Call 9923974222 for dealership.

वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग पहिला)

मित्रहो स्मार्ट होण्याची वेळ आली आहे. सर्वकाही स्मार्ट होतय...शाळेतला शिक्षक असो कि ग्रामसेवक, दुकानदार असो कि बँकेवाला - हो अगदी पोस्टमन देखील स्मार्ट होतोय. इतकेच काय वस्तू देखील स्मार्ट होता आहेत. फोन असो कि टीव्ही, बसचे तिकीट असो कि मतदान यंत्र, ठिबक असो कि ट्रॅक्टर! चला मग आपणही होऊ - स्मार्ट!

एक शेतकरी म्हणून विचार केला तर -जमीन जुमला - मजूर, कामगार - स्थिर व खेळते भांडवल या व्यतिरिक्त काय महत्वाचे आहे?

वेळ!

हि "वेळ" सर्व शेतकरी बांधवांकडे सारख्याच प्रमाणात उपलब्ध असते व एकदा वाया गेली कधीच परत येत नाही. अनेक वेळा शेतकरी बांधव बोलूनही दाखवतात कि मी ज्या पद्धतीने शेती करतो आहे त्यापेक्षा उत्तम करू शकतो पण मला वेळ पुरत नाही

मित्रहो, वेळ हा व्यवस्थापनाचा मुद्दा आहे. जसा आपण पैशाचा हिशोब ठेवतो तसा वेळेचाही हिशोब ठेवायला हवा कारण एकदा हातून निसटलेली वेळ कुणालाच परत मिळत नाही. तुमच्या जवळ जितका वेळ आहे तितक्याच वेळेत तुम्हाला महत्वाची कामे, दैनंदिन कामे  व फुरसतीतील कामे आटोपायची असतात.  समजा आपल्याजवळील कामांची आपण विभागणी केली तर व्यवस्थापन चांगले होईल.

  • महत्वाचे व तत्काल काम
  • महत्वाचे पण फुरसतीचे काम
  • दुय्यम पण तत्काल काम
  • दुय्यम व फुरसतीचे काम

आपल्या जवळील वेळेची देखील विभागणी करणे शक्य आहे. बहुवार्षिक कामे, येत्या वर्षभरातील कामे, सहमहितील कामे, या महिना-पंधरवड्यातील कामे, चालू आठवड्यातील कामे, उद्याची कामे, आज सायंकाळी-दुपारी व सकाळची कामे!

 १. महत्वाचे व तत्काल काम: हे काम तुम्हाला आजच करावेच लागणार आहे. तुम्ही पुढील आठवडयात काढणीचा विचार केला होता पण वातावरणात बदलण्याची शक्यता आहे. आज केले नाही तर हाती काहीच येणार नाही. गोठ्यातील गायी-म्हशींचे दुध काढणे वेळेवर केले नाही तर दुधाचा उतारा कायमस्वरूपी कमी होऊ शकतो. रात्रीच्या पावसामुळे शेतात साठलेल्या पाण्याला लवकरात लवकर वाट काढून दिल्याने वाफसा निर्मिती होऊन पिके जोमाने वाढतील नाही तर मूळकुज होईल. वारा-वादळाने नुकसान झाले तर पाठपुरावा करून लवकरात लवकर पंचनामा करून घ्यावा जेणे करून पुढील कामे मार्गी लागतील.

२. महत्वाचे पण फुरसतीचे काम: हि कामे महत्वाची असतात पण हाती थोडा अवधी असतो. जसे पूर्वतयारी, नियोजन, संकटपूर्व  तयारी इ.. यात तुम्ही आर्थिक व  मजूर व्यवस्थापन, पुढील हंगामासाठी करायच्या सुधारणा, सल्लामसलत, विक्री व्यवस्थापनेतील सुधारणा/बदल, नवीन तंत्रज्ञान व कौशल्याचा अभ्यास, सराव, कार्यशाळा व प्रदर्शनात भाग घेणे या गोष्टींचा समावेश करू शकता. 

