सोयबीनवर तंबाखू अळी येवू नये म्हणून काय कराल?
तंबाखू अळीचे शास्त्रीय नाव स्पॉडोप्टेरा लिटुरा असे असून या किडीचा प्रादुर्भाव तंबाखू पिकावर नेहमी व मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तिला तंबाखूअळी असे म्हणतात.
वरील फोटोत किडीचा पतंग दाखवला असून आपण त्याचा आकार व त्याचे तपकिरी पंख लक्ष्यात ठेवावे. त्यावरील चट्टे पट्टे वैशिट्य पूर्ण असून किडीची ओळख पटवायला मदत करतील.
किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्याने अंडी घालते. एका पुंजक्यात शेकडो अंडी असतात व प्रत्येक मादी अशे पाच-सहा पुंजके भरू शकते. एकूणच या किडीची प्रजनन क्षमता प्रचंड आहे. नर-मादी ची एक जोडी एका जीवनचक्रात हजारोच्या संख्येने अळ्या जन्मास घालू शकतात.
पुंज्क्यातून काही दिवसातच अळ्या बाहेर पडतात. सुरवातीस समूहाने राहतात, पानाच्या खालचा भाग खरवडून खातात.
मोठ्या झाल्यावर त्या पसरतात व एकएकट्या पाने खातात. पूर्ण वाढलेली अळी खालील फोटोत दाखवली आहे.
मोठ्या अळ्या पानावर मोठे छिद्र पाडून खातात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक राहिलेल्या दिसतात.
फुले व शेंगा लागल्यानंतर शिरादेखील खातात. अळी पाच वेळा कात टाकून 20 ते 22 दिवसांनी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.
कोष लालसर तपकिरी असतात. कोषावस्था आठ ते दहा दिवसांची असते. किडीचा पूर्ण जीवनक्रम 31 ते 33 दिवसांत पूर्ण होतो.
किडीचा पतंग व अळ्या दिवसा सूर्यप्रकाशाच्या वेळी जमिनीमध्ये, पानांखाली लपून राहतात व रात्री बाहेर निघतात. एका वर्षामध्ये या किडीच्या सहा ते आठ पिढ्या तयार होतात.
-----------
कोणत्याही पिकाचे संतुलित पोषण झाले तर त्यावर किडींचा परिणाम कमी होतो हि काळ्यादगडावरील पांढरी रेष आहे. पाटील बायोटेकची उत्पादने वापरल्याने आपले एकरी उत्पन्न तर वाढेलच पण किडींमुळे होणारे नुकसान देखील कमी होईल. इथे काही ऑफर देत आहे आपण त्यांचा लाभ प्रकर्षाने घ्यावा.
----------
नियंत्रण:
या किडीच्या नियंत्रणासाठी या किडीच्या प्रजनन क्षमतेवर वार करायला हवा. एक जोडी हजारोच्या क्षमतेने अंडी घालत असल्याने जर आपण पतंग नियंत्रित केले तर पिकाचे मोठे नुकसान टळेल. यासाठी आपण शेतात कामगंध सापळे लावावेत. हे सापळे एमेझोन वर उपलब्ध आहेत. त्याची खाली लिंक देत असून त्यावर क्लिक करून आपण हे सापळे घरपोच मागवू शकता. १० नगांची किंमत साधारण पणे ७०० रु आहे.
जर हि कीड अगोदच आपल्या पिकात पसरली असेल तर खालील प्रमाणे फवारणी करावी.
- स्पिनटोराम ११.७ % एस सी. (डेलीगेट) १ मिली प्रती लिटर. काढणीपूर्वी ३० दिवसात वापरू नये
- इंडोक्झाकार्ब १५.८ % इसी. (एव्हान्, धावा गोल्ड) ०.६ मिली / लिटर, काढणीपूर्वी ३१ दिवसात वापरू नये
सोयबीन वरील कीड व कीडनियंत्रके डेटाबेस खालील टेबलवर बघू शकता. डेटा इंग्रजी आहे, सर्च विंडोचा वापर कुरून बघा.
Kapus pika sathi mahitee sanga
आपला लेख वाचून आम्ही या पिकावर किडी व्यवस्थित व्यवस्थापन करता येईल