कमी खर्चात मिरची, कापूस व सोयबीन मधील तंबाखू अळी चे नियंत्रण

कमी खर्चात मिरची, कापूस व सोयबीन मधील तंबाखू अळी चे नियंत्रण

तंबाखू अळीचे शास्त्रीय नाव स्पॉडोप्टेरा लिटुरा आहे. या किडीचा प्रकोप तंबाखूत जास्त झाल्याने तिचे असे नामकरण झाले. असे असले तरी हि कीड एरंडी, कापूस, भुईमुग, ज्वारी, मक्का, सोयबीन, केळी, पेरू, वांगी, बिट, कोबी, फुलकोबी, अशा पिकात देखील प्रादुर्भाव करते. 

गेल्या अनेक दशकात आपण एका पेक्षा एक विनाशकारी कीटकनाशक वापरून तंबाखू अळीला नष्ट करायचा प्रयत्न केला आहे. पण असे घडलेले नाही त्यामुळे आता आपण या अळीसोबतच शेती करायला शिकायला हवे. असे करण्यसाठी आपल्याला शेती करण्याच्या पद्धतीत काही बदल करणे आवश्यक आहे. 

किड ओळखायला शिका 

तंबाखू अळी म्हटले म्हणजे फक्त अळीच नसते! प्रत्येक किडीची अनेक रूपं असतात. अनेक वेळेला कीड दिसतच नाही पण त्या किडीने पिकावर काही खुणा सोडलेल्या असतात. हे सर्व माहिती असले तर कीड ओळखता येते. इथे तंबाखू अळीचे काही फोटो देत आहे ते लक्षात ठेवा म्हणजे कीड ओळखता येईल.

 

तंबाखू अळीचा पतंग 

 

पानाखाली तंबाखू अळी पुंजक्यात अंडी देते. त्यावर धाग्याचं आवरण असत

 

 

अंडी पंजातून बाहेर पडणाऱ्या अळ्या. एका पुंजक्यातून अशा हजारो अळ्या निघतात.  


पाने खरवडून खाणाऱ्या छोट्या अळ्या

  

ऑनलाईन ऑर्डर चे फायदे

   • मुख्य गोदामातून नवा स्टॉक पाठवण्यात येतो
   • ऑर्डर दोन दिवसाच्या आत कुरियर कडे पाठवली जाते
   • भारताच्या प्रत्येक गावात ऑर्डर पोहोचवली जाते
   • डिलिवरी मोफत आहे
   • आकर्षक ऑफर दिल्या जातात

आत्ता ऑर्डर करा

 

 

खावून खावून मोठी झालेली हि अळी. इतका आकार होईपर्यंत ती किती पत्ते खावून साफ करत असेल?

 

पानाचे काय हाल केलेत या? फक्त शिराच शिल्लक आहे!

 


तंबाखू अळीचा निद्रिस्त कोष

अळीचे प्रजनन थांबवा!

शेतात फेरफटका मारता मारता तुम्ही कीड किंवा तिच्या खुणा शोधाल पण त्या दिसतीलच असे नाही. दिवसा किडी लपून बसतात व अनेक वेळेला त्या शेजारच्या शेतात वाढतात व अचानकच आपल्या पिकात पसरतात. तंबाखू अळीची प्रजनन क्षमता इतकी जास्त असते कि तिची संख्या हाहा म्हणता वाढते. सहज पणे दिसणाऱ्या मोठ्या अळीपेक्षा अंडीपुजातून बाहेर येणाऱ्या भुकेल्या बारीकशा अळ्या जास्त घातक असतात. त्या अधाश्यासारख्या खात सुटतात. पाने अशी फस्त करतात कि पानगळ झाल्यासारखी पिकाची अवस्था होते. लक्षतात ठेवा तुमच्या शेतात किंवा परिसरातील इतर शेतात वर सांगितलेली पिकं असतील किंवा त्यांची नुकतीच काढणी झालेली असेल तर तंबाखू अळी कोणत्याही क्षणी तुमचा पिकात थैमान घालू शकते.याचा अर्थ असा कि आपल्याला वेळेपूर्वीच काही सूचना मिळायला हवी. त्यासठी आपण तंबाखू अळी साठी बनवलेले खास कामगंध सापळे वापरायला हवीत. सुरवातीला एखादातरी सापळालावावा व त्याचे निरीक्षण करावे त्यात पतंग येवून अडकत असतील तर सापळ्यांची संख्या वाढवावी.  

एक एकर क्षेत्रात जास्तीत जास्त ६-८ सापळे लावावेत. असे केल्याने पतंगांचे मिलन होणार नाही व त्यांचे प्रजनन थांबेल. मादा अंडी देवू शकणार नाही व कीड पिकास नुकसान पोहोचवूच शकणार नाही. 

