soybean management

सोयाबीन पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन

सोयाबीन लागवड

बीज प्रक्रिया

एकरी २५-३० किलो बियाणे लागते. बीज प्रक्रीये साठी ह्युमॉल जेली ५०० ग्राम + बुरशीनाशक + कीटकनाशक वापरावे. कीटकनाशकात थायमेथोक्झाम ३० % एफ एस - २५० ते ३०० मिली, इमिडाक्लोप्रीड ३७.५ ते ४५ मिली
बुरशीनाशकात व्हीटावेक्स ७५-९० ग्राम + रोको ७५ ते ९० ग्राम
जैविक बीज प्रक्रीयेसाठी पीएसबी ६२५ ग्राम + केएमबी ६२५ ग्राम+रायझोबीअम ६२५ ग्राम + ट्रायकोडर्मा १२५ ग्राम

बीज प्रकियेत ह्युमॉल जेली वापरल्याने अंकुरण चांगले होते शिवाय औषधी व जीवाणू बियाण्यास चांगले चिटकून रहातात

लागवड:

टोकन पद्धतीने २.५ फुटावर सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूला ६ इंचावर बियाणे टोकावे
पेरणी पद्धतीने: दोन ओळीतील अंतर १.५ फुट, दोन झाडातील अंतर ४ इंच

 

तणनियंत्रण:


उगवणी पूर्व तणनाशक Authority NXT – 500 ग्राम प्रती एकर
उगवणी पश्चात लगेच वापरायचे तणनाशक Weedblock – 250 मिली प्रती एकर किंवा Shaked - 800 मिली प्रती एकर

 

बेसल डोस: प्रती एकर

10.26.26 – 100 किलो किंवा एस एस पी 200 किलो सोबत एम ओ पी 30 किलो किंवा 12.32.16 – 100 किलो किंवा 15.15.15 – 200 किलो + एस एस पी 50 किलो + ह्युमॉल बी. टी 10 किलो + रिलीजर 5 किलो

SULPHUR FERTILIZER

बेसल डोस मध्ये रिलीजरचा वापर केल्याने मुळाच्या क्षेत्रातील सामू सुधारतो, अन्नद्रव्याचे अपटेक चांगले होते व सोयबीन मधील प्रथीनाची व तेलाची टक्केवारी सुधारते.

पेरणी नंतर लगेच करायची आळवणी

19.19.19. – 3 किलो + अमृत कित -1 - दीडशे लिटर पाण्यात मिसळून

fertilizer balance
आळवणीत अमृत प्लस ड्रेंचींग किट चा वपर केल्याने खत संतुलन साधले जाते.

लागणी नंतर १५-२० दिवसात करायची फवारणी (पंधरा लिटर पंपाचा डोस)

Triazophos or Deltamethrin or Chlorocyper - 30 मिली + क्लीनर पी - 20 ग्राम + खुराक - 50 मिली + 19.19.19 - 100 ग्राम + अरेना चोकलेट -6 ग्राम + ब्लेझ' - 15 मिली Or ब्लेझ सुपर - 5 मिली

biofungicide

पहिल्या फवारणीत क्लीनर पी चा वापर केल्याने आद्रतेमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रभाव कमी रहातो.

लागणी नंतर ३०-३५ दिवसात करायची फवारणी (पंधरा लिटर पंपाचा डोस)

फुलोरा वाढवण्यासाठी व फुलांचे रुपांतर शेंगेत होण्यासाठी
12.61.00 - 100 ग्राम + झेब्रोन - 50 मिली + ऑक्सिजन - 50 मिली +पोकलॅड २० मिली + ब्लेझ' - 15 मिली किंवा ब्लेझ सुपर - 5 मिली

दुसऱ्या फवारणीमध्ये ऑक्सिजन चा अंतर्भाव केल्याने फुलोरा चांगला दमदार येतो

लागणी नंतर ५०-५५ दिवसात करायची फवारणी (पंधरा लिटर पंपाचा डोस)

शेंगांचे वजन वाढण्यासाठी व दाणे भरण्यासाठी

00.52.34 – 150 ग्राम + झकास – 7 मिली + पोकलॅड २० मिली + ब्लेझ' - 15 मिली किंवा ब्लेझ सुपर - 5 मिली

दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीत पोकलॅडच्या वापराने किडी पूर्णपणे नियंत्रणात रहातात

संपूर्ण शेड्युल आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.
Back to blog