हीच योग्य वेळ आहे पाटील बायोटेक तंत्रज्ञान स्विकारायची!

हीच योग्य वेळ आहे पाटील बायोटेक तंत्रज्ञान स्विकारायची!

शेतीच्या धंद्यात होणारी चूक सुधारणे शक्य आहे का? इतर कुठलाही व्यवसाय बघा...चुक सुधारता येते. इतर व्यवसाय हे दैनंदिन पद्धतीने चालतात. आज चूक लक्षात आली कि उद्या ती लगेच सुधरवण्यासाठी मौका मिळतो. शेतीत हे शक्य आहे का? पूर्ण हंगाम वाया जातो. कमीत कमी चार महिने तरी हातून गेलेच समजा. पुढच्या वेळी हि एक चूक टाळली तर दुसरी एखादी चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा पेरणीत चूक झाली तर? कितीही प्रयत्न केला, खर्च केला तरी ते सर्व वराती मागून घोडेच! पेरणीत झालेली चूक मोठा मनस्ताप देवून जाते...आर्थिक भूरदंड वेगळा. पिकावर कीड आली, वेळेवर फवारणी नाही झाली तर नंतर देव पाण्यात ठेवा कि उठ-बशा काढा...उतारा कमी होणार म्हणजे होणार.
याला पर्याय काय?

पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरा. प्रत्येक पिकासाठी, प्रत्येक संकटासाठी तंत्रज्ञान आहे. गेल्या वीस वर्षात पाटील बायोटेक चे तंत्रज्ञान विकसित होते आहे. हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेत जन्मलेले नाही..हे अनुभवातून सिद्ध झाले आहे. हजारो शेतकरी बांधवांचा अनुभव आम्ही जपून ठेवलाय. अनुभवातून आलेल्या ज्ञानाला – विज्ञानाची जोड दिली आहे. लाखो मैलाचा प्रवास, अनेक पावसाळे, लाखो पेरण्या, फवारण्या आणि हंगामाचा अर्क म्हणजे पाटील बायोटेक चे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाला जोड आहे निवडक, निष्णात मनुष्यबळाची. अनुभवी व आधुनिक सल्लागार मंडळ, चाणाक्ष व सक्रीय फिल्ड सहाय्यकांची फौज व रोजच होणारया कार्यशाळा यातून अनुभव वाढवला जातोय..अधिकाधिक प्रगल्भ केला जातोय.

आजचे युग संगणकाचे आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञान इथेही पुढे आहे. प्रत्येक ग्राहकाच्या शेताचा अचूक डेटाबेस अत्याधुनिक सर्व्हर मध्ये साठवला जातोय. या डेटाबेस चे विश्लेषण व व्यवस्थापन केले जाते आहे. अचूक निष्कर्ष व निर्णय घेण्यासाठी हे मुख्य खत आहे.

पाटील बायोटेक च्या कॉलसेंटर मधून ग्राहक शेतकरी मित्रास वेळोवेळी अचूक माहिती पुरवली जाते त्यासाठी हा डेटा उपयोगात आणला जातो. खते व कीटक नाशकाची शिफारस केली जाते. ती काटेकोर असते..हे तंत्रज्ञान होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवते. हंगाम हाती येईपर्यंत पाठपुरावा केला जातो.


मित्रहो...टाइम इज मनी...हे फिरंग्याना माहिती होते...त्यांनी आपल्यावर राज्य केले..होते नव्हते ते सारे लुटून नेले...आता आपल्याला या देशातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर काढायचा आहे...टाइम इज मनी...हे लक्षात ठेवा आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञान हि लक्षात ठेवा... अजून वेळ गेलेली नाही. आजच संपर्क करा.

Back to blog