाणेच बटाट्यातील अन्नद्रव्यांच्या कमतरता देखील लक्षणावूरुन ओळखल्या जावू शकतात. अशी लक्षणे दिसली कि लगेच त्या अन्नद्रव्याची पूर्तता फवारणी किंवा ठिबक द्वारे करावी जेणे करून पिक मागे पडणार नाही व उत्पन्नात घट येणार नाही व दर्जा देखील टिकून राहील.

बहुतेक वेळेला अन्नद्र्व्य कमतरतेची लक्षणे आढळली कि निव्वळ त्या एकट्या अन्नद्रव्याचा पुरवठा करण्या ऐवजी मिश्रणाचा पुरवठा करावा जेणे करून संतुलन टिकून राहील. जसे -

  • वाढी च्या काळात नत्राच्या कमतरतेची लक्षणे आढळली तर "अमृत गोल्ड एन पी के १९-१९-१९"चा पुरवठा करावा पण जर हीच लक्षणे फुलोरा यायच्या काळात किंवा फळधरण सुरु असतांना दिसून आली तर "अमृत गोल्ड एन पी के १३-४०-१३ किंवा १२-६१-००" वापरावे. 
  • कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर या पैकी कुठलीही कमतरता असली तर अमृत प्लस ड्रेंचींग कीट वापरावे. कीट मध्ये ह्युमोल देखील आहे. त्यामुळे पांढरी मुळे विकसित होऊन हि अन्नद्रव्ये लगेच शोषली जातात व कमतरता भरून निघते.
  • लोह-मंगल-जस्त-तांबे-बोरॉन-मोलाब्द या सूक्ष्मअन्नद्र्व्यांची कमतरता असली तर मायक्रोडील ग्रेड २ चा फवारणी किंवा ठिबकने पुरवठा करावा. असे करूनही जर कमतरतेची लक्षणे कायम राहिली तर मायक्रोडील एफ ई १२ , मायक्रोडील झेड एन १२ किंवा मायक्रोडील बोरान २० या पैकी ज्याची कमतरता असेल (लोह, जस्त, बोरान क्रमश:) त्याचा पुरवठा करावा.   

उभ्या पिकातील वेडी वाकडी, रंग बदलेली, जळकी दिसणारी पाने आढळली कि पिकावर व्हायरस, जीवाणू किंवा बुरशीजन्य रोग झाला आहे असा गैरसमज होतो. हि लक्षणे अन्नद्रव्य कमतरतेची असू शकतात. हि लक्षणे कशी असतात हे जाणून घेवू.

प्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

नत्र: संपूर्ण पान शिरा सहित पिवळे पडते. नत्राचा पुरवठा केल्यास हि लक्षणे वेगाने नाहीशी होतात. नवीन पालवी गर्द हिरवी होते पण जुनी पाने पिवळेच रहातात. जेव्हा नत्राची कमतरता तीव्र असते तेव्हा पाने वाटीप्रमाणे वक्र होतात. 

स्पुरद: स्पुरदाच्या कमतरतेची लक्षणे सर्व प्रथम जुन्या पानांवर जळक्या डागांच्या स्वरुपात दिसून येतात. झाडाची वाढ थांबते -खुरटते. खोडावर, देठावर व पानांच्या खालच्या पृष्ठभागावर जांभळा रंग उमटून पडतो. असे झाड सामन्य झाडापेक्ष जास्त गर्द हिरवे दिसते. जर कमतरता तीव्र असलीतर पाने वरच्या बाजूने वळतात.

पालाश: याच्या कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे नवीन पालवीवर दिसतात जर तीव्रता वाढली तरच हि लक्षणे पूर्ण वाढ झालेल्या पानावर दिसून येतात. कोवळ्या पानांवर सुरकुत्या पडतात. काही पानांची टोके जळालेली वाटतात. कमतरता तीव्र असल्यास शीरांमधील भागही जळका दिसतो, शिरा मात्र हिरव्या दिसतात. पाने सूरकटून वाकडी होतात. काळे ठिपके देखील पडतात. अमृत गोल्ड एनपी के ००-००-५० ची फवारणी करावी. यामुळे कमतरता दूर होईल पण खराब झालेली पाने काही केल्या सुधारणार नाहीत.

दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

मॅग्नेशियम: पानाच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, जळका दिसतो. पाने बेरंगी दिसू लागतात. तीव्रता वाढली तर लक्षणे पालाश कमतरते प्रमाणे दिसू लगतात. लक्षणे सुरवातीला नवीन पालवी वर दिसतात.

गंधक: संपूर्ण पालवी एकसारखी पिवळी पडते. शिरा व देठ लालसर होतात. पानानाचा खालचा पृष्ठभाग लालसर होत. जर तीव्रता वाढली तर पाने ताठ, पिळदार व ठिसूळ होतात

कॅल्शियम: पाने देठाकडील बाजूला जळकी दिसतात. वेगाने वाढणाऱ्या भागात मउ पण जळके पण दिसतो. पुढे जावून पानांच्या काठांच्या वाढीचा वेग मंदावतो त्यामुळे पाने उलट्या वाटी सारखे होतात. कॅल्शियमच वहन नीट होत नसते म्हणून कॅलनेट ची फवारणी व आळवणी करावी. 

-----------------------------------------

-----------------------------------------
शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके. फोटोवर क्लिक करून खरेदी करू शकता.
----------------------------------------

सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

बोरान: याची कमतरता असली तर सर्व पाने हलके पिवळे दिसतात. तीव्रता वाढली तर टोकावर गुच्छा होतो. पाने कोरडी, ठिसूळ बनतात. नवी पालवी, पाणी पुरवठा असूनही, लोंबकते.

लोह: नवीन पालवी फिकट होऊन शिरांमधील भाग पिवळी पडतो. शिरा हिरव्या रहातात. तीव्रता वाढल्यास पाने पांढरी देखील पडतात. मायक्रोडील एफ ई १२ ची फवारणी अतिशय प्रभावी आहे. यातील लोह पूर्णपणे चिलेटेड असल्याने लवकर लागू होते. 

तांबे: शाखीय वाढीच्या शेवटच्या टप्प्यात तांब्याची कमतरता होते. पानाच्या कडा खालच्या बाजूला गुंढाळल्या जातात. पालवी फिकट पडते, नवीन पाने लुळी पडतात. जुनी पाने जाळीदार होतात. 

झिंक:  शिरांच्या मधला भाग जळका दिसतो. सुरवातीला हि लक्षणे नव्या पालवी वर दिसतात मग जुन्या पानांवर देखील दिसतात. मायक्रोडील झेड एन १२ ची फवारणी अतिशय प्रभावी आहे. यातील झिंक पूर्णपणे चिलेटेड असल्याने लवकर लागू होते

मोलाब्द: पालवी फिक्कट पिवळी- हिरवी होते. वाढ थोडी खुंटते. मोलाब्दाची कमतरता बहुतेक वेळा आम्ल धर्मीय मृदेतच येते. थोडेफार नत्राच्या कमतरते सारखे दिसते पण यात लालसर पणा येत नाही.

 

प्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक

पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published