ऊसकीड नियंत्रण

ऊसकीड नियंत्रण

उसावर येणाऱ्या विविध किडी व त्यांचे व्यवस्थापन या बद्दल ची माहिती संकलित करून देत आहोत. काही प्रश्न असल्यास कॉमेंट मध्ये विचारू शकता.

खोडकिडा

 

ऊसावरील खोडकिडा : अळी भुरकट रंगाची असून खोड पोखरते व त्यामुळे ऊसाचा शेंडा वाळून जातो. व्यवस्थापनासाठी ऊस लागवडीच्या वेळी कार्बारिल ४ टक्के दाणेदार कीडनाशक जमिनीत मिसळावे व नंतर बेणे लावावे.

खोडकिडा नियंत्रणासाठी

 • क्लोरानट्रानिप्लोर १८.५ एस सी ५ ते ५.५ मिली प्रती लिटर दराने तोडणीच्या ६ महिने अगोदरपर्यंत वापरावे किंवा 
 • क्लोरपायरीफोस २० % इसी. २२.५- ४५ मिली प्रती १५ लिटर दराने फवारावे किंवा 
 • फीप्रोनील ५ % एस सी ४५ ते ६० मिली प्रती १५ लिटर पंप. तोडणीच्या ९ महिने अगोदर उपयोग बंद करावा किंवा
 • थायमेथोक्झाम ७५ % एसजी २.४-४.८ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ७ महिने अगोदर वापर बंद करावा.
  ----------------------
  --------------------- 

 शेंडा पोखरणारी अळी

 

अळी पिवळसर असते. ती प्रथम पानाच्या मुख्य शिरात शिरते व शेंडयाकडे पोखरत जाते,त्यामुळे शेंडा मरतो व ऊसास अनेक फुटवे फुटतात.

नियंत्रणासाठी

 • क्लोरानट्रानिप्लोर १८.५ एस सी ५ ते ५.५ मिली प्रती लिटर दराने तोडणीच्या ६ महिने अगोदरपर्यंत वापरावे किंवा 
 • क्विनॉलफॉस २५ ईसी ३० मि. लि. प्रती १५ लि. पाण्यात मिसळूनफवारावे. दोनआठवडयाच्या अंतराने दुसरी व तिसरी फवारणी करावी.

 


पानावरील तुडतुडे (पायरीला): अपूर्ण अवस्थेतील तुडतुडे रंगाने दुधी असून पूर्ण वाढलेले तुडतुडे पिवळसर असतात.डोके टोकदार असते. तुडतुडे पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषून घेतात, त्यामुळे पाने पिवळी

पडून सुकतात व ऊसातील साखरेचे प्रमाण घटते. व्यवस्थापनासाठी खाली दिल्याप्रमाणे औषधे अदलून-बदलून फवारणी करावी. १५ दिवसांनी फवारणी रिपीट करावी. 

 • क्लोरपायरीफोस २० % इसी. २२.५- ४५ मिली प्रती १५ लिटर दराने फवारावे किंवा
 • डायमेथोएट ३० ईसी १ मिलि प्रती लिटर
 • मॅलाथियॉन ५० ईसी ०.८५ मिलि प्रती लिटर
 • क्विनॉलफॉस २५ ईसी १.२ मिलि प्रती लिटर
 • फेनिट्रोथिऑन ५० ईसी ०.६  मिलि प्रती लिटर

या किडीसाठीजरी किटकनाशके उपयुक्त असली तरी वाढलेल्या उसात शिरता येत नसल्यामुळे फवारणी अथवा धुरळणी करणेअशक्य होते. तेंव्हा इपिरीकेनीया (एपीपायरोप्स) मेलॅनोल्युका या परोपजीवी किटकाचे कोष सुमारे ५००० प्रति हे.किंवा ५ लाख अंडी पायरीलाग्रस्त शेतात सोडावेत.


