
शेतात फिरता फिरता काही लक्षणांचा अभ्यास करून कमतरतेची लक्षणे जाणून घेवून योग्य त्या अन्नद्रव्याचा पुरवठा करता येतो. पाटील बायोटेक ची अमृत गोल्ड खते, सी एम एस खते (कॅल्शियम, मॅग्नेशियम, रीलीजर), मायक्रोडील खते या कामी आपली मदत करतात.प्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास अमृत एन पी के खते फवारणी किंवा ठिबक ने देता येतील. जर दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास कॅल्शियमसाठी कॅलनेट, मॅग्नेशियम साठी ह्युमॅग न सल्फर साठी रीलीजर फवारणी किंवा ठिबक ने देता येईल. जर सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास मातीत मायक्रोडील ग्रेड १ मिसळावे व सोबत मायक्रोडील ग्रेड २ ची फवारणी करावी.
------------------
आपणास कोणती रोपे हवीत?
रोपवाटीकांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
------------------
प्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे
नत्र: नत्राची कमतरता झाल्यास झाडाची जुनी पालवी फिक्कट हिरवी होऊ लागते व हळूहळू हि जुनी पाने पिवळी पडू लागतात, शिरांसहित सर्व पानच पिवळे पडते. जर नत्राची पूर्तता झाली नाही तर पाने पांढरी देखील दिसू लागतात. नवीन पालवी जरी हिरवी असली तरी ती फिक्कट हिरवी असते व पानांचा आकार लहान असतो. फांद्याची संख्या कमी होते.
-------------------------------
टमाट्यातील करपा (लवकर व उशिरा येणारा) नियंत्रित करण्यासाठी वापरा
------------------------------
स्पुरद: जळक्या डागांची लक्षणे जुन्या पानावर पहिले दिसतात रोप बुटके किंवा वाढ खुंटलेले दिसते. होणारे बदल हळूहळू असतात. खोड, देठ व पानांच्या खालच्या बाजूला जांभूळी रंग दिसतो. जर कमतरता तीव्र असली तर पानांवर निळी-राखाडी चमक तयार होते.
पोटॅश: टोमॅटोमध्ये पोटॅश कमतरतेची लक्षणे फक्त नवीन पालवीवर व खूप जास्त तीव्रता असेल तरच दिसून पडतात. काही पानांची टोके जळतात जर तीव्रता खूप जास्त असेल तर शिराच्या मधील भागात देखील अशीच लक्षणे दिसतात. जर तीव्रता वाढली तर शिरा हिरव्या रहातात व संपूर्ण पान जळके दिसते. पाने जळतात व कुचके होतात. पोटॅश दिल्यावर खराब झालेली पालवी सुधारत नाही मात्र नवीन पालवी चांगली येते.
दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे
मॅग्नेशियम: मॅग्नेशियम: पानाच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो पण शिरा हिरव्या रहातात. पोटाशच्या कमतरतेशी थोड्या प्रमाणात साम्य असले तरी लक्षणे कडे ऐवजी शिरांच्या मध्ये पहिले दिसतात.
गंधक: संपूर्ण पानच पिवळे पडते. शिरा व देठांवर लाल रंग उमटतो. नव्या व जुन्या पालवीत, संपूर्ण पालवीतच पिवळे पणा दिसतो. पानांच्या खालच्या बाजूने लालसर छटा दिसते. जर गंधकाची कमतरता तीव्र असली किंवा दीर्घकाळ राहिली तर पाने ताठ होतात, पिळली जातात व कचकन तुटतात.
कॅल्शियम: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाने देठाच्या बाजूने जळतात. पाने खालच्या बाजूने वाटीसारखे वळतात. जर कमतरता जास्त काळ राहिली तर रोपे कोलमडून पडतात. फळे टोकावर सडतात.
सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे
बोरान: बोरान च्या कमतरतेमुळे पाने हलकी पिवळी दिसतात. वाढणाऱ्या टोकावरील पेशी जळून जातात त्यामुळे वाढणारी टोके आवळली जातात. पाने पटकन तुटतात. व्यवस्थित पाणी देवून देखील टोकावरील पाने कोमेजतात. मायक्रोडील बोरान २० ची फवारणी करावी.