Call 9923974222 for dealership.

सोयाबीन मधील सुतकृमी

महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान राज्यात सोयाबीन मध्ये सुतकृमीची लागण दिसून येते व त्यामुळे १७ ते २० % नुकसान होऊ शकते. सुतकृमींना (निमॅटोड) नेहमिच्या जीवनात जंतु असे संबोधले जाते. परपोशी असल्याने, ते सडणाऱ्या पदार्थात जगतात अथवा जीवंत प्राणी-वनस्पतीचे शोषण करतात. ते सूक्ष्म आणि धाग्यासारखे लांबट असतात व सरासरी लांबी ०.२ ते ०.५ मि.मी. इतकी असते. सुतकृमी उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत, त्यांच्या निरीक्षणासाठी कमी क्षमतेच्या सूक्ष्मदर्शिकेचा वापर केला जातो.

वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे सोयाबीनच्या पानांवर पिवळे-तपकिरी डाग पडले असतील तर सुतकृमीची लागण झाली आहे असे समजावे.  पण हीच लक्षणे इतर इतर कारणामुळे हि दिसू शकतात म्हणून मग मूळ बघावीत. त्यावर गाठी असतील. या गाठी रायझोबियमच्या असायचा गैरसमज होऊ शकतो पण पानाचे व मुळाचे अशी दोघी लक्षणे दिसल्यास सुतकृमी आहे हे नक्की.

या जंतूंमुळे पिक निस्तेज होते, पानांचा आकार लहान होतो, पाने पिवळी पडून वाळतात व पिकाची वाढ खुंटते, तसेच फुले येण्याचा कालावधी लांबतो, प्रादुर्भाव जास्त असेल तर बरेचदा पिक वाळून जाते. ही सर्व लक्षणे अनेक परिस्थितीत (अन्नद्रव्य व पाण्याची कमतरता, मृदेतील दोष जसे क्षारांचे प्रमाण)दिसून येत असल्याने अनेक वेळ निदान चुकीचे होते व आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी अशी अवस्था होते. नुकसान होते. सुतकृमींचा संसर्ग लक्ष न दिल्यास पसरतो व दुरगामी नुकसान करतो. प्रदुर्भावग्रस्त पीक इतर रोगांना लवकर बळी पडते.

सुतकृमी प्रथम विकर स्त्रवतात. हे विकरं पेशींचे विघटन करतात. सुतकृमी या विघटीत पदार्थांचे आपल्या सुईसारख्या तीक्ष्ण अवयवांद्वारे रस शोषण करतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडांची वाढ खुंटते व ते सुकते. सुतकृमींनी इजा केल्यामुळे बुरशी व जीवाणु जन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.

सुतकृमीची मादी सरासरी ९० ते १०० अंडी पुंजक्यानने घालतात. यांच्यामध्ये नर आणि मादी असे दोन प्रकार आढळतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या आखूड, जाड अवस्था नर बनतात; तर लांबट, पातळ अवस्था माद्या बनतात. नर आणि मादी पिल्लाची वाढ चार अवस्थांमध्ये पूर्ण होते.

सुतकृमी नाशके:

सुतकृमी नाशकात मिथाइल ब्रोमाइड, १-३ डायक्लोरोप्रोपेन अशा धुरडण्या, तसेच, थायनोझीन, इथोप्रोफॉस अशा आरगॅनोफाँसफेटस् व अल्डिकार्ब, ओक्सामिल अशा कार्बामटेस् चा अंतर्भाव होतो. ही रासायाने महागडी, पर्यावरणाला घातक तर आहेतच पण तितकिशी प्रभावी देखील नाही.

सुतकृमी नाशकांचा वापर करणे खर्चाचे व अवघड असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना फायद्याची ठरते. अश्या सर्व योजनांचा उद्देश कृमिंचा संपूर्ण नाश करण्यापेक्षा त्यांची संख्या घातक पातळीच्या आत येईल व वाढणार नाही व पुन्हा घातक पातळीच्या वर जाणार नाही असा असावा. जैविक, भौतीक व रासायनिक व्यवस्थापनातील विवीध पद्धतींचा एकात्मिक वापराने हे सहज शक्य आहे.

 • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट कारावी
 • उन्हाळ्यात प्लँस्टिकच्या आच्छादनाने तापमानात चांगली वाढ होउन इतर बुराशिजान्य व जीवणुजन्य रोगांसोबत जंतुंचेपण नियंत्रण होते. तण ही कमी होते.
 • पिकांची फेरपालट करावी.
 • फेरपालट करताना द्विदल पिकानंतर एकदल पिके घेणे फायद्याचे ठरते.
 • निवडलेले, रोगरहीत, प्रतीकारक्षम बियाणे वापरावे.
 • झेंडू पिकाची मुळे सुतकृमीनाशक सोडतात. त्यामुळे पिकांमध्ये झेंडूचे आंतरपीक म्हणून लागवड करावी.
 • निंबोली, एरंडी किंवा करंज पेंड १५०० ते २००० किलो प्रती हेक्टहरी न चुकता वापरावी
 • कंपोस्ट चा वापर करताना ते संपूर्ण कुजलेले असून प्रक्रियेत त्यातील घातक जीवांचा नाश झालेला आहे याची खात्री करावी.
 • कंपोष्ट पसरवण्यापूर्वी त्यात एकरी ३ किलो हुमणासुर मिसळून द्यावे

हुमणासुर हे उत्पादन हुमणीच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. उस उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकरी बांधवानी हुमणासुर वापरून हुमणीवर जबरा नियंत्रण मिळवले. आमच्या अभ्यासावरून हे स्पष्ट आहे कि मातीती वाढणारे जीव जसे हुमणी, निमाटोड, वाळवी या सर्वांवर हुमणासुर अतिशय प्रभावी आहे.

 • सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ज्वारी, ऊस, हळद, आले, मका, मूग, कांदा, भुईमुग इत्यादी पिकांत हुमणासुरचा उपयोग नक्की करावा.
 • "हुमणासुर" जैविक आहे. एकरी ३ किलो चा डोस असून त्याला आपण ड्रीप द्वारे, आळवणीने किंवा चांगल्या कुजलेल्या शेण खतात किंवा कंपोष्ट खतात मिसळून पसरवू शकतो.
 • "हुमणासुर" हुमणीत बुरशीजन्य रोगाची लागण पसरवतो. मेलेल्या किडीच्या किंवा सुतकृमीच्या शरीरातून "हुमणासुर" ची लागण दीर्घकाळ पसरत रहाते.अश्या प्रकारे जमिनीखालील  हुमणी/सुतकृमीचे साम्राज्य  पूर्णपणे उध्वस्त होते.
 • "हुमणासुर" ची मित्रबुरशी मातीत वास्तव्य  करून दीर्घकाळ कार्यरत रहाते, 
 • जितक्या शेतकरी बांधवानी हुमणासुरचा उपयोग केला त्यांच्या शेतात रोगाचा प्रभाव १२ ते १५ दिवसात दिसेनासा झाला. हुमण्यांचे व सुतकृमीचे जमिनीतच खत झाले. पिके पुन्हा एकदा डौल धरू लागली!

हुमणासुर महाराष्ट्रातील सर्व नामांकित कृषीकेंद्रात उपलब्ध आहे, ऑनलाईन खरेदी केली जावू शकते. खाली एक प्री-बुक ऑफर देत आहोत तिचा लाभ घ्यावा, आपले पार्सल सप्टेंबर ८, २०१८ पासून पाठवले जातील.

सोयाबीन उत्पादन वाढीचे सूत्र जाणून घ्यायचे तर हे पुस्तक वाचायलाच हवे. २०१४ साली प्रकाशित झालेल्या, १४४ पानी पुस्तकात सोयबीन बद्दल उत्कृष्ट व उपयोगी माहिती चांगल्या पद्धतीने मांडली आहे. सोयबीन चे पिक घेतल्याने नेमके कोणकोणते फायदे होतात? पिकाच्या वाढीचे विविध टप्पे कसे आहेत?सोयाबीन पासून वेगवेगळ्या कोणत्या पदार्थांची  निर्मिती होते व कशी? कोणकोणती यंत्रसमुग्री लागेल? या व इतर अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दिली आहे. एमेझोन व हे पुस्तक २३० रुपयात उपलब्ध असून खरेदी करण्यसाठी इथे क्लिक करा.

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

सोयबीन वरील कीड व कीडनियंत्रके डेटाबेस खालील टेबलवर बघू शकता. डेटा इंग्रजी आहे, सर्च विंडोचा वापर कुरून बघा.

--------------------

मित्रहो सोयाबीनची चांगली किंमत मिळावी म्हणून आपण प्रयत्न करू शकता. आपल्या उत्पादनाविषयी आमच्या फार्म एक्स्चेंज मध्ये माहिती नोंदवा. त्यासाठी इथे क्लिक करा. 

--------------------

6 comments

 • Sir,
  What is solutions for nematodes control in pomegranate

  Amol Patil
 • अतिशय उपयुक्त माहिती सर्व पिकांबद्दल देतात त्याबद्दल धन्यवाद

  Tukaram thete
 • डाळिंब पिकात सूत्रकृमी करिता हुमनासुर वापरल्यास चालते का

  डॉ दिलीपराव डांगे पाटील
 • सर, गेल्या वर्षी माझा सोयाबिनवर यलो मोझाक आला होता तो या वर्षी येवुनय म्हणुण काय उपाय योजना करावी..

  मंगेश देशमुख
 • अत्यंत उपयुक्त माहिती अडमीन सर नक्कीच शेतकरी बांधवाना याचा फायदा होईल

  नागेश गावंडे

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published