देवी अथवा खवले कीड: कीड फिक्कट काळसर असून ऊसाच्या कांडीवर पुजंक्यात आढळते. अपूर्ण व

पूर्णवाढलेली कीड कांडयातील रस शोषून घेतात. त्यामुळे ऊस निस्तेज होतो, कांडया बारीक बारीक पडतात व साखरेचेप्रमाण घटते. व्यवस्थापन : ऊस कापणीनंतर पाचट, धसकटे इत्यादी जाळून टाकावे. मॅलेथीऑन ५० ईसी २००० मिलि किंवा डायमिथोएट ३० ईसी २६५० मिलि १००० लिटर पाण्यात मिसळून फवारण्या कराव्यात. ऊस लावतेवेळी बेणे डायमिथोएट ३० ईसी २६५ मिलि किंवा मॅलाथिऑन ५० ईसी २०० मिलि १०० लिटर पाण्यात मिसळून होणा-याद्रावणात बुडवून लावावे.

पांढरी माशी : बाल्यावस्थेत ही कीड सुरुवातीस पिवळसर व नंतर काळसर करडया रंगाची दिसते. तसेच तिच्याकडेला पांढ्यया रंगाचे तंतू दिसतात. कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून रस शोषण

करते. नत्रयुक्त खताचे प्रमाण कमी करावे. अतिप्रादुर्भावग्रस्त शेतातील काळेकोष असलेली पाने काढून खाली दिल्याप्रमाणे औषधे अदलून-बदलून पिकावर फवारणी करावी. १५ दिवसांनी फवारणी रिपीट करावी. 

 1. डायक्लोरोव्हास ७६ ईसी १ मिलि प्रती लिटर
 2. क्विनॉलफॉस २५ ईसी १.६ मिलि प्रती लिटर
 3. डायमिथोऐट ३० ईसी २.६५ मिलि प्रती लिटर
 4. ऑक्सिडिमेटॉन मिथाईल २५ ईसी ३.२ मिलि प्रती लिटर
 5. मॅलेथिऑन ५० ईसी २ मिलि प्रती लिटर

क्रायसोपरला कारनीया(क्रायसोपा) हया भक्षकाचे १००० प्रौढ किंवा २५०० अळया प्रति हेक्टरी सोडाव्यात. 


पांढरा लोकरी मावा : या किडीची पिल्ले पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असून तिस-या अवस्थेनंतर त्यांच्यापाठीवर पांढरे लोकरीसारखे तंतू दिसतात. प्रौढ हे काळे व पारदर्शक पंखाच्या दोन जोडया असलेले असतात. पिल्लेआणि प्रौढ मावा ऊसाच्या पानातील रस शोषण करतात, यामुळे पानांवर

पिवळसर ठिंपके दिसतात व पाने कोरडेपडून वाळतात. ऊस कमकुवत होतो, वाढ खुंटते, उत्पन्नात व साखर उता-यात घट येते. याशिवाय माव्याने बाहेरटाकलेल्या मधारासारख्या विष्ठेमुळे पानावर काळी बुरशी वाढून पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीतपरिणाम होतो.

पांढरा लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास खालील औषधे आलटून पालटून द्यावीत.

 • ऑक्सिडिमेटॉन मिथाईल २५ टक्के प्रवाही १.५ मिली प्रती लिटर   
 • डायमिथोएट ३० टक्के प्रवाही १.५ मिली प्रती लिटर
 • मॅलेथिऑन ५० टक्के प्रवाही २ मिली प्रती लिटर
 • फोरेट १० टक्के दाणेदार ६ किलो प्रती एकरी

मित्रहो किडींची वाढ होण्यापूर्वीच त्यांचा अटकाव करणे चांगले असते. खतांचे डोस संतुलित केल्याने पिकात निसर्गात: कीड व रोगांना प्रतिकार करायची क्षमता विकसित होते. खतांचे डोस संतुलित करण्यासाठी अमृत कीटचा वापर करावा. किडींची पैदास वाढायच्या आत त्यांना अटकाव करण्यासाठी पिवळे व निळे चीकट सापळे अतिशय उपयोगी आहेत. 

