पाटील बायोटेकची "चार" दमदार उत्पादने

पाटील बायोटेकची "चार" दमदार उत्पादने

मित्रहो, आज मी आपल्याला पाटील बायोटेकच्या चार अतिशय खास उत्पादनाबद्दल माहिती सांगणार आहे. आपण हि उत्पादने पहिले बघितली असतील. तरीही या लेखातून मी आपल्याला जे सांगणार आहे, ते आपल्याला ठावूक नसेल. पूर्ण लेख नक्की वाचा कारण आमची हि चार उत्पादने आपण त्यांच्या बद्दलच्या पूर्ण माहितीसहित वापराल तर, आपल्या पिकावर त्यांचा अधिक चांगला परिणाम होईल. 

मृदा सुधारक: शेती म्हटली म्हणजे माती ओघाने आलीच. आज काल मृदा विरहीत शेती पद्धतींची चर्चा होते आहे. पण हि चर्चा कृतीत उतरणे अजूनहि क्षितिजा इतके दूर आहे. तो पर्यंत मृदेचा कस, तिच्या कणांचा आकार, त्यात उपलब्ध सेंद्रिय कर्ब या बाबींचा आपल्या पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम जाणवत रहाणार आहे. पाटील बायोटेकच्या ह्युमॉल, ह्युमॉल  ग्रेन्युल या मृदा सुधारक उत्पादनांबद्दल तर आपण जाणतातच. मृदेतील ह्यूमस वाढवून हि उत्पादने मृदेची आयन विनिमय क्षमता वाढवतात. त्यामुळे मुळांवर पांढऱ्या केशतंतूंची संख्या मोठ्ठ्या प्रमाणात वाढते व त्यामुळे पिकांचे चांगले पोषण होते. ह्युमॉल करत असलेला बदल पिकात होत असतो. पण या लेखात मी आपणास ह्युमॉल बद्दल सांगत नसून एका वेगळ्या मृदा सुधारकाबद्दल सांगत आहे. हा मृदा सुधारक, मुळांच्या क्षेत्रातील मृदेचा सामू ५.५-६.५ या दरम्यान घेवून जातो. असे केल्याने चिकण मातीवर (क्ले) जीतके अन्नद्रव्य चिटकून बसलेले असतात ते तिथून सुटतात व पाण्यात उतरतात. यात नत्र, पोटॅश, स्पुरद, लोह, झिंक अश्या अन्नद्रव्यांचा समावेश असतो. पाण्यात उतरलेली हि अन्न द्रव्ये पिकास लगेच उपलब्ध होतात

या मृदा सुधारकाचे नाव मी आपणास पुढे लेखात सांगणार आहे. पण एक मात्र नक्की कि आपण या उत्पादनाचा उपयोग तीन टप्प्यात करायचा आहे.

  • एकदा सुरुवातील जेव्हा पिकाला शाखीय वाढीसाठी अन्नद्रव्याची मोठी गरज असते.
  • त्यानंतर पिक फुलावर येवू लागले कि सेटिंग चांगले व्हावे म्हणून व नंतर
  • पिकात फळे वाढीच्या वेळी किंवा दाणे भरण्याच्या वेळी. 

दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे कि हे मृदा सुधारक आहे. मृदेवर परिणाम करते. त्यामुळे प्रत्येक पिकात याचा उपयोग करायचा आहे.

मृदा सुधारकाचे नाव सांगण्यापूर्वी मी आपणास दुसऱ्या उत्पादनाची माहिती देणार आहे.

