आजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न

आजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न

भाग १ ला

आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या जास्त वेगाने पसरतात. चांगल्या बातम्या पसरत नाहीत कारण त्यात सनसनाटी नसते. यापूर्वी अनेकदा शेतीविषयक अनेक दूषप्रचार केले गेले आहेत. त्यागर्दीत सत्य आपल्यासमोर यावे व आपण "जय किसान" ची उद्घोष मनापासून करावी म्हणून हा खटाटोप.

झाड लावणे सोपे असते, जगवणे कठीण. झाडे लावणाऱ्यांची फोटो येतात, त्यांना ती हौस असते. झाडे जगवणारे कधी समोर येतच नाहीत, वाढणारी झाडे पाहण्यात त्यांना आनंद वाटतो. तसेच आहे, जगाची लोकसंख्या वेगाने वाढते आहे. खाणारे वाढत आहेत. खावू घालणारे श्रीमंत होत आहेत. पिकवणारे? त्यांना प्रसिद्धीची हौसच नाही. आपल्या कामाचा ते गवगवा करीत नाहीत. आपले शेत फुलतांना बघितले कि ते खुश होवून जातात. 

अलीकडेच टीव्हीवर एक बातमी बघितली - शेतकरी पिकात विष टाकतोय असा प्रचार सुरु होता. बातमी पुन्हा पुन्हा दाखवली जात होती. समालोचक फार पोट तिडकीने बोलत होता. मला खरे-खोटे करायचे नाहीये. मला ते सत्य सांगायचे आहे जे मला ठावूक आहे. मला ठासून सांगयचे आहे - आजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न बदलत्या काळात कमी वेळेत व कमी जागेत अधिक अन्न पिकवायची जबाबदारी शेतकऱ्यावर आली. वैज्ञानिकांनी शेतकऱ्यास पिकाच्या नव्या जाती, हायब्रीड, खते, औषधी, ठिबक यंत्रणा, ग्रीन हाउस अश्या अनके गोष्टी विकसित करून दिल्या. काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत आहेत. शेतकऱ्याने अश्या अनेक बदलांचा स्वीकार करत आपले "पिकवायचे" कार्य सुरु ठेवले आहे. आजचा शेतकरी शेतात मोठी गुंतवणूक करतो, पिकास लागणारे सर्व पोषक तत्वे पिकास देतो. यात नत्र, स्पुरद, पालाश, सल्फर, कैल्शियम, मेग्नेशियम, लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरोन, मोलाब्द  व सिलिकॉन यांचा समावेश आहे. हि सर्व पोषक तत्व त्याला संतुलित मात्रेत, योग्य वेळी व योग्य पद्धतीने द्यावी लागतात.

सुरवातीच्या काळात तो मातीतील कर्ब, नत्र व ओल वाढवतो ज्यामुळे बीजाचे अंकुरण होऊन, मुळे मृदेच्या कुशीत पसरु लागतात. जसा जसा पिकाचा विकास व्हायला लागतो, गरजे नुसार वेगवेगळी पोषक तत्वे पिकास उपलब्ध करून दिली जातात. पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी व खते वाया जावू नये म्हणून मिश्र स्वरूपातील, पिकास लगेच उपलब्ध होणारी खते मूळाच्या अगदी जवळ किंवा फवारणी तून दिली जातात. खतांचे नियोजन इतके चोख करयचा प्रयत्न असतो कि पिकात रोग प्रतिकार क्षमता विकसित होऊन औषधीची गरज कमीत कमी पडेल. 

एकूणच आजचा शेतकरी पोषक तत्वांचा इतका चोख वापर करतो कि शेतात जे काही पिकत त्यात पोषक तत्व योग्य प्रमाणात असतात

अधिक माहिती साठी पुढील ब्लोग नक्की वाचा

Back to blog