 

हुमणी: दिनांक १७, जून २०१६ च्या एग्रोवन मध्ये आलेल्या बातमी नुसार मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली व औरंगाबाद या सहा जिल्ह्यांत तीन वर्षांपासून हुमणी अळीचा प्रादुर्भाव खरीप व रब्बी हंगामात आढळून येतो आहे. होलोट्रीकिया सिराटा व होलोट्रीकिया फिसा या दोन जातीच्या हुमणी मराठवाड्यात प्राधान्याने आढळल्या.
पूर्वी हुमणी फक्त उसात येत असे पण नवीन आकलना नुसार मुळे खाणाऱ्या या किडीने आता 
सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ज्वारी, हळद, आले, मका, मूग, कांदा इत्यादी पिकांत देखील नुकसान करण्यास सुरवात केली आहे. जवळपास ७० ते ७५ टक्‍के नुकसान होऊ शकते. .

"दृष्टी आड सृष्टी" असा एक वाप्रचार प्रचलित आहे. कधी कधी काही समस्यांचा उलगडा दृष्टीसमोरील अडसर बाजूला केल्या शिवाय दिसत नाही. हुमणी हा तसाच एक प्रकार आहे. सर्व कही चांगले असून अचानक पिकाची वाढ खुंटते, कोरडे पडायला लागतात. वर वर बघता कुठलीच किड दिसत नहीं. रोप जमिनीतुन ओढले असता लगेच हाती येते, तेव्हा हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे.

ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ज्वारी, हळद, आले, मका, मूग, कांदा आणि मिरची अशा पिकांमध्ये हुमनी आढळून येते. अळी अवस्थेतील हुमणी मूळ खाते त्यामुळे पिके कोरडी पडतात. काही समजायच्या आत मोठे नुकसान होते.

हुमणीच्या नियंत्रणासाठी विविध उपाय सुचवले गेले आहेत. झाडे हलवून भुंगेरे मारणे, सापळा पिके लावणे, नांगरणी करते वेळी हुमणी गोळा करणे, पक्षांना शेतात आकर्षित करून हुमणी खायला भाग पाडणे, रिकाम्या शेतात गवताचे ढीग करून त्याखाली हुमणी शोधणे, शिकारी कीटक पसरवणे, विषारी पदार्थ शेतात सोडणे इत्यादी इत्यादी. असे सर्व प्रयोग करून थकल्यावरहि हुमणी नियंत्रण होत नाही हा अनुभव अनेक शेतकरी बांधवाना आहेच. हताशपणे आपले उभे पिक हुमणीच्या कोपाला बळी पडलेलं पाहण्यापेक्षा एकदा "हुमणासुर" वापरून बघा.


"हुमणासुर" हे जैविक आहे. एकरी ३ किलो चा डोस असून त्याला आपण ड्रीप द्वारे, आळवणीने किंवा चांगल्या कुजलेल्या शेण खतात किंवा कंपोष्ट खतात मिसळून पसरवू शकतो. "हुमणासुर" हुमणीत बुरशीजन्य रोगाची लागण पसरवतो. मेलेल्या हुमणीच्या शरीरातून "हुमणासुर" ची लागण दीर्घकाळ पसरत रहाते. अश्या प्रकारे जमिनीखालील हुमणी चे साम्राज्य पूर्णपणे उध्वस्त होते.
हुमणासुर मुळे हुमणी मरते व त्यातून हुमणासुर पुन्हा बाहेर येते.

"हुमणासुर" ची मित्रबुरशी मातीत वास्तव्य करून दीर्घकाळ कार्यरत रहाते, हुमणी सोबत जमिनीतील इतर अनेक अपायकारक कीटक जसे वाळवी व परपोशी जसे सुतकृमी आपसूक नष्ट होतात. हुमणासुर महाराष्ट्रातील सर्व नामांकित कृषीकेंद्रात उपलब्ध आहे. इथे एक ऑनलाईन ऑफर देत आहे, आपण क्रेडीट, डेबिट किंवा ऑनलाईन बँकिंगने खरेदी करू शकता. हुमणीमुळे होणारे नुकसान प्रचंड मोठे आहे. "हुमणासुर" व्यतिरिक्त इतर सर्व पर्याय राबवायला अतिशय कठीण आहेत.
आजच जवळच्या कृषीकेंद्रावर "हुमणासुर" ची मागणी करा.
उसावरील आमचे अन्य लेख वाचायला विसरु नका
Back to blog