१०० % नैसर्गिक खत: शेतकरी मित्रहो खत म्हटले कि आपण नत्र, स्पुरद, पालाश, लोह, झिंक, कॅल्शियम अश्या घटकांचा विचार एका क्षणात करतो. १०० टक्के नैसर्गिक खत म्हटले कि आपण लगेच कंपोष्ट, वर्मीकंपोष्ट, शेणखत, जीवामृत अश्या खतांचा विचार करतो. गंधक हे देखील एक १०० टक्के नैसर्गिक खत आहे असा विचार आपल्या मनात अजिबात येत नाही. खरे तर  निसर्गात गंधक शुद्ध स्वरुपात आढळून येते! निसर्गात जे गंधकाचे चक्र चालते त्यात कारखान्यातून निघणारा एसओटू गॅस व ज्वाला मुखीतून होणारा एचटूएसगॅस हे गंधकाचे मुळ स्त्रोत आहेत. या श्रोतातून निघणारा गंधक मातीत व पाण्यात मिसळून “सल्फेटस” च्या माध्यमातून पिकास मिळत असतो. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या गरजेतून जी अधिक उत्पादकता असलेली पिकांची वाणे (HYV) आपण वापरतो त्यांना हा निसर्गचक्रातून मिळणारा गंधक पुरेसा नसतो. त्यामुळे आपण ज्वालामुखीच्या परिसरात बऱ्यापैकी शुद्ध स्वरुपात आढळून येणाऱ्या गंधकावर अवलंबून आहोत. हे गंधक आपण धुतो, दळतो व वापरतो. यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. या अर्थाने हे १०० टक्के नैसर्गिक खत आहे. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम (NPOP) च्या निर्देशात गंधकाचा समावेश "नैसर्गिक खतात" केला गेला आहे. 

मुद्दा हा आहे कि पिकाला किती गंधकाची गरज असते? या प्रश्नाचे उत्तर ज्याला ठावूक आहे त्याच्या कोणत्याही  पिकाला, गंधकाच्या कमतरतेचा सामना कदापि करावा लागणार नाही. जर आपण ६ किलो नत्र म्हणजे १४.७ किलो युरिया पिकासाठी वापरत असाल तर पिकास १ किलो गंधकाची गरज असते. म्हणजे ४५-५० किलो युरियाच्या गोणी मागे ३ किलो गंधकाची पिकास गरज असते.  यातील काही गरज निसर्ग चक्रातून पूर्ण होते तर काही गरज सल्फेट प्रकारच्या खतातून पूर्ण होते. हा “काही” भाग सोडला तर उर्वरित गरजेसाठी पिक पूर्णपणे शुद्ध स्वरूपातील गंधकावर अवलंबून असते. 

पाटील बायोटेकचे शुद्ध गंधकावर आधारित उत्पादन, बाजरात उपलब्ध इतर उत्पादनापेक्षा खूप वेगळे आहे. या उत्पादनातील गंधकाच्या दाण्याची साईज इतकी सूक्ष्म आहे कि ते ठिबक ने देता येते. इतके सूक्ष्म असल्याने ते मुळांच्या क्षेत्रात सर्वदूर वेगाने पसरते व पिकास उपलब्ध होते.   या उत्पादनाचे नाव मी लेखात पुढे सांगणारच आहे पण त्यापूर्वी आपण एका जालीम तरीही उपकारक दैवी बुरशीनाशकाबद्दल जाणून घेवू.

दैवी बुरशीनाशक: बुरशीनाशक म्हटले कि आपल्याला लगेच साफ, कार्बेंडाझिम अश्या बुरशीनाशकांची नावे पटापट आठवू लागतात. आपण हि बुरशीनाशके जेव्हा फवारणीसाठी वापरतो तेव्हा अगोद्च पिकाची बऱ्या पैकी हानी झालेली असते. पानावरील काळे डाग, पाने जळणे, पिकाने मान टाकणे, मुळे सडणे, फळे किंवा दाणे सडणे अश्या समस्या बुरशीमुळे आपणास जाणवतात. बुरशी हवे च्या माध्यमातून पसरते. हवेत आद्रता वाढली, पाणी अडले कि बुरशी पिकावर मूळ धरते. वर सांगितलेली लक्षणे दिसू लागतात तो पर्यंत पुला खालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. नुकसान होऊन गेलेले असते. हे घडू नये म्हणून आपण पाटील बायोटेकच्या दैवी बुरशी नाशकाचा वापर करावा. हे बुरशीनाशक नैसर्गिक तर आहेच शिवाय याचा अंश उत्पादनात उतरत नाही. इतर सर्व बुरशीनाशके माणसात कर्करोग निर्माण करू शकतात पण पाटील बायोटेकच्या या बुरशीनाशकाने कर्करोग होण्याचा कुठलाही धोका नाही. या उत्पनाचे नाव मी आपल्याला वरील दोन उत्पादनांच्या नावा सोबतच सांगणार आहे. तत्पूर्वी आपण एका खास कीटकनाशकाची माहिती जाणून घेवू.

