सप्टेंबर मध्ये येणारा उसावरील कोळी

शेतकरी मित्रहो, पाटील बायोटेक द्वारा संचालित या ब्लॉगवर आपण यापूर्वी भाजीपाल्यात येणाऱ्या लालकोळ्याब्द्द्ल वाचले असेल. पण उसात येणारा हा कोळी वेगळ्या प्रजातीचा आहे. याचे शास्त्रीय नाव ओलीगोनीखस सेखेरी (Oligonychus sacchari) असे असून हा पावसाळी वातावरण कमी झाले  कि दिसून पडतो. 

वाऱ्यावर पसरणारा हा कोळी पानाच्या खालच्या बाजूने नाजूक धाग्यांचे जाळे विणतो. याने केलेल्या रसशोषणामुळे पानावर लाल डाग दिसतात. कालांतराने हे लाल डाग वाढत जावून एकमेकात मिसळतात. पाने दुरूनच लाल दिसू लागतात. प्रादुर्भाव वाढल्यास पाने व उस कोरडा पडू लागतो व मोठे नुकसान होते. 

उसाप्रमाणेच या कोळ्याचा प्रादुर्भाव मका, ज्वारीकेळीत देखील दिसून येतो. एक पिढी कमीत कमी ४ ते ५ दिवसांची असू शकते. छोट्या व एकापाठोपाठ पिढ्या व जास्त अंडी देण्याची क्षमता यामुळे या किडीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. तसेच त्यांच्यामध्ये कीटकनाशकाची प्रतिकारक्षमताही निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

या किडीच्या नियंत्रणासाठी हे लक्षात असू द्या

 • हि कीड उबदार-कोरड्या हवामानात वेगाने पसरते
 • पाउस आणि आद्रता या किडीला त्रासदायक असते, तुषारसिंचनातू या किडीचे नियंत्रण होऊ शकते
 • पिकास उगाच अतिरिक्त नत्र देवू नये
 • आसपासच्या परिसरातील उस, मका, ज्वारी व केळी तून हि कीड आपल्या पिकात घुसखोरी करते
 • सेंद्रिय कीटकनाशकासाठी आमच्या प्रतिनिधीला संपर्क साधावा

रासायनिक किडीनियंत्रण

 • मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही-सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन
 • प्रोपारगाइट ५७ % इसी. (ओमाइट, माइटकिल, माष्टामाइट, सिम्बा) २ मिली प्रती लिटर दराने फवारावे. तोडणी सूर व्हायच्या ६ दिवस अगोदर हे कीटकनाशक वापरू नये
 • स्पीरोमीसीफेन २२.९% एस सी (ओबेरॉन) किंवा स्पीरोटेट्रामॅट ११.०१ + इमिडाक्लोप्रीड ११.०१% एस सी हे  कोम्बो कीटकनाशक  १ मिली प्रती लिटर च्या दराने तोडणीच्या तीन दिवस अगोदर पर्यंत फवारणी करू शकता.  
 

 

संदर्भ

 • केंद्रीय कीटकनाशक बोर्ड
 • भारतीय कृषी अनुसंधान परिषद
 • कृषीविभाग, पश्चिम बंगाल