यलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप

English

उभ्या पिकांचे रससोषक किडींपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी अनेक रासायनिक कीडनाशकांची फवारणी करतो. पण हि कीडनाशके माणसासाठी व पर्यावरणासाठी अतिशय घातक सिद्ध होत आहेत. पाटील बायोटेक प्रा. ली. ने पिकांच्या संरक्षणासाठी पर्यावरणपूरक व किफायतशीर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सादर आहेत रंगीत चिकट सापळे, निळे व पिवळे. हे सापळे जागतिक सेंद्रिय मानकानुसार तयार केले आहेत.

वाय एस टी व बी एस टी च्या वापरातून शेतकरी अनेक रससोषक किडींना नियंत्रणात ठेवू शकतो जसे मावा, तुडतुडे, फुलकिडे, ढालकिडे, नागअळी, टोळ, नागतोडे, चिलटे, मच्छर, भुंगेरे, भुंगे, पांढरी माशी व असे अनेक.

वापराची पद्धत:

आमचे चिकट सापळे पोलीप्रोपिलीन करूगेटेड शीट पासून बनवले जातात. हे मजबुतीने चांगले असून त्याच्या दोघी पृष्ठभागांवर घट्ट सेंद्रिय गोंद लेपलेला आहे. सुरवातीला दोघी हातांवर घरगुती वापराचे कोणतेही तेल चोळून घ्यावे. यामुळे तळ हाताला सापळे चीटकणार नाहीत. प्रत्येक बंडलात १० सापळे आहेत. बंडला वरील वेष्टन काढून टाकावे. सर्व प्रथम वरच्या बाजूचे पारदर्शक आवरण काढून टाकल्यावर, चिकट सापळा ओढून काढावा. प्रत्येक सापळ्याला दोन छिद्र असून, काडी/काठी ला

दोरा/सुतळी ने बांधण्यासाठी याचा वापर करावा. योग्य ठिकाण निवडून काडी/काठी जमिनीत खोचून सापळा उभा करावा. सापळ्याची उंची पिकाच्या वर ठेवावी. वाढत्या पिकासोबत सापळ्याची उंची वाढवावी. हरितगृहात सापळे लावतांना, दरवाजे व तावदानांजवळ जास्तीचे सापळे बसवावे जेणे करून निरीक्षण सहजपणे होईल. विशीष्ट पिवळ्या व निळ्या शेड मुळे किडे सापळ्याकडे आकर्षित होतात. विशीष्ट रंगामुळे किडींना हि नवीन पालवी असल्याचा भास होतो. एकदा सापळ्यावर बसले कि कीड अडकते. अन्नग्रहण व प्रजनन थांबते. प्रजनन थांबल्याने किडीची संख्या नियंत्रित होते. पाटील बायोटेक चे हे चिकट सापळे आता आपल्या पिकाचे शक्य तितके दिवस, अहोरात्र संरक्षण करतील.

रचनात्मक वापर

किडींचे प्रकार व संख्येचे निरीक्षण करण्यासाठी एकरी सहा सापळ्यांचा उपयोग करावा. या माहितीच्या आधारे कीडनियंत्रण कसे केल्याने कमीतकमी खर्चात अधिकाअधिक फायदा होईल असे नियोजन केले जावू शकते. सापळ्यांच्या माध्यमातून कीड नियंत्रण करायचे असल्यास एकरी १२ ते १८ सापळे वापरावे. जर कीड नियंत्रणाबाहेर जात असेल तर सापळ्यांची संख्या वाढवत जावी. जेव्हा संपळ्याचा पृष्ठभाग किडींनी भरून जाईल तेव्हा, नवीन सापळे वापरात घ्यावे.

सापळ्यांचे वैशिठ्य

 1. न सुकणारे
 2. टिकवू रंगाचे
 3. न गळणारे
 4. वाऱ्यावर टिकणारे
 5. पाण्यात टिकणारे
 6. तापमान सहन करणारे
 7. दोघी पृष्ठभागावर चिकट
 8. दुरूनच किडींना आकर्षून घेणारे
 9. करूगेटेड – मजबूत बांधा

चिकट सापळ्यांचा उपयोग खालील ठिकाणी करता येतो

 • सेंद्रिय शेती
 • नियमित शेती
 • आमराई
 • हरितगृह
 • चहा-कॉफीचे मळे
 • परस बागा
 • रोप वाटिका
 • मशरूम उद्योग
 • कुक्कुटपालन

चिकट सापळ्यांचा उपयोग विविध पिकात करता येतो

 • कडधान्य
 • डाळी
 • तेलबिया
 • फळ
 • भाजीपाला
 • फुलशेती
 • मसाला पिके
 • औषधी पिके
 • शोभेची पिके
 • वने व कुरणे

यलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप माफक किमतीत मिळवण्यासाठी इथे क्लिक करा