आपण हे सापळे एमेझोन वरून मागवू शकता. खाली लिंक्स देत आहे त्यावर क्लिक करून खरेदी करा, घरपोच येतील. १० सापळे घेतले तर एकाची किंमत ७० रु पडेल व १०० सापळे घेतले तर एकाची किंमत ४५ पडेल. परिसरातील शेतकऱ्यांनी एकाच वेळी खरेदी केली तर स्वस्त तर पडतीलच, तंबाखू अळीचे देखील नियंत्रण अधिक प्रभावी होईल.   

 

योग्य कीटकनाशक निवडा

जर कोणत्याहि कारणाने तुमच्या शेतात तंबाखू अळी पसरलीच असेल तर कीड नाशक फवारणे आवश्यक आहे. अनेकवेळेला चारपाच कीटकनाशक फवारले, अगदी दुप्पट-तिप्पट डोस वापरला, पण उपयोग झाला नाही असा अनुभव शेतकरी बांधव सांगतात. बहुतेक वेळी चुकीची /डुप्लीकेट कीटकनाशके वापरली जातात. असे होऊ नये म्हणून इथे केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने शिफारस केलेली कीटकनाशक व्यापारी नावासहित देत आहेत. 

 • स्पिनटोराम ११.७ % एस सी. (डेलीगेट) १ मिली प्रती लिटर. काढणीपूर्वी ३० दिवस अगोदर या कीटकनाशकाची फवारणी थांबवावी. 
 • इंडोक्झाकार्ब १५.८ % इसी. (एव्हान्, धावा गोल्ड) ०.६ मिली / लिटर, काढणीपूर्वी ३१ दिवस अगोदर या कीटकनाशकाची फवारणी थांबवावी. 
-------

 

स्पिनटोराम ११.७ % एस सी. (डेलीगेट) १ मिली प्रती लिटरच्या फवारणीने तंबाखू अळी व्यतिरिक्त कापसातील फुलकिडे, बोंडअळी, मिरचीतील फुलकिडे व फळ पोखरणारी अळी यांचे देखील नियंत्रण होते. मिरचीत काढणी सुरु होण्याच्या सात दिवस अगोदर कीटकनाशक वापरणे बंद करावे.  

पिकाचे आरोग्य उत्तम ठेवा

यशस्वी शेतकरी तोच असतो जो आपल्या पिकाचे आरोग्य उत्तम ठेवतो. उत्तम आरोग्य असलेले पिक उत्तम उतारा तर देतेच शिवाय सहजासहजी कीड व रोगांना बळी पडत नाही. उत्तम आरोग्यासाठी पिकाला फक्त भारंभार खते नाही तर खतांचे संतुलन आवश्यक असते. यासाठी खालील मुद्दे लक्षात असू द्या. 

 • मृदेची तयारी करते वेळी एक एकर क्षेत्रात १० किलो मायक्रोडील ग्रेड १ नक्की मिसळा. 
 • पिकाची सुरवातीची वाढ सुरु असताना नत्र-स्पुरद-पालाश एकसारख्या प्रमाणात दिली जायला हवी. आपण अमृत गोल्ड १९-१९-१९ या खताचा वापर करावा. पानांवर काही डाग, चट्टे पडत असतील तर योग्य बुरशी नाशकासोबत मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

 

 • वाढीच्या दुसऱ्या टप्प्यात स्पुरादाचे प्रमाण वाढवायला हवे त्यासठी आपण अमृत गोल्ड १३-४०-१३ चा वापर करावा. याच वेळी आपण अमृत प्लस कीट ची आळवणी करायला हवी.
 • पिक फुलावर यायच्या वेळी अमृत गोल्ड १२-६१-०० व फळ/दाणे भरण्याच्या वेळी अमृत गोल्ड ००-५२-३४ चा वापर करावा. सोबत अमृत गोल्ड १३-००-४५ देखील वापरू शकता. 
 • फळगळ किंवा दाणे पोचे राहू नये म्हणून अमृत गोल्ड ००-००-२३ किंवा अमृत गोल्ड ००-००-५० चा वापर करावा. 

क्षतिग्रस्त पिकाची क्षती भरून काढा

कोणत्याही कारणाने पिकाची हानी होऊ शकते. जसे तंबाखू अळीचा वेळीच अटकाव झाला नाही तर पाने जाळीदार बनतात. पतझड होते. अश्या वेळी पिकाला हानी भरून काढण्यासाठी अतिरिक्त मदत करायला हवी. अशा वेळी आपण फोलीबिओन चा वापर करावा. यात उत्कृष्ट दर्जाचे पाण्यात सहज विरघळून लगेच लागू होणारे प्रथिन आहे.  

सोयाबीनचे  संपूर्ण शेड्युल आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


 

आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

फेसबुक
टेलेग्राम
आपल्याला कोणत्या पिकाचे व्यवस्थापन शेड्यूल हवे आहे का? शेड्यूल मिळवा स्क्रीन वर दिसणाऱ्या बटणावर क्लिक करा.
Back to blog