तुमच्याही शेतात माकडे त्रास देतात का?

मित्रहो जुगाड हा भारतीयांचा आत्मा आहे. कोणताही प्रश्न असू द्या, त्याला सोडवण्यासाठी "शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ" हाच आपला नेहमीचा ध्यास आहे. 

आमच्या शेतात माकडांचा फार त्रास आहे काही तरी उपया सुचवा अशी विचारणा शेतकरी बांधवाकडून नियमित होत असते. यावर काय काय उपाय करता येईल हे आम्ही नित्याने शोधत असतो. 

अलीकडेच एक भन्नाट कल्पना व्हाटसअप विद्यापीठावर आढळून आली. साउथ मधील एका शेतकरी बांधवाने त्याच्या बुलबुल नावाच्या कुत्र्याला हेअर डाय च्या मदतीने पट्टेदार केले. तो थोडाफार का होईना वाघा सारखा दिसू लागला. 

------------------

फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.

------------------

हा शेतकरी मित्र त्याच्या या वाघोबारुपी कुत्र्याला सकाळ संध्याकाळ शेतात चक्कर मारून आणतो.

त्याला पाहून माकडे तिकडे फिरकतच नाहीत. तुमच्या शेतात माकडांचा त्रास असेल तर हा प्रयोग करून बघायला हरकत नाही.

हा व्हिडिओ बघायला विसरू नका. तुम्हाला हा प्रयोग करून पहायचा असेल तर खाली काही सूचना देत आहे त्या नक्की बघा.
प्रयोग करायला लागणारे साहित्य लिंकवर क्लिक करून खरेदी करू शकता! हेअर डाय वापरा, तो जवळपास चार महिने तसाच राहील. रंग वापरला तर कुत्र्याला त्याचा त्रास होईल व पट्टे फार दिवस टिकणार नाहीत.
प्रयोग करण्या पूर्वी हे लक्षात असू द्या.
माकडे इतकीही मूर्ख नसतात. ते सस्तन वर्गात येतात त्यामुळे त्यांच्यात नवीन गोष्टी शिकण्याचा गुणधर्म निसर्गत: आहे. तुम्ही हा प्रयोग सुरु केल्यावर काही दिवसात त्यांच्या हे लक्षात येवू शकते. वाघोबा नकली आहे हे समजले कि त्यांची भीती कमी होईल व तुमच्या अपरोक्ष ते पुन्हा शेतात घुसतील.
त्यामुळे जर तुम्हाला हा प्रयोग यशस्वी करायचा असेल तर माकडे फार जवळून तुमच्या वाघोबारुपी  कुत्र्याला पाहू शकणार नाही किंवा  तुमचा वाघोबारुपी  कुत्रा भुंकत त्यांचा पिच्छा करणार नाही याची काळजी घ्या. उगाच पितळ उघडे पडेल. या खोट्या वाघ्याला दोरीने बांधून सोबत चालवा. मोकळा सोडू नका. 
माकडे चांगले निरीक्षण करतील इतका वेळ त्याला थांबवू देखील नका.
कितीही झाले तर हा प्रयोग फार काळ चालणार नाही दुसरा उपाय शोधावाच लागेल हे लक्षात असू द्या.