३. दुय्यम पण तत्काल काम: हि कामे महत्वाची नसतात पण लगेच करावी लागतात. दारावर आलेल्या विक्रीप्रतीनिधीला भेटणे, फोनवर बोलणे. कधीकधी शेतातील काही कामे देखील यात असू शकतात. शेतातल्या काही सुधारणा किंवा स्वच्छतेची काही कामे. हि दुय्यम दर्जाची कामे असल्याने दुसऱ्याकडून करून घेतलेली चांगली. समजा विक्री प्रतिनिधीने दारात आला व लगेच वेळ द्या असे म्हटले तर त्याचे म्हणणे खरच महत्वाचे आहे का ते तपासायला हवे. त्याच्या कडील माहितीपत्रक मागून घ्यावे, वाचून नंतर बोलवतो असे सांगावे. फोन करणाऱ्या व्यक्तीला नंतर योग्य वेळी फोन करायला सांगावे.  

४. दुय्यम व फुरसतीचे काम: लक्षात ठेवा हि देखील कामेच आहेत पण महत्वाची नाहीत. आजतरी अजिबात नाही. कदाचित हि कामे दुसरे कुणी करू शकेल! आपला वेळ का घालवायचा यात? वेळ असेल तेव्हा करावीत. अशी कामे तुम्ही शिकवू उमेदवारास द्यावीत.

पहिल्या व दुसऱ्या प्रकारातील कामे सारख्याच महत्वाची असू शकतात पण दुसऱ्या प्रकारची कामे करायला थोडा वेळ उपलब्ध असतो. पहिल्या प्रकारातील कामे प्रकर्षाने करावीत.  पण सातत्याने या प्रकारातील कामे केल्याने तणाव निर्माण होतो म्हणून दुसऱ्या प्रकारातील कामे करत राहिल्याने ती पहिल्या प्रकारात यायच्या आधीच आटोपलेली असतात व तणाव निर्माण होत नाही. दुसऱ्या प्रकारातील कामे होण्यासाठी तिसऱ्या व चौथ्या प्रकारातील कामाकडे दुर्लक्ष करणे किंवा ते इतरांवर सोपवणे जास्त व्यवहार्य आहे. 

जर तुम्ही तुमची कामे अश्या पद्धतीने करू शकलात तर तुमच्याजवळ भरपूर वेळ शिल्लक राहील. या वेळेत तुम्ही कुटुंबांसोबत घालवू शकता किंवा इतर ज्ञानार्जन करू शकतात. 

वेळ वाचवायची इतरही साधने आहेत जसे कृषी अवजारे. इथे काही कृषीअवजारांची माहिती देत आहे.

१. बी टोकन यंत्र: 

या यंत्राच्या मदतीने तुम्ही शेंगदाणे, मका, भेंडी असे कितीतरी प्रकारचे बी अतिशय वेगाने, कमी वेळेत, कमी मजुरीत लावू शकता. या शिवाय बियाण्याची कमीत कमी हाताळणी होणार, ते विशीष्ट खोलीवर पेरता येणार. 

 २. रोप लागवड यंत्र

या यंत्राच्या मदतीने तुम्ही मिरची, टमाटे, वांगी, टरबूज असे कितीतरी प्रकारची रोपे अतिशय वेगाने, कमी वेळेत, कमी मजुरीत लावू शकता. या शिवाय रोपांची कमीत कमी हाताळणी होणार, ते विशीष्ट खोलीवर व अंतरावर पेरता येणार.

 मित्रहो हि माहिती तुम्हाला कशी वाटली? खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नक!

2 comments

  • आपल्या कंपनी कडून शेतकरी साठी प्रशिक्षण घ्यावी अशी अपेक्षा

    Hemchand K Ahire
  • Very good

    Gajanan Chavan

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published