सुर्यफुल लागवड

सुर्याफुलातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

सूर्यफुलाच्या सुधारित व संकरित वाणात उच्चतम उत्पादन क्षमता एकरी ८०० किलो इतकी झाली आहे. पूर्वी फार फार तर ३०० किलो प्रती एकर असे उत्पादन येत असे. कमी जागेत, कमी वेळेत, कमी रोगराई व जवळपास अडीच पट उत्पादकता असेल तर पिकास अन्नद्रव्यांची भूक देखील असणार आहे. जर आपण पिकाच्या पोषणात कमी पडतो तर उत्पादनात घट तर येईलच शिवाय रोगराई चा देखील फेरा पडेल.

शेतात फिरता फिरता काही लक्षणांचा अभ्यास करून कमतरतेची लक्षणे जाणून घेवून योग्य त्या अन्नद्रव्याचा पुरवठा करता येतो. प्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास अमृत एन पी के खते फवारणी किंवा ठिबक ने देता येतील. जर दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास कॅल्शियमसाठी कॅलनेट, मॅग्नेशियम साठी ह्युमॅग न सल्फर साठी रीलीजर फवारणी किंवा ठिबक ने देता येईल. जर सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास मातीत मायक्रोडील ग्रेड १ मिसळावे व सोबत मायक्रोडील ग्रेड २ ची फवारणी करावी. 

प्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

नत्र: नत्राची कमतरता झाल्यास पिकाची वाढ खुंटत जाते. पाने पिवळे पडतात. जुन्या पानांवर जास्त परिणाम होतो. पानगळ लवकर होते. नवीन झाडे लाल पडतात. 

स्पुरद: पाने खालच्या बाजूने गर्द हिरवे, जांभळे, निळे किंवा लाल होतात. काही वाणात शिरा व खोडे पिवळी पडतात. फुले तयार होत नाहीत.

पालाश:  झाड आजारी दिसू लागते. फुल व बियांचा आकार लहान रहातो. पानांचे काठ व शिरांच्या मधला भाग पिवळा पडतो. पिवळे पणा पहिले जुन्या पानांवर दिसतो व वरच्या बाजूला सरकू लागतो. पाने सुरकतात, तपकिरी होतात व वरच्या बाजूला वळतात. फुलोरा एकसमान नसतो व थोडासाच असतो. उष्णता,थंडी व रोगाला लवकर बळी पडते. 

दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

गंधकाची कमतरता


गंधक: झाड खालून वर पिवळे पडू लागते. वाढ खुंटते. फुलाचा आकार छोटाच रहातो. फुल उघडत नाही, उमलायला वेळ लागतो.

कॅल्शियम: नवीन पाने छोटे, वाकडे तिकडे असतात, टोक वळतात. खोड बुटके रहाते व वरून खालच्या बाजूला जळू लागते. मूळ वाढत नाही. टोकावरील पाने गोळा होतात, काळी पडतात. 

सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे

सूर्यफुलातील कमतरता

बोरान: बोरान च्या कमतरतेची लक्षणे अचानक दिसू लागतात. नवीन व मधली पाने जळकी दिसतात. दळ प्रमाणापेक्षा जास्त मोठी होतात व अंकुराचे टोक वेडेवाकडे व फुगीर होते. नंतर नव्या पानावरील पिवळे डाग अधिक स्पष्ट व तांबडे दिसतात. कालांतराने सर्वच पाने पिवळे दिसू लागतात. जर बोरान ची कमतरता झाडे मोठी झाल्यावरनिर्माण झाली तर फुलांच्या मधोमधल्या बिया नीट तयार होत नाहीत.  मायक्रोडील बी २० ची फवारणी करावी.

सूर्यफुलावरील फवारणी

लोह:  नवीन पालवी फिकट होऊन शिरांमधील भाग पिवळी पडतो. शिरा हिरव्या रहातात. मायक्रोडील एफ ई १२ ची फवारणी अतिशय प्रभावी आहे. यातील लोह पूर्णपणे चिलेटेड असल्याने लवकर लागू होते. 

झिंक: पानांच्या कडांवर व शिरावर पिवळे चट्टे उमटतात. तीव्र कमतरता झाल्यास शिरा पिवळ्या पडतात. टोकाकडील वाढ थांबते. जुन्या पानांवरदेखील  चट्टे उमटतात. मायक्रोडील झेड एन १२ ची फवारणी अतिशय प्रभावी आहे.

सूर्यफुलाच्या लागवड व्यवस्थापनाबद्दल काही प्रश्न असल्यास आपण श्री. अमोल पाटील यांना संपर्क करू शकता त्यासाठी स्क्रीनवर तरंगणारे व्हाटसअप बटन उपयोगात आणावे.

Back to blog