Call 9923974222 for dealership.

या उसाला झालय तरी काय?

उस उत्पादक शेतकरी बांधवांचे पाटील बायोटेकच्या या ब्लॉगवर स्वागत आहे. यापूर्वी आपण उसावरील आमचे चार लेख वाचले आहेत.

जर काही कारणाने आपण ते लेख वाचले नसतील तर आता वाचायला  विसरू नका.

प्रत्येक पिकास पोषणाची गरज असते त्याच प्रमाणे ती उसालाही असते. खर सांगायचं तर उसाला पोषणाची खूप जास्त गरज असते कारण... 

 • हे एक मोठ्या कालावधीचे पिक आहे
 • मोठ्या प्रमाणात "बायोमास" उत्पादन करते, गेल्या काही वर्षात एकरी उत्पादन क्रमाने वाढते आहे.

उसाच्या खादाड वृतीचा परिणाम मृदेला सहन करावा लागतो. मृदेत सर्वकाळ सर्व पोषक तत्वे हव्या तितक्या प्रमाणात उपलब्ध नसतात. त्यामुळे ती पिकाचे पोषण उत्तम प्रकारे करू शकत नाही. याचा परिणाम पिकावर होतो. पिकावर कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. अनेक वेळेला शेतकरी बांधवांना याची जाणीव नसते. पिकातील लक्षणे लक्षात न आल्याने तो भांबावतो व वेगवेगळे प्रयोग सुरु करतो. खर्च तर वाढतोच, वेळ वाया जातो व पिकात योग्य ती सुधारणा देखील होत नाही. कमजोर पडलेले पिक निरनिराळ्या रोग-किडींना बळी पडते. त्यामुळे अन्नद्रव्य कमतरता सुरवातीलाच ओळखता यायला हवी. इथे फोटोसहित माहिती देत आहे. आपण त्याचा अभ्यास करून, कमतरता वेळीच ओळखू शकता व योग्य ती सुधारणा देखील  करू शकता. 

 

वरील फोटोत नत्र कमतरतेची लक्षणे दिसत आहेत. यावर उपाय न केल्यास जुन्या पानांचे काठ व टोक जळते. नवीन पाने पिवळी पडतात. बुंधा बारीक होतो  

दोन नंबरच्या फोटोत स्पुरद कमतरता दिसून येत आहे. पानाचे काठ व टोक तांबडे-जांभळे दिसते. पाने बारीक होतात. उपमुळे तयार होत नाहीत त्यामुळे उसाचे पोषण बिघडते. 

या दोन चित्रात पोटाशची कमतरता दिसून येत आहे. पानाचे काठ पिवळे-नारंगी दिसू लागतात. जुनी पाने तपकिरी दिसतात. 

 

--------------------------------
-------------------------------

 

वरील तिन्ही पैकी कोणतीही समस्या आपल्या पिकात दिसून आल्यास आपल्या पिकात एन-पी-के असंतुलन झाले आहे हे समजावे. यावर उपाय करण्यसाठी आपण अमृत गोल्ड एनपीके  या वाटर सोल्युबल खतांचा उपयोग करावा जेणे करून एक कमतरता जावून दुसरी निर्माण होणार नाही.

पानाच्या टोकावर व काठावर तपकिरी डाग दिसणे, गंज लागल्या प्रमाणे दिसणे व साल आतून तपकिरी पडणे हि मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे आहेत.

पाटील बायोटेकचे ह्युॅमग वापरायला आपण विसरले असणार! 

कॅल्शियम ची कमतरता असली तर जुन्या पानांवर पिंगट ठिपके पडतात. वाढीच्या टोकावरील पानांची टोके व काठ जळतात. जुनी पाने गंजलेली दिसतात व ती वेळे अगोदर सुकून जातात

पाटील बायोटेकचे कॅलनेट वापरा! यात कॅल्शियम सोबत अमिनो व नायट्रेट स्वरुपात नत्र असते जे कॅल्शियमचे मुळाद्वारे शोषण व पानातील वहन सोपे बनवते. कमतरता लगेच भरून निघते. 

