टोमाटोतील विनाशकारी नागअळी आणि नियंत्रण

टोमाटोतील विनाशकारी नागअळी आणि नियंत्रण

टोमाटोतील नागअळी (टूटा एब्सोल्युटा) अतिशय नुकसानकारक कीड आहे. हि कीड वांगी, शिमला मिरची, बटाटे अश्या अनेक पिकात आढळून येते पण टोमाटोत हि मोठा विनाश करते, उत्पादनात ५० ते १०० टक्के नुकसान करू शकते.

प्रौढ मादी पतंग पानांच्या खालच्या बाजूला पिवळसर अंडी देते. अंडी एका ठिकाणी न देता, विखरून दिली जातात. एक मादी २६० ठिकाणापर्यंत अंडी देवू शकते.

या अंड्यातून बाहेर पडणारी बाल्यावस्थेतील अळी पिकावर सर्वाधिक परिणाम करते.
पान व खोडाच्या पृष्ठभागाखाली प्रवेश करून त्या आतील हरितलवक खायला सुरवात करतात.

या मुळे पाने वाळू लागतात. मोठी पानगळ होऊ शकते. त्यामुळे उत्पादन हातचे जावू शकते.
जीवाणू व बुरशीजन्य रोगाच्या प्रसाराला चालना मिळून "सडण्याची" प्रक्रिया सुरु होते.

१५ ते २० दिवसात बाल्यावस्थेतील अळी, चार वेळा कात टाकून, हळूहळू मोठी होते.
मोठ्या झालेल्या अळ्या पिकातील विविध भागांवर व फळावर आढळून येवू शकतात.


या अळ्या आता कोष तयार करतात. त्या पानात, पानावर, फळात, फळावर किंवा अगदी मातीत कोष तयार करतात.

प्रत्येक कोषातून एक प्रौढ जन्माला येतो.
हे प्रौढ दिवसा लपून राहतात व रात्री कार्यरत रहातात.

२८ ते ३८ दिवसात जीवनचक्र पूर्ण होते.
अतिउच्च प्रजनन क्षमते मुळे हि कीड मोठ्या प्रमाणात धोकेदायक आहे.

  1. पिक पंधरा दिवसाचे झाले कि एकरी ८ सापळे लावावे
  2. ल्युअर दर ४५ दिवसात बदलावे. 
  3. दर आठवड्याला सापळे साफ करावेत
  4. सापळा पिकाच्या उंचीच्या वर ठेवावा

 

Back to blog