वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग दुसरा)

वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग दुसरा)

मित्रहो, मागील भागात आपण कामाचे वर्गीकरण करून वेळ व्यवस्थापन कसे करायचे हे बघितले. अर्थात एव्हढे करून भागणार नाही. "स्मार्ट" होण्यासाठी दुसरी मोठी गोष्ट आहे...

ध्येय्य

आपले ध्येय्य निश्चित असणे महत्वाचे आहे नाही तर गाडी रुळावरून भरकटून जाईल. ध्येय्य ठरवल्यामुळे तुमच्या योजनेला एक स्परूप येते. योजने मुळे कोणकोणती कामे करायचे ते ठरते. कामे केल्याने परिणाम प्राप्त होतात व फलस्वरूप "यशप्राप्ती" होते. 

 जेव्हा आपण प्रवास करतो त्यावेळी प्रत्येक गोष्ट ठरवतो. कुठून कुठे कसे जायचे, केव्हा जायचे, किती लोकं रहातील, खान-पान कसे होईल? म्हणजेच कुठे जायचे हे माहिती असले कि सर्व काही ठरवता येते. समजा तुम्ही मुंबई ला निघालात, प्रवास रात्री चा आहे, हायवेने जायचे आहे. तुमच्या वाहनात बसल्यावर लगेच मुंबई दिसत नाही. तुमच्या वाहनाचा प्रकाश रस्त्यावर काही अंतरापर्यंत पडतो....जसे जसे वाहन पुढे जाईल ..पुढील रस्ता दिसत जातो.

स्मार्ट शेतकरी होण्यासाठी दोन प्रकारची ध्येय्य ठरवावी लागतील. सामान्य ध्येय्य व निश्चित ध्येय्य. 

सामान्य ध्येय्य: मी एक चांगला शेतकरी बनेल, शेतीचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करेल, कामापासून लक्ष विचलित करणाऱ्या सवयी जसे वेश्यावृत्ती, जुगार, दारू या पासून दूर राहील. 

निश्चित ध्येय्य:मी पिकाच्या निवडीत वैविध्य आणून या वर्षी मागील वर्षाच्या २० टक्के अधीक उत्पादन घेईल. वार्षिक उत्पादनाचा

   • २० टक्के भाग मी रोजच्या भाजीपाला विक्रीतून कमवेल
   • २० टक्के भाग दुध व दुग्धजन्य उत्पादनाच्या विक्रीतून महिन्याकाठी कमवेल
   • २० टक्के भाग पशुधन, शेणखत व फळांचा व्यापार करून मिळवेल व
   • ४० टक्के उत्पादन व्यापारी पिकाच्या माध्यमातून कमवेल

मित्रहो, अश्या प्रकारची ध्येय्य निश्चिती फार महत्वाची आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या अभ्यासानुसार ध्येय्य ठरवू शकतो. आर्थिक विश्लेषण करते वेळी येणारा पैसा कसा, किती व केव्हा येईल  हे ठरवले कि ध्येय्याच्या वाटचालीची समीक्षा नियमित पणे शक्य आहे.

वरील उदाहरणा नुसार जर वार्षिक लक्ष्य १० लाख नफा कमवण्याचे असेल तर दोन लाख रुपये "रोजच्या भाजीपाला विक्रीतून" कमवायचे आहेत. दिवसा काठी निव्वळ नफा म्हणून ५४८ रु आले आहे कि नाही? आले नसतील तर ते येण्यासाठी योग्य बदल करता येतील. असेच विश्लेषण मासिक उत्पन्नाचे करता येईल.

ध्येय्य ठरवणे हे थोडे "भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्या सारखे आहे". नाणेफेक झाल्यवर पहिले फलंदाजी करायची असेल तर व्हीकेट वाचवत, प्रत्येक ओव्हर ला जास्तीत जास्त स्कोअर करायचा व पहिले गोलंदाजी आली तर प्रत्येक बॉल "व्हीकेट" पडेल हे लक्ष्य ठेवूनच टाकायचा". 

मित्रहो स्मार्ट शेतकरी म्हणजे निव्वळ मेहनत करण्याऐवजी एक दिशा ठरवून फक्त त्याच दिशेत मोजून-मापून मेहेनत करणारा शेतकरी. सातत्याने आर्थिक विश्लेषण करत आपली दिशा चुकत नाहीये हे बघणारा शेतकरी.

 

 

Back to blog