यशाची व्याख्या काय?

जगात कुणी "अपयश" मागत नाही. कुणी कितीही बाळबोधअसो, भोळा असो किंवा हुशार असो प्रत्येकाला "यश" हवे आहे.  जो यशाची आशा सोडतो तो  "अपयशी" ठरतो. जो अनुभवातून शिकायला तयार नसतो तो अपयशी ठरतो.

अपयश मानण्यात असते. अपयशाचे चटके पचवून, त्यातून धडा घेवून (सुधारणा करून) प्रयत्न करणारे, काही ना काही प्रमाणात यश मिळवतात हे नक्की.

यशात नशिबाचा मोठा हात असतो. खरच तस असते का? कुठलाही प्रयत्न न करता यश मिळवता येत का? अनेकांच्या लेखी "श्रीमंती" म्हणजे यश असते. वाड-वडिलांकडून संपत्ती मिळालेल्या श्रीमंत व्यक्तीलापण यशाचा शोध असतो का? त्याला एखादी सुंदर स्त्री पत्नी म्हणून प्राप्त झाली तर तो यशस्वी ठरतो का? इतक्या नशिबवान माणसाचा देखील यशाचा शोध सुरूच रहातो का?

सचिन तेंडूलकरने इतके विक्रम मोडीत काढले व इतके विक्रम रचले कि तो क्रिकेटचा देव झाला. मान-सन्मान, पैसा, विलक्षण कुटुंब यांचा तो  धनी आहे. आपले सर्व यश त्याने आईच्या चरणी वाहिले. विचार करा या क्षणाला सचिनला कुठल्या यशाचा शोध असेल?

ए पी जे अब्दुल कलाम हे नाव ठावूक नसलेला माणूस असेल का? आघाडीचे शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती व अफाट लोकप्रीयता प्राप्त झालेलं हे व्यक्तिमत्व. त्यांनी द्रव्य संचय केला नव्हता, संसार देखील केला नव्हता.  त्यांनी मिळवलेले यश "आपल्या यशाच्या व्याख्येत बसते का?

एक शेतकरी म्हणून यश-अपयशाचे काय मापदंड आहेत? एक शेतकरी म्हणून आपली यशाची व्याख्या काय?

  1. एखाद्या हंगामात विक्रमी उत्पन्न मिळवून प्रचंड नफा मिळवणे म्हणजे यश आहे का?
  2. प्रत्येक हंगामात चांगले उत्पन्न मिळवत जमिनीचा तुकडा मोठा करणे म्हणजे यश आहे का?
  3. अधिकाअधिक दर्जेदार व वाढते उत्पन्न मिळवून, आपल्या यशात इतर शेतकरी बांधवांना सामील करून घेणे म्हणजे यश आहे का?

उत्कृष्ट दर्जाची नवनवीन कृषी अवजारे बघण्यासाठी व खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.