आजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न

आजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न

भाग २

नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला आहारात "पोषण तत्वाचा अभाव" हे एक प्रमुख कारण आहे असा त्याचा आशय होता. कमी पोषक अन्न खाल्याने शरीराला पोषण मिळत नाही, मग मेंदू आणखी खा असे संकेत देतो, अधिक अन्न खाल्ले जाते त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. चांगले स्लीम-ट्रिम रहायचे असेल तर कसदार अन्न खायला हवे.  रोजच्या अन्नात प्रथिन, लोह, झिंक (जस्त), मेग्नेशियम, कैल्शीयम, आयोडीन, व्हिटामिन्स व स्निग्ध  हि पोषक तत्वे असलीत तर आपण स्लिम-ट्रिम राहू शकतो!

हि पोषक तत्व आपल्या अन्नात यावी म्हणून शेतकरी प्रयत्न करीत नाही, त्याला त्याच्या पिकाचे पोषण करायचे असते. आपले पिक जोमदार असावे, संतुलित खत मात्रेतून रोग नियंत्रण व्हावे, औषध फवारणी चे गरज पडू नये, भरपूर उत्पन्न मिळावे व अधिक फायदा मिळावा म्हणून तो पिकांसाठी नत्र, स्पुरद, पालाश, सल्फर, कैल्शियम, मेग्नेशियम, लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरोन, मोलाब्द  व सिलिकॉन हि मूलद्रव्य युक्त पोषक तत्व वापरतो. यातूनच पिकात शर्करा, प्रथिने, स्निग्ध, व्हिटामिन्स व चवदारपणा निर्माण होतो.  

खतांचे नीरनिराळे प्रकार आहेत.  नत्र, स्पुरद व पालाश यांना प्रार्थमिक खते म्हटले जाते कारण पिकास ती जास्त प्रमाणात हवी असतात. सल्फर, कैल्शियम व मेग्नेशियम; दुय्यम (मध्यम प्रमाणात लागणारी) खतात मोडतात तर उरलेल्यांचा समावेश सूक्ष्मअन्नद्रव्यात केला जातो कारण ती अत्यल्प प्रमाणात पिकास द्यायची असतात.

नत्र, स्पुरद व पालाश या मूलद्रव्यांच्या पुरवठ्या साठी युरिया, अमोनियम नायट्रेट, डी ए पी, एस एस पी, म्युरेट ऑफ पोटेश अश्या खतांचा वापर होतो. गेल्या काही दशकात या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. चुकीच्या व असंतुलीत पद्धतीने वापर झाल्याने या खतांचे दुष्परिणाम जाणवू लागले. जास्तीच्या नत्रा ने पिकांचे मूळ जळालीत, जल व वायू प्रदूषण झाले. अतिरिक्त स्पुरद व पालाश खते देखील मातीत स्थिर झालेत त्यामुळे माती कडक व क्षारीय झाली.

या दुष्परिणामांची व्याप्ती लक्षात घेवून शास्त्रज्ञांनी चुकीची दुरुस्ती केली व जन्म झाला पाण्यात पूर्णपणे विरघळणाऱ्या मिश्र खतांचा!

amrut gold npk water soluble fertilizers

हि खते अत्यंत कमी प्रमाणात वापरावी लागतात. फवारणी, तुषार सिंचन व ठिबक द्वारे द्यायची असल्याने छोटे-छोटे डोसेस, वेळो वेळी विभागून  व  पिकाच्या गरजेनुसार मिश्रणे  बदलवून वापरता येतात. शाखीय वाढ, फुल धारणा, फळ धारणा, फळ पक्वता अश्या अवस्थांचा विचार करून नीरनिराळे ग्रेड वापरल्याने परिणामकारकता वाढते.  

काळाची गरज लक्षात घेवून पाटील बायोटेकने "अमृत गोल्ड" या नावाखाली एन पी के  १९-१९-१९, एन पी के १२-६१-००, एन पी के १३-४०-१३, एन पी के ००-५२-३४ व एन पी के ००-००-५० हि खते बाजारात आणली आहेत. "अमृत गोल्ड" हि खते आयातीत, दर्जेदार व किफायतशीर आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी अमृत  गोल्ड खतांचा समावेश त्यांच्या नित्याच्या तक्त्यात केला आहे. 

पिक वाढीच्या सुरवातीस अमृत गोल्ड १९-१९-१९  चा वापर होतो, पिक वाढीत पडल्यावर अमृत गोल्ड १२-६१-०० फवारली जातात, चांगल्या फुल धारणे साठी अमृत गोल्ड १३-४०-१३ उपयुक्तता लक्षात घेतली जाते तर उत्तम फळ धारणा व फळे व बीज पोसावे म्हणून अमृत गोल्ड ००-५२-३४ व अमृत गोल्ड ००-००-५० चा वापर केला जातो. खतांच्या एकूण खर्चात यामुळे चांगली बचत होते आहे व पिकणारे अन्न हि अधिक कसदार बनते आहे. 

Back to blog