आजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न

आजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न

भाग ३ रा

"भित्यापाठी ब्रम्हराक्षस", आजकालच अन्नधान्य काही बर नाही, त्यात पोषक तत्वच नाहीत, इतके रसायने वापरतात!, कर्करोग होतो....वगैरे वगैरे. एक तर आपण नीट खायचं नाही. अरबट-चरबट खात सुटायचे. व्यायाम नाही, दिवसभर बुड चिटकवून ठेवायचे. नको नको ते शौक - रोज च्या मैफिली. मग व्याधी तर होणारच ना! चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करायला हवे. ताजा भाजी-पाला, हंगामी फळे, कड धान्ये वगैरे नित्य खायला हवे. शक्य तितके ताजे व कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ खावे मग बघा सारे ब्रम्हराक्षस धूम ठोकतील. तुम्हाला यासाठी प्रेरणा हवी असेल तर शेतकऱ्या कडून घ्या.

मित्रहो या लेखमालेत मी आपणास हे पटवून देत आहे कि "आजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न". या अंकात मला हे पटवून द्यायचे आहे कि शेतकरी त्याच्या पिकाच्या पोषणासाठी कॅल्शियम युक्त खते वापरतो आणि मग जे पिकत ते "अधिक कसदार असत". 

हाडे, दात व केसांच्या वाढी साठी कॅल्शियम अत्याआवश्यक आहे. स्त्रियांमधील मासिक पाळी संबंधी त्रास कॅल्शियम मुळे नियंत्रित होतात. हिरव्या भाज्या, दूध, दही, ताक, पनीर इत्यादी मध्ये कॅल्शियम भरपूर असते. अर्थात हे सर्व कॅल्शियम कुठेतरी पिकातुनच  येते! पिकासाठी कॅल्शियम हे जितके महत्वाचे अन्नद्रव्य आहे, त्याची उपलब्ध ता करून देणे तितकेच कठीण आहे. मातीत कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असूनहि ते पिकास हव्या त्या वेळेत व आवश्यक त्या मात्रेत उपलब्ध होत नाही. पिकाच्या वाढीच्या काळात पेशिभित्तिका मजबूत होण्यासाठी व पेशीची लांबी वाढण्यासाठी  कॅल्शियमची मोठी गरज असते. पेशिभित्तिका मजबूत झाल्याने बुरशी व कीटक यांचे काम कठीण होऊन बसते. अनेक महत्वाच्या जैविक अभिक्रियेत केल्शियम भाग घेतो, पर्णरन्ध्र उघड-झाप करून तापमान नियंत्रित करण्यासाठी त्याची गरज असते.

दुर्देवाने मातीतील केल्शियमचे प्रमुख संयुगे पाण्यात विरघळत नाहीत त्यामुळे ते सहज उपलब्ध होत नाहीत. पिकास कॅल्शियम कमी पडू नये म्हणून आधुनिक शेतकरी  कैलनेट वापरतो.  हे पाण्यात पूर्ण पणे विरघळणारे कैल्शिअम नायट्रेट आहे. पिकात कैल्शियम परिवहन प्रक्रियेसाठी प्रणाली नसते त्यामुळे वाढीच्या काळात केलनेट ने याची आपूर्ति केली जाते. केलनेट मध्ये कैल्शियम व नायट्रेट एकत्र असल्याने व नायट्रेट, कैल्शियम च्या वहनात उपयोगी असल्याने इतर कुठल्याही श्रोता पेक्षा कैलनेट अधिक उपयुक्त आहे. एकदम वापर न करता शेतकरी कैलनेट चे छोटे छोटे डोस पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात विभागून देतो. असे करत असताना त्यासोबत फॉस्फेट मिसळणार नाही याची विषेश काळजी तो घेतो. एकूणच कैलनेट वापरल्याने पिकांचे पोषण होते, रोग किडींपासून रक्षण होते व बाजारात जायीपर्यंत ती टवटवीत रहातात.

मित्रहो, तुमच्या प्रत्येक चांगल्या दिवसासाठी शेतकऱ्याला धन्यवाद द्या.  तो फक्त स्वत:च्या फायद्यासाठी का असेना, आपल्या पिकाच्या पोषणासाठी का असेना; पण आयुष्यभर असे काम करतो ज्यामुळे तुमचा फक्त दिवसच नाही तर संपूर्ण आयुष्यच "आरोग्यदायी" बनते.

क्रमशः

Back to blog