उन्हाळी टोमॅटो लागवड फेसबुक लाइवचे महत्वाचे मुद्दे

उन्हाळी टोमॅटो लागवड फेसबुक लाइवचे महत्वाचे मुद्दे

पाटील बायोटेकचे फेसबुक लाइव हा दर शनिवारी सा. ६ वाजता होणारा कार्यक्रम शेतकरी व कृषीकेंद्र धारकांमध्ये प्रचंड वेगाने  लोकप्रिय झाला आहे. अचूक व शास्त्रशुद्ध मांडणी, अद्ययावत माहिती, वातावरणाचा वेध, बाजार भाव व व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर सल्ला, व्यक्तिगत शंका निरसन असे अनेक पैलू या कार्यक्रमात दिसून येतात. उन्हाळी टोमॅटो लागवड फेसबुक लाइव मार्च ६, २०२१ ला शनिवारी सा. ६ वाजता आपले आवडते मार्गदर्शक श्री. अमोल पाटील यांनी घेतला. या कार्यक्रमाचा व्हिडीओ आपण आमच्या युट्युब चानल वर पाहू शकता. 
या कार्यक्रमाचे ठळक मुद्दे असे आहेत. 
 • उन्हाळी टोमॅटोचे मोठे क्षेत्र नाशिक असून सोबतच नगर, सातारा, पुणे, सांगली, लातूर, अकोला, नंदुरबार या जिल्हातील काही गावात हे पिक घेण्यात येते.
 • आपल्या भागात या पिकाची किती लागवड झाली आहे याचा अंदाज आपण कृषीकेंद्रावरून किती बियाणे विक्री झाले किंवा नर्सरीतून रोपांची विक्री किती झाली यावरुन लावू शकतात.
 • लागवड १५ फेब्रुवारीला सुरु होऊन काही भागात गुढीपाडवा तर काही भागात अक्षतृतीये पर्यंत सुरु राहते.
 • ज्या क्षेत्रात वातावरण थोडे थंड राहते त्या क्षेत्रातील शेतकरी बांधवांनी पण्याच्या उपलब्धते नुसार या पिकाचा विचार नक्की करावा. जिथे गरम हवा वहाते अश्या क्षेत्रात हे पिक टाळावे.
 • जातीची निवड: ज्या चांगल्या जातीचा आपल्याला पूर्व अनुभव आहे ती जात मोठ्या क्षेत्रात लावावी. नवीन जातीची निवड करत असाल तर तिचे क्षेत्र मर्यादित ठेवावे. ६२४२, १०५७ व अन्सल हि बीजे मुख्य आहेत.
 • लागवड पद्धत: प्रती एकर रोपाची संख्या हि उत्पादकतेची महत्वाची बाब आहे. उन्हाळी टोमॅटोसाठी  ४  x १.२५ फुट हे अंतर वापरल्यास एकरी ८७०० रोपांची संख्या बसते. या हंगामात शाखीय विस्तार कमी होतो त्यामुळे अंतर कमी व रोपांची संख्या अधिक अशी योजना तर्कसंगत आहे. पावसाळ्यात व हिवाळ्यात  आपण हे अंतर ४ X २ फुट असे ठेवून रोपांची संख्या ५५०० अशी ठेवतो..
 • अन्नद्रव्य व्यवस्थापन: पिकाचे पोषण उत्तम पद्धतीने करणे मात्वाचे  आहे. त्याची सुरुवात मशागतीपासून होते. एकरी ३-४ टन पूर्ण पणे कुजलेले (खतास कोणतीही दुर्गंधी येता कामा नुये) शेणखत/सेंद्रिय खत/गांडूळ खत टाकावे. उभी आडवी नांगरणी करून खत एकसारखे पसरवावे, कोंबडी खतासारखे कच्चे खत अजिबात वापरू नये
 • लागवडी अगोदर बेड मध्ये द्यायची खते (एकरी): डीएपी - १५० किलो, एम ओ पी १०० किलो, ह्युमॉल जी होर्टीकल्चर स्पेशल ४० किलो,  रीलीजर १० किलो, मायक्रोडील ग्रेड १ - २० किलो, हुमणासुर ३ किलो.  
 • प्लास्टिक मल्चिंग पेपर वापरणे आवश्यक आहे. लागवड करण्यापूर्वी दोन दिवस बेड चांगला भिजवून घ्यावा जेणे करून बेड थंड राहील व रोपे लावल्यावर त्यावर वाफ जाणार नाही. 
 • रोपांच्या उपलब्धतेसाठी आमच्या वेबसाईटवर नर्सरीचे पत्ते दिले आहेत, त्यासाठी इथे क्लिक करा.
