वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग तिसरा)

वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग तिसरा)

भारतीय शेतकरी बांधवांनी गेल्या काही दशकात ठिबकसिंचन, शेडनेट, मल्चिंग, विद्र्याव्य खते, कीटनियंत्रण, तणनियंत्रण अश्या सर्वच बाबतीत नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले. या तंत्रज्ञानाच्या साधनेतून त्याची गुंतवणूक वाढली व शेताचे उत्पादनहि वाढले. 

समस्या हि आहे कि यातून शेतकऱ्याचा नफा वाढला नाही, त्याचे जीवनमान उंचावले नाही, सामाजिक स्थान देखील वाढले नाही. 

काही शेतकरी बांधवांच्या बाबतीत उलटेच घडले आहेत, त्यांनी श्रीमंती कडून "गरिबीकडे" वाटचाल केली आहे. ते कर्जबाजारी झाले आहेत.

आपला देश कृषिप्रधान आहे, उद्यमी आहे, शेकडो च्या संख्येने कृषी पूरक सरकारी योजना आहेत तरीही हे चित्र असे विदारक  का आहे?

हे चित्र बदलायला हवे म्हणून आपण "वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची" हे सदर सुरु केले. या पूर्वीच्या दोन भागात, शेतकरी बांधवांनी आपल्या कामाचे प्रकार कसे करायचे हे बघीलते व दुसऱ्या भागात "ध्येय्य" कसे ठरवायचे हे बघितले. 

मराठी भाषेत एक म्हण आहे "जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला". या म्हणीचा अर्थ असा आहे कि जर तुम्ही कमी महत्वाच्या कामाने सुरवात केली तर तुमचा सबंध जन्म कमी महात्वाची कामे करण्यात निघून जातो.  एक इंग्रजी तत्ववेत्ता म्हणतो " मूर्ख व्यक्ती जे काम शेवटी करतो तेच काम बुद्धिमान व्यक्ती ताबडतोब करतो. दोघेही एकच काम करतात, फरक फक्त वेळेचा असतो"

मित्रहो, कुठल्याही कामाला सुरुवात करण्या पूर्वी तुम्ही ठरवलेले लक्ष्य/ध्येय्य काय आहे? ते पूर्ण करण्यासाठी कोणकोणती कामे करायची आहेत? याची एक यादी बनवा. लक्षात ठेवा कि हि यादी तुम्ही थोडे पुढे जाल तेव्हा बदलणार आहे.

तुम्ही बनवलेल्या यादीतील कामांचा क्रम ठरवून घ्या. पहिल्या भागात पाहिल्या प्रमाणे
महत्वाचे व तत्काल काम, महत्वाचे पण फुरसतीचे काम, दुय्यम पण तत्काल काम, दुय्यम व फुरसतीचे काम असे वर्गीकरण करून घ्या.

या यादीतील सर्वात महत्वाचे काम पहिले करायचे आहे हे लक्षात ठेवा.

माझा एक मित्र, शेतकऱ्याचा मुलगा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. दोनदा परीक्षा नापास झाल्यावर त्याच्या लक्षात आले कि त्याच्या मागून अभ्यास सुरु केलेले मित्र पास होऊन नोकरी ला लागले. त्याच्या लक्षात आले कि त्याची महत्वाकांक्षा प्रबळ नव्हती, तो इतर सर्व कामे आटोपून दुपारी निवांत अभ्यासाला सुरुवात करी. कधी कधी अभ्यासाला बसायला रात्रीचे दहा वाजत. कधी कधी तो अभ्यासाविनाच झोपून जाई. त्याने हि चूक सुधारली. सकाळी उठून तो अभ्यास करू लागला. झुंजूमुंजू होई पर्यंत त्याच्या अभ्यासाची दिशा ठरलेली असे. घरातील इतर लोकं उठायला लागली कि तो व्यायाम करायला सुरुवात करी व न्याहारी आटपून परत अभ्यासाला बसे. त्याचा दिनक्रम पाहून आई-वडील-भाऊ-बहिण त्याला कामे सांगायला टाळत. आज तो कलेक्टर आहे. घरातल्या सर्व लहान सहान कामासाठी नोकर आहेत. सगळ्यांशी बोलायला, घरगुती समारंभात भाग घ्यायला त्याच्याजवळ "भरपूर" वेळ आहे व मानमरातब आहे तो वेगळा!

 

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या शेवटच्या चिठ्ठीत " प्रिय कुटुंबीय - मला माफ करा मी तुमची स्वप्न पूर्ण करू शकलो नाही" "मी हे काम करू शकलो नाही" अशी वाक्य प्रकर्षाने असतात. हि स्वप्ने अपूर्ण रहाण्याचे मुख्य कारण एकच असते "कमी महत्वाची कामे अग्रक्रमाने करणे".

मित्रहो, तुम्ही स्मार्ट व्हायचे ठरवले आहे कि नाही? मी हा प्रवास तुमच्या सोबत करतो आहे. पुढील भागात आपण "अपरिहार्यपणे वाया जाणाऱ्या वेळेचा कसा उपयोग करायचा" ते बघू. असे कमीत कमी २० ते २५ भाग प्रकाशित होणार आहेत. 

हा भाग तुम्हाला कसा वाटला?  खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपण आमच्या वेबस्टोअर मधून खते, बायोपेष्टीसाईड, संजीवके, मृदा सुधारक खरेदी करू शकता. तुम्हाला अश्या खरेदीची भीती वाटते का? अजिबात घाबरू नका, आमची वेबसाईट एच टी टी पी एस प्रोटोकॉल वर आधारित आहे, एकदम सेफ. 

Back to blog