सूर्यफुलाचे वाण व  वैशिष्ट्ये

सूर्यफुलाचे वाण व वैशिष्ट्ये

सूर्यफुलाचे पिक तीनही हंगामात घेता येते. सर्वसाधारणपणे जुलैच्या पूर्वाधात, ऑक्टोबर ते नोव्हेंबर च्या पूर्वार्धापर्यंत व फेब्रुवारी च्या पूर्वार्धात लागवड करता येते. रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये चांगले उत्पादन मिळते कारण रोग, किडीचे प्रमाण कमी असते.

 

 सूर्यफुलाचे वाण व  वैशिष्ट्ये

सूर्यफुलात अनेक संकरित वाण उपलब्ध आहेत जसे एल.एस.एफ.एच. 171, फुले रविराज, के.बी.एस.एच.-44, डी.आर.एस.एच.-1 , एल.एस.एफ.एच. 35 (मारुती), के.बी.एस.एच.-1, पी.के.व्ही.एस.एच.-27, एल.एस.एच.-3, बी.एस.एच.-1 

त्याचप्रमाणे काही सुधारित वाण देखील उपलब्ध आहेत. त्यात डी.आर.एस.एफ. 108, टी.एन.ए.यू. एस.यू.एफ.-7, एल.एस.एफ.-8, डी.आर.एस.एफ.-113, मॉर्डन, भानू (एस.एस. 2038), एस.एस. 56 यांचा समावेश आहे. 

या पैकी ..

  • एल.एस.एफ.एच. 171 हे संकरित वाण सर्वात अधिक उत्पादन क्षम असून एकरी उत्पादन ५८३ ते ७५० किलो इतके आहे. शिवाय हा वाण केवडा रोगास प्रतिकार क्षम आहे.
  • डी.आर.एस.एच.-1  हे देखील एक संकरित वाण असून यात ४३ टक्के तेल असते.
  • एल.एस.एफ.-8 हे एक सुधारित वाण असून केवडा, ठिपके व तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे

वरील फोटोत दिसणारी सूर्यफुलात बोरानची कमतरता येवू नेये म्हणून मायक्रोडील बोरान २० ची फवारणी नक्की करा.


सूर्यफुलाच्या विविध वाणा बद्दल च्या अधिक माहितीसाठी खालील फोटोवर क्लिक करून टेबल डाऊनलोड करु शकता किंवा त्याखाली एक्सेल शीट साठी लिंक दिलेली आहे.  

एक्सेल डाटा शिट डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

सूर्यफुलाच्या लागवड व्यवस्थापनाबद्दल काही प्रश्न असल्यास आपण श्री. अमोल पाटील यांना संपर्क करू शकता त्यासाठी स्क्रीनवर तरंगणारे व्हाटसअप बटन उपयोगात आणावे.

Back to blog