 • आळवणी शेड्यल: या शेड्युल मध्ये ४थ्या दिवसापासून १६० व्या दिवसापर्यंतच्या १३ आळवण्या देण्यात आल्या आहेत. हे शेड्युल रिसर्च पेपर व संशोधनावर आधारित फॉर्म्युला नुसार असून इथे क्लिक करून आपण शेड्यूल मागवु शकता 
  • रोग व कीड व्यवस्थापन: या पिकाचे २ प्रमुख शत्रू आहेत - नाग अळी (टूटा एब्सोल्युटा) व सी एम व्ही (कुकुम्बर मोझाईक व्हायरस). या व्यतिरिक्त एनथ्र्याक्नोज (पानावर तपकिरी रंगाचे गोल चट्टे व फळावर काळे गोल डाग पडणे, हि अडचण आद्रता वाढली तर नियंत्रणाबाहेर जावू शकते) यलो लीफ कर्ल व्हायरसअर्ली ब्लाईट (अल्टरनेरीया सोलॅनी), लेट ब्लाईट (फायटोप्थोरा इन्फेस्टन्स), फ्युजारीयम विल्ट (सुरवातीला व फळे लगडलेली असतांना), सन स्काड (उन्हामुळे फळ जळणे), सुतकृमी (मुळावर गाठी होऊन वाढ खुंटणे), फळ पोखरणारी अळी (पावसाळ्यात) या समस्या या पिकात येतात. 
  • नागअळी: या किडीच्या जीवनचक्राची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी "टोमाटोतील विनाशकारी नागअळी आणि नियंत्रण" हा लेख अवश्य वाचवा. त्यासाठी इथे क्लिक करा. नागअळी पानावर दिसू लागते तो पर्यंत वेळ हातातून गेलेली असते. नियंत्रण कठीण होते त्यामुळे अळी येण्यापूर्वीच व्यवस्थापण करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकरी ५० पिवळे व ५० निळे चीपचीप सापळे लागवडीच्या दिवशीच लावावे. यावर किडीचे प्रौढ चिटकून बसतात व प्रजनन थांबते. याशिवाय लागवडी नंतर पहिल्या ८-१० दिवसात १५ लिटर च्या पंपात २० मिली व्हार्टेक्स, १०  ग्राम एक्टाराअरेना ६ ग्राम, ब्लेझ १५ लिटर किंवा ब्लेझ सुपर ५ मिली हि फवारणी घ्यावी. याव्यतिरिक्त टूटा एब्सोल्युटा चे फेरोमोन सापळे देखील उपयोगात आणले जावू शकतात. 
  • सी एम व्ही (कुकुम्बर मोझाईक व्हायरस): व्हायरस च्या अनेक प्रजाती असतात व त्यात सातत्याने जनुकीय बदल होत असतात. वेलवर्गीय पिकात, मिरची, पपई, टोमॅटो यात व्हायरस चे प्रमाण मोठे असते. केळीमध्ये देखील व्हायरसचा प्रकोप दिसून येत आहे. पूर्वी रोग फक्त पानावर उमटून पडत असे पण आता फळांवर देखील डाग पडतात व त्यामुळे मार्केट रेट मिळायला अडचण येते. यामुळे पिकात व्हायरस येण्यापूर्वीच त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. नर्सरीतून रोपे घेतांना नावाजलेल्या नर्सरीतूनच रोपे खरेदी करा (यादी साठी इथे क्लिक करा.). रोपे लागवड केल्यावर लगेच एकरी ५० पिवळे व ५० निळे चिकट सापळे लावा. रसशोषक/वाहक किडीचे नियंत्रण होण्यासाठी याची मदत होते. फवारणी करते वेळी पिकासोबत परिसरातील तणावर देखील फवारणी करावी जेणे करून त्यावर लपून रहाणारी कीड देखील नियंत्रणात येईल. 
  • फवारणी शेड्युलची अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा 

  अचूक व्यवस्थापन झाल्यास एकरी उत्पादन कमीत कमी ४०-५० टन व जास्तीत जास्त ८०-१०० टन उत्पादन मिळते.

  आपल्याला आमचे फेसबुक लाइव नियमितपणे बघायचे असल्यास आमच्या फेसबुक पेज ला लाईक करावे. आपला प्रश्न व्हाटसअपवर विचारण्यासाठी इथे क्लिक करा किंवा 99239 74222 या फोन नंबर वर संपर्क साधा. 

  हे पेज आपण जास्तीत जास्त शेअर करावे हि विनंती. 

  Back to blog