 

 

--------------------------------
-------------------------------

 

गंधकाची कमतरता लगेच ओळखून येते. नवीन पाने पिंगट असतात त्यात हरिकलवक निर्माण होत नाही. पाने अरुंद व छोटी रहातात, त्यावर जांभूळकि छटा दिसते. सोटा बारीक दिसतो. अमृत गोल्ड एस ओ पी ००-००-५०अमृत गोल्ड पोटॅशियम शोनाईट ००-००-२३ या खतात गंधक सल्फेट स्वरुपात उपलब्ध असते तर रीलीजरप्लस मध्ये ९० टक्के शुद्ध  गंधक उपलब्ध असते. पिकाच्या वाढीच्या स्थितीनुसार आपण योग्य त्या खताची निवड करून गंधकाची कमतरता भरून काढू शकता.  

 

लोहाच्या कमतरतेच्या प्रमाणात पिंगटपणा स्पष्ट दिसतो. पानांच्या शिरामधील भाग टोका पासून खालपर्यंत पांढरा पडतो. कमतरतेच्या प्रमाणानुसार व पिकाच्या अवस्थे नुसार उपाय योजना आखायला हवी.

मायक्रोडील एफई-इडीटीए हे खत तत्परतेने लागू पडते. वाढीच्या स्थितीनुसार आपण ते फवारणीतून किंवा ठिबकद्वारे देऊ शकता. 

कमतरता तिव्र स्वरूपातील असेल तर मायक्रोडील एफई-इडीटीए च्या पाठोपाठ अमृतप्लस ड्रेंचींग कीट एकरी एक द्यावी जेणेकरून भूसुधार होऊन मृदेतील लोह शोषला जाईल. 

 

तांब्याची कमतरता कमी प्रमाणात जाणवते. फिक्कट हिरव्या रंगाचे चट्टे पडतात. कालांतराने काही ठिकाणचा रंग उडतो. सोटा व वाढीचे टोक मलूल पडते. पेर छोटा दिसतो. मोरचुदिचा वापर सांभाळून करावा कारण याची पिकास बाधा देखील होऊ शकते.

मायक्रोडील सुपर मिक्स द्यावे.

 

या नवव्या चित्रात बोरानची कमतरता दिसून येत आहे. पाने विस्कळीत होतात. पानाचे काठ काही प्रमाणात पारदर्शक दिसतात. उपमुळे ठिसूळ होतात व मेरीस्टेम (वाढीचे टोक) मरून जाते. 

मायक्रोडील बोरोन ट्वेंटी पाण्यात १०० टक्के वीरघळते. त्यात २० % बोरान असून कमतरता लगेच दूर करते. 

 

झिंकची कमतरता लगेच लक्षात येते. मधली शिरा व काठ हिरवे रहातात व उर्वरित भाग पिवळा रहातो शिवाय पानावर लाल डाग उठून दिसतात. पेर छोटे रहातात. उसाचा दांडा मलूल पडतो. 

मायक्रोडील झेडएन-इडीटीए हे खत तत्परतेने लागू पडते. वाढीच्या स्थितीनुसार आपण ते फवारणीतून किंवा ठिबकद्वारे देऊ शकता.

 

मॅगनीजची कमतरता असेल तर पानाच्या टोकापासून मध्या पर्यंतचा भाग पिंगट पडतो. जर कमतरता तीव्र असेल तर पानाचा रंग उडतो.  हि कमतरता क्वचितच दिसून येते व भरून काढण्यासाठी  मायक्रोडील सुपर मिक्स द्यावे.

मोलाब्दाची कमतरता देखील क्वचितच दिसून येते. पानाचा टोकाकडील तिसरा हिस्यावर पिंगट रेषा उमटतात. सोटा बुटका व बारीक रहातो. वाढ खुंटते.हि कमतरता भरून काढण्यासाठी  मायक्रोडील सुपर मिक्स द्यावे.

  

----------------------
--------------------- 

 

उसावरील आमचे अन्य लेख वाचायला विसरु नका

 

संदर्भ:

3 comments

 • Happy new year 2020

  Shahaji waghmare patil
 • very good information I like it thanks to help farmers

  subtask jugale
 • Your products are very nice.

  Bhagavat gangadhar Wagh

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published