Call 9923974222 for dealership.

रस शोषण करणाऱ्या किडींचे नियंत्रण करा पूर्व नियोजनातून

प्रत्येक पिकावर कोणती न कोणती रस सोषक कीड येतेच. या किडींच्या माध्यमातून विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो, पिकाची वाढ खुंटते व नाहक नुकसान होते.

रस शोषक किडी: मावा, तुडतुडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकुण, लाल कोळी, फुल कीड, खवले कीड इ.

लक्षणे: या किडी मुख्यता पानाच्या खालच्या बाजूस राहून तसेच झाडाच्या कोवळ्या भागातून व फळातून रस शोषण करतात.

नुकसान टाळायचे असेल तर नियंत्रणाचे पूर्व नियोजन करणे फायद्याचे आहे.  पिकात एकरी १० ते २० यलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप लावावेत, त्यावर किडी चिकटल्याने मुळे प्रजनन होत नाही, किडींच्या सुरवातीच्या पिढ्यांचे जीवनचक्र हळू फिरते व संख्या नियंत्रणात रहाते.

 

जेव्हा पिकात भरपूर रसरशित पणा असतो त्याच काळात अरेना चोकलेट ची फवारणी केली तर पिकाच्या मऊ भागावर लीग्नीफिकेशन होते. मऊपणा कमी होतो त्यामुळे रसशोषक किडींचे जबडे नीट काम करू शकत नाहीत व त्यांना रस शोषणे कठीण होऊन बसते व परिणामी संख्या नियंत्रणात रहाते.

एव्हडे करूनही कीड नियंत्रण होत नसेल तर वातावरण अधिक पूरक असणे किंवा परिसरातील इतर शेतात अधिक प्रादुर्भाव असण्याची शक्यता असते. अश्या वेळी किडींची संख्या ठराविक मर्यादेत असतानाच कीडनाशकाचा वापर झाल्यास फवारण्याची संख्या कमी करता येते, त्यांचे अंश कमी होतात, पर्यावरणीय हानी कमी होते, मजुरी खर्चात मोठी बचत होते.

एकच एक कीटकनाशक वापरण्या ऐवजी नियमित पणे ते बदलत राहावे जेणे करून किडीत कीडनाशका विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही व कमी तीव्रतेच्या फवारणीतच किडी नियंत्रणात येतील.  एकच एक कीटकनाशक पुन्हा पुन्हा वापरले कि किटकातील जी उपजात कीटनाशकाला प्रतिकार करू शकते तिची संख्या वाढते, जर आपण त्याच एका कीटकनाशकाची तीव्रता वाढवत राहिलो तर कालांतराने संपूर्ण कीड कीटकनाशकाला प्रतिकार करते व फवारणी चा कोणताच फायदा होत नाही. यालाच "पेस्टीसाइड ट्रेडमिल (चक्की)" म्हणतात. अश्या पेस्टीसाइड ट्रेडमिल मुळे शेतकऱ्यास आर्थिक फटका बसतो, निसर्गाचे नुकसान होते, तेव्हा कीटकनाशक आळीपाळी ने बदलणे आवश्यक आहे

आमची उत्पादने मिळण्यात अडचण असेल तर वर दिलेल्या नंबरवर व्हाटसअप करा

रासायनिक कीटकनाशके:

 • कार्बोफ्युरान ३ जी (स्पर्शजन्य, पोटविष,सौम्य आंतरप्रवाही) मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी,
 • कार्बोसल्फान २५ ई.सी. (स्पर्शजन्य, आंतरप्रवाही) मावा, तुडतुडे व फुलकिडे
 • फेनोब्यूकार्ब ५० ई.सी. (स्पर्शजन्य) तुडतुडे
 • अॅसीफेट ७५ एस.पी. (आंतरप्रवाही, स्पर्शजन्य, पोटविष) मावा, तुडतुडे,
 • क्लोरोपायरीफॉस २० ई.सी. (स्पर्शजन्य, पोटविष व धुरीजन्य) मावा, तुडतुडे, पांढरी माशी, खवले कीड
 • डायक्लोरव्होस ७६ ई.सी. (स्पर्शजन्य, पोटविष व धुरीजन्य) तुडतुडे
 • डायमिथोयट ३० ई.सी. ( स्पर्शजन्य, पोटविष व आंतरप्रवाही) मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, कोळी, पिठ्या ढेकुण
 • इथीऑन ५० ई.सी. ( स्पर्शजन्य) मावा, फुलकिडे, कोळी, पांढरी माशी.
 • मेलॅथीऑन ५० ई.सी. (स्पर्शजन्य, पोटविष) मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, खवले कीड.
 • मिथाइल पॅराथिऑन ५० ई.सी. (स्पर्शजन्य) मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, कोळी, पिठ्या ढेकुण

  अतिरिक्त नत्राच्या मात्रे मुळे कसे नुकसान होते हे समजावून सांगत आहे पाटील बायोटेक चे डीजीएम श्री. अमोल पाटील. तेव्हा हा व्हिडीओ पाहायला विसरू नका.

    

  प्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

  तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

  इथे क्लिक करा.

   

  आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

  15 comments

  • Nice information useful for me.
   Thanks.

   Nandkishor Goley
  • चिकट सापळे पाहिजे

   पुरूषोत्तम लशमन आशेगावकर
  • Theron किटकनाशक चा उपयोग कशासाठी आहे वपंपाला प्रमाण काय घ्यावे

   शांताराम नारायण संसारे
  • Chhaan

   Kiran kadre
  • किड नाशक रासायनिक

   Nitingawande

  Leave a comment

  Name and Mobile number .
  .
  Message with Address, District & Pincode .

  Please note, comments must be approved before they are published