उसाचे शेड्युल
जमिनीची मशागत : मशागतीपूर्वी प्रती एकर २ टन शेणखत पसरवून देणे. जमिनीची नांगरट करून कुळवणी/वखरणी करणे किंवा रोटा वेटर मारून संपूर्ण जमीन भुसभुशीत करणे
लागवडीचे अंतर: दोन सरीतील अंतर ४ ते ५ फुट आणि २ डोळ्यांच्या कांदे ४ इंच अंतर ठेवून लावावे. रोप लावत असतील तर ४.५ X १.५ अंतरावर रोपे लावावीत
बेणे प्रक्रिया: ह्युमोल जेली ५०० ग्रा. + बाविस्टीन २५० ग्रा. हमला ५०० मिली २०० लिटर पाण्यात बुडवून घेणे आणि त्यानंतर लागण करणे
खत व्यवस्थापन
लागवडीपूर्वीचा (बेसल डोस) त्वरित ८-१० दिवसआधी द्यावयाची मात्रा/डोस:
डीएपी १५० कि. + एमओपी १०० कि. + ह्युमोल २० कि. + रीलीजर ५ कि. + कॅलनेट १० कि. + रीजेंट १० कि.
लागवडीच्या ८ ते १० दिवसांनी करावयाची आळवणी:
अमृत कीट १ कीट + १९:१९:१९ - ५ कि. + बाविस्टीन २५० ग्रा. + हमला ५०० मी. ली. १५० लिटर पाण्यात घेवून आळवणी करणे.
लागवडीच्या ५५ ते ६० दिवसात करावयाची आळवणी:
फोसिड १.५ कि. + ह्युमॉल गोल्ड १ कि. १५० लिटर पाण्यात घेवून आळवणी करणे.
लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावयाची मात्रा:
युरिया ९० कि. प्रती एकर
लागवडीच्या ६० दिवसानंतर करावयाची आळवणी:
अमृत कीट १ + + १९:१९:१९ - ५ कि. १५० लिटर पाण्यात घेवून आळवणी करणे.
लागवडीच्या ९० दिवसानंतर द्यावयाची मात्रा (प्रती एकर):
युरिया १०० कि. + एमओपी १५० कि. + डीएपी १५० कि. + ह्युमॉल २० कि.+ रीलीजर ५ कि. + कॅलनेट १० कि + मायक्रोकीट ५३ कि
लागवडीच्या ९० दिवसानंतर करावयाची आळवणी:
अमृत कीट १ + +१३:००:४५ - १० कि. + ह्युमॉल गोल्ड १ कि. १५० लिटर पाण्यात घेवून आळवणी करणे.
लागवडीच्या ११० दिवसानंतर द्यावयाची मात्रा (प्रती एकर):
युरिया २५ कि. + एमओपी २५ कि. + रीलीजर ५ कि. २०० लिटर पाण्यामध्ये ड्रीप असेल तर ड्रीपमधून किंवा ड्रम मध्ये द्रावण तयार करून पाट पाण्यासोबत प्रती एकर खते शेतामध्ये सोडणे
लागवडीच्या १३० दिवसानंतर द्यावयाची मात्रा (प्रती एकर):
युरिया २५ कि. + एमओपी २५ कि. + रीलीजर ५ कि. २०० लिटर पाण्यामध्ये ड्रीप असेल तर ड्रीपमधून किंवा ड्रममध्ये द्रावण तयार करून पाट पाण्यासोबत प्रती एकर खते शेतामध्ये सोडणे
लागवडीच्या १५० दिवसानंतर करावयाची आळवणी:
फोसिड १.५ कि. + ह्युमॉल गोल्ड १ कि. २०० लिटर पाण्यामध्ये ड्रीप असेल तर ड्रीपमधून किंवा ड्रममध्ये द्रावण तयार करून पाट पाण्यासोबत प्रती एकर खते शेतामध्ये सोडणे
लागवडीच्या १७० दिवसानंतर द्यावयाची मात्रा (प्रती एकर):
युरिया २५ कि. + एमओपी २५ कि. + इमिडा ५०० मिली ४०० लिटर पाण्यामध्ये ड्रीप असेल तर ड्रीपमधून किंवा ड्रममध्ये द्रावण तयार करून पाट पाण्यासोबत प्रती एकर खते शेतामध्ये सोडणे
लागवडीच्या १९० दिवसानंतर द्यावयाची मात्रा (प्रती एकर):
एमओपी ५ ०कि. + फोसिड ३ कि. + ह्युमॉल गोल्ड १ कि. २०० लिटर पाण्यामध्ये ड्रीप असेल तर ड्रीपमधून किंवा ड्रममध्ये द्रावण तयार करून पाट पाण्यासोबत प्रती एकर खते शेतामध्ये सोडणे
फवारणी व्यवस्थापन
लागणी नंतर ४०-४५ दिवसांनी (प्रती एकर):
ऑक्सिजन ५०० मी.ली. + १२:६१:०० - ५०० ग्रा. + सुपर जिब १० मिली. + ब्लेझ १५ मी. ली. १०० लिटर पाण्यात
लागणी नंतर ६० दिवसांनी (प्रती एकर):
ब्रम्हास्त्र ५०० मिली १०० लिटर पाण्यात टाकून प्रती पंपास (१५ लिटर)
लागणी नंतर ७० दिवसांनी (प्रती एकर):
क्लोरोसायपर ३०० मी. ली. + सुपरजिब १० मिली. + १३:४०:१३ १ किलो + ब्लेझ १५० मिली. १०० लिटर पाण्यात टाकून प्रती पंपास (१५ लिटर)
- हे शेड्युल मार्गदर्शना साठी आहे. उत्पन्नाचा दावा नाही.