आगळे वेगळे कीटकनाशक: अनेक शेतकरी मित्रांच्या मनात कीटकांची इतकी भीती असते कि "कृषी व्यवस्थापन म्हणजे निव्वळ कीटकनाशकांचा मारा करावा", असे त्यांना वाटते. खरे पहिले तर कृषी व्यवस्थापनात; मृदा व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, खत व्यवस्थापन व कीट व्यवस्थापन असा क्रम आहे. पहिल्या तीन भागावर तुम्ही जितके संतुलन साधाल तितकेच कीड व्यवस्थापन सोपे होते. सर्व किडी एकीकडे आणि कोळी एकीकडे! सर्वसाधारण पणे शेतात जितक्या किडी असतात त्यांना ६ पाय असतात. पण कोळ्यास आठ पाय असतात. लालकोळी, पिवळा कोळी, दोन ठिपक्यांचा कोळी असे कोळ्यांचे प्रकार पिकावर आपण बघू शकतात. वातवरणात उष्णता वाढली, आद्रता कमी झाली कि हवेवर पसरणारा कोळी शेताच्या एक कोपऱ्यातून शेतात घुसतो. पानाच्या खालच्या बाजूने रसग्रहण करतो. बारीक जाळे विणतो व भरमसाठ अंडी देतो. या अंड्यातून उपजलेली पिल्लावळ अगोदरच शुष्कतेचा सामना करीत असलेल्या पिकाचा समाचार घ्यायला सुरवात करतात. ते इतक्या वेगाने रसग्रहण करतात कि पाने वळतात, वाळतात. शेतकऱ्यास अनुभव नसला तर तो सैरभैर होतो. अनुभवी शेतकरी पानाखाली पांढरा कागद धरून पान जोरात झटकतात. कागदावर पडलेले कोळी तुरुतूर पळतांना दिसतात. अश्या वेळी मग कीटकनाशकाचा शोध सुरु होतो. 

पाटील बायोटेकचे चौथे उत्पादन एक दर्जेदार कोळी नाशक आहे. ते पाण्यात टाकून फवारले कि कोळ्याच्या सर्व अवस्थांवर चांगले नियंत्रण होते. 

मित्रहो. आता आपणास या चारी उत्पादनांची नावे सांगण्याची वेळ झाली आहे. मृदा सुधारक,  नैसर्गिक खत, दैवी बुरशीनाशक व आगळे वेगळे कीटक नाशक. सत्य हे आहे कि चार वेगळी उत्पादने नसून, हे एकच उत्पादन आहे! एकाच उत्पादनात या चार क्षमता आहेत! 

या उत्पादनाचे नाव आहे रिलीजर +. 

रिलीजर + हा उत्कृष्ठ मृदा सुधार आहे, खत आहे, बुरशी नाशक आहे व कीटकनाशक देखील आहे. या व्यतिरिक्त रिलीजर + ची काही वैशिठ्य आपण जाणून घेवू.
  • रिलीजर + ९० टक्के पेक्षा जास्त शुध्द आहे. 
  • उर्वरित १० टक्के म्हणजे कुठली भेसळ नसून ९० टक्के भाग असलेल्या गंधकाची क्षमता अनेक पटीने वाढवणारे घटक या १० टक्क्यात समाविष्ट आहेत.
  • रिलीजर + मधील कण अतिसूक्ष्म आहेत. सामान्य गंधकाच्या एका कणाचे एक लाख तुकडे केल्यावर रिलीजर चा एक कण तयार होतो. इतकी सूक्ष्मता असल्याने रिलीजर ठिबक ने देता येते व पंपाने फवारता येते. हे सूक्ष्म असल्याने फवारणीत कमी डोस वापरला तरी पानाच्या पृष्ठभागावर त्याचा एकसारखा थर बनतो. अतिसूक्ष्मतेमुळे ते मुळाच्या क्षेत्रात चांगले पसरते. ३ किलो प्रती एकर चा डोस पुरेसा ठरतो.

मित्रहो, हा लेख आपणास कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो पुढल्या वेळी, वर सांगितल्या प्रमाणे प्रत्येक पिकात रिलीजर + न चुकता तीन वेळा वापरा, एकरी डोस फक्त ३ किलो!

Back to blog