पुस्तक परिचय: सोयाबीन

पुस्तक परिचय: सोयाबीन

गेल्या दशकात या एका पिकाच्या लागवड क्षेत्रात जितकी वाढ झाली तितकी वाढ इतर कुठल्याही पिकात झालेली नाही. सोयबीन मध्ये मुबलक प्रमाणात उत्कृष्ट दर्जाचे प्रथिन असल्याने हे एक नगदी पिक झाले आहे. सोयाबीन तेलाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला असून आज एकूण खाद्यतेल उत्पादनात या तेलाचा वाटा ५५ टक्क्यावर आहे! असे असूनही सोयाबीन उत्पादक शेतकरी स्वत:चा काही फायदा करून घेतो आहे का? नाही!तर मग काय चुकते आहे? हे पिक समजावून घेण्यात आपली काही चूक झाली आहे का? नेमका काय दृष्टीकोन ठेवला तर आपला फायदा होईल?
या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर प्रा. दिनेश लोमटे व प्रा. दीप्ती पाटगावकर लिखित "सोयाबीन" हे पुस्तक वाचायला हवे. २०१४ साली प्रकाशित झालेल्या, १४४ पानी पुस्तकात सोयबीन बद्दल उत्कृष्ट व उपयोगी माहिती चांगल्या पद्धतीने मांडली आहे. सोयबीन चे पिक घेतल्याने नेमके कोणकोणते फायदे होतात? पिकाच्या वाढीचे विविध टप्पे कसे आहेत? सोयाबीन पासून वेगवेगळ्या कोणत्या पदार्थांची निर्मिती होते व कशी? कोणकोणती यंत्रसमुग्री लागेल? या व इतर अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहे.

या पुस्तकाचे मुख्य आकर्षण म्हणजे याची मांडणी. सुलभभाषे सोबत तितकेच सुरेख आरेखन.  सचित्र व आकडेवारी निहाय मांडणीमुळे  या पिकाकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन नक्कीच बदलून जाईल.


अनेक सिनेमात एक खजाना असतो व त्याचा एक नकाशा असतो. जो योग्य अर्थ लावतो त्याला तो खजाना मिळतो. पण "सोयाबीन" या पुस्तकात खजाना नेमका काय आहे व खजिन्या पर्यंत पोहोचायचा नेमका रस्ता कसा आहे हे इतक्या सुरेख पद्धतीने मांडले आहे कि मनलावून वाचणारा वाचक भूलभुलैयात अडकून न पडता, "सोयाबीन" लागवडीचा खरा फायदा मिळवू शकेल.

इथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण एमेझोनच्या वेबसाईटवरील त्याच पेजवर जाल जिथे हे पुस्तक २३० रुपयात उपलब्ध आहे. खरेदी करण्या पूर्वी तिथे दिलेली सात पाने वाचून बघा, म्हणतातना "शितावरून भाताची परीक्षा"!  

 

आपल्याला कोणत्या पिकाचे व्यवस्थापन शेड्यूल हवे आहे का? शेड्यूल मिळवा स्क्रीन वर दिसणाऱ्या बटणावर क्लिक करा.
Back to blog