चिकट सापळे वापरून उत्पादन खर्च करा कमी
तुमची शेती कोणतीही असू द्या, (कडधान्य, डाळी, तेलबिया, फळभाज्या, भाजीपाला, फुलशेती, फळशेती, मसाला पिके, औषधी पिके, शोभेची पिके किंवा अन्य काही) रससोशक किडी (जसे मावा, तुडतुडे, फुलकिडे, ढालकिडे, नागअळी, टोळ, नागतोडे, चिलटे, मच्छर, भुंगेरे, भुंगे, पांढरी माशी व असे अनेक) पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पिकावर हल्ला करून आपल्यासमोर समस्या निर्माण करतात.
चोरपावलांनी शेतात येणारया रससोशक किडींची पुनरुत्पादन शक्ती चांगली असते त्यामुळे कमी कालावधीत या किडी अवघे पिक कवेत घेवू शकतात. यामुळे एकीकडे पिकाच्या वाढीचा वेग तर मंदावतोच पण यांनी केलेल्या घावातून बुरशीजन्य रोगाची लागण होते. एका ठिकाणून दुसरीकडे उडत-उडत या किडी विषाणूजन्य रोग देखील मोठ्या प्रमाणात पसरवतात.
या पिकांचे रससोषक किडींपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी अनेक रासायनिक कीडनाशकांची फवारणी करतो. पण किडनाशाकांचा दुय्यम दर्जा, चुकीचा वापर, किडीमध्ये निर्माण झालेली प्रतिकार शक्ती या मुळे रससोषक फवारण्यांचा हवा तसा उपयोग होत नाही. निर्यात प्रक्रियेत जर उत्पादनात औषधाचे अवशेष आढळून आले तर उत्पादन दुय्यम बाजारात कमी किमतीत विकावे लागते. अनियंत्रित कीटनाशक वापरल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा औषधाशी संपर्क वाढतो व यातून त्याला आरोग्याच्या समस्यांना समोरे जावे लागते. पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो वेगळा.
एकूणच कीडनियंत्रण हा अचूक व्यवस्थापनाचा भाग आहे. आपल्या शेतात कोणकोणती कीड आहे? तिचे सर्वसाधारण प्रमाण किती आहे? सुरवातीला जेव्हा किडींचे प्रमाण कमी असते तेव्हा नियंत्रण करायची चांगली पद्धत कोणती? या प्रश्नांची उत्तरे कीडनियंत्रणासाठी महत्वाची आहेत.
पाटील बायोटेक प्रा. ली. ने पिकांच्या संरक्षणासाठी चिकट सापळ्यांच्यारुपात पर्यावरणपूरक व किफायतशीर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. निळ्या व पिवळ्या रंगातील हे सापळे जागतिक सेंद्रिय मानकानुसार तयार केले आहेत.
आमचे चिकट सापळे पोलीप्रोपिलीन करूगेटेड शीट पासून बनवले जातात. हे मजबुतीने चांगले असून त्याच्या दोघी पृष्ठभागांवर घट्ट सेंद्रिय गोंद लेपलेला आहे. सुरवातीला दोघी हातांवर घरगुती वापराचे कोणतेही तेल चोळून घ्यावे. यामुळे तळ हाताला सापळे चीटकणार नाहीत. प्रत्येक बंडलात १० सापळे आहेत. बंडला वरील वेष्टन काढून टाकावे. सर्व प्रथम वरच्या बाजूचे पारदर्शक आवरण काढून टाकल्यावर, चिकट सापळा ओढून काढावा. प्रत्येक सापळ्याला दोन छिद्र असून, काडी/काठी ला दोरा/सुतळी ने बांधण्यासाठी याचा वापर करावा. योग्य ठिकाण निवडून काडी/काठी जमिनीत खोचून सापळा उभा करावा. सापळ्याची उंची पिकाच्या वर ठेवावी. वाढत्या पिकासोबत सापळ्याची उंची वाढवावी.
हरितगृहात सापळे लावतांना, दरवाजे व तावदानांजवळ जास्तीचे सापळे बसवावे जेणे करून निरीक्षण सहजपणे होईल.
विशीष्ट पिवळ्या व निळ्या शेड मुळे किडे सापळ्याकडे आकर्षित होतात. विशीष्ट रंगामुळे किडींना हि नवीन पालवी असल्याचा भास होतो. एकदा सापळ्यावर बसले कि कीड अडकते. अन्नग्रहण व प्रजनन थांबते. प्रजनन थांबल्याने किडीची संख्या नियंत्रित होते. पाटील बायोटेक चे हे चिकट सापळे आता आपल्या पिकाचे शक्य तितके दिवस, अहोरात्र संरक्षण करतील.
रचनात्मक वापर
किडींचे प्रकार व संख्येचे निरीक्षण करण्यासाठी एकरी सहा सापळ्यांचा उपयोग करावा. या माहितीच्या आधारे कीडनियंत्रण कसे केल्याने कमीतकमी खर्चात अधिकाअधिक फायदा होईल असे नियोजन केले जावू शकते. सापळ्यांच्या माध्यमातून कीड नियंत्रण करायचे असल्यास एकरी १२ ते १८ सापळे वापरावे. जर कीड नियंत्रणाबाहेर जात असेल तर सापळ्यांची संख्या वाढवत जावी. जेव्हा संपळ्याचा पृष्ठभाग किडींनी भरून जाईल तेव्हा, नवीन सापळे वापरात घ्यावे.
------------------------------------------------------
शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके. वरील फोटोवर क्लिक करून अधिक माहिती मिळवा.
सापळ्यांचे वैशिठ्य
- न सुकणारे
- टिकवू रंगाचे
- न गळणारे
- वाऱ्यावर टिकणारे
- पाण्यात टिकणारे
- तापमान सहन करणारे
- दोघी पृष्ठभागावर चिकट
- दुरूनच किडींना आकर्षून घेणारे
- करूगेटेड – मजबूत बांधा
चिकट सापळ्यांचा उपयोग खालील ठिकाणी करता येतो
- सेंद्रिय शेती
- नियमित शेती
- आमराई
- हरितगृह
- चहा-कॉफीचे मळे
- परसबागा
- रोप वाटिका
- मशरूम उद्योग
- कुक्कुटपालन
मित्रहो, हा लेख वाचून आपल्याला काही उपयोगी माहिती मिळाली का? काय अडचण वाटते? आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.
thank u sir it very helpful for us and useful also
निळा व पिवळा चिकट सापळा कोनत्या किडी साठी ऊपयोग होतो निळा कशासाठी व पिवळा कशा साठी ही माहीती दयावी
खुप छान माहिती
खुप छान माहिती आम्ही नेहमी वापरेल्या आहेत
mast
tumchya whatsappla add kra