जर तुमच्याकडे पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन व बाजारपेठेचे ज्ञान असेल तरच निशिगंध लागवडीचा विचार नक्की करावा. हार-तुरे याव्यतिरिक्त सुगंध निर्मिती कारखान्यात देखील याला मागणी असते. लागवड एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात स्वच्छ -भूसभूषित जमिनीत करावी. जमिनीत भरखते व जोरखते मिसळण्या पूर्वी तज्ञांना जमिनीचा प्रकार, मागील पिक, त्यास दिलेली खते, आलेले उत्पादन याची कल्पना देवून भरखताचे व जोरखताचे एकरी डोस फोन करून विचारून घ्यावेत. लागवडीसाठी निवडक व एकसारख्या आकाराचे, २० ते ३० ग्राम वजनाचे कंद वापरावेत. लागवणी नंतर लगेच पाणी देवून सुप्तावस्था तोडावी.
----------------------------
फार्म एक्चेंज च्या पेजला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा!
----------------------------
लागवडीच्या पद्धती
- कमी कसदार जमिनीत ३ मी. X 2 मी. च्या सपाट वाफ्यात ३० X २० सें.मी. अंतरावर ४ ते ५ सें.मी. खोल
- कसदार जमिनीत ४५ X ३० सें.मी. अंतरावर वरंब्याच्या मध्यभागी ५ ते ६ सें.मी. खोल
वातावरण व पिकवाढीच्या स्थितीनुसार ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. तुषार सिंचन करणे चांगले. वेळोवेळी खुरपणी व खांडणी करून कंदांची स्थिती उत्तम ठेवावी.
मावा, फुलकिडे, नाकतोडे व अळी या किडीं व खोडकुज, कांद्कुज, दांड्याची कुज व पानांवरील ठिपक्या रोगांचा पावसाळी प्रादुर्भाव दिसून येतो. फुलकिडीचे प्रभावी नियंत्रण केले नाही तर बंचीटॉप विषाणू येवून मोठे नुकसान होऊ शकते. पिवळे चिकट सापळे वापरून फुलकीडींचा मागोवा घेत रहावा. कंदाच्या जाती, वातावरण व पिकाची स्थिती या नुसार कीटकनाशक व बुरशीनाशकाची निवड करण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी. कंद पिक असल्याने वाळवी, हुमणी व सुतकृमींचा प्रभाव पडू शकतो.
सर्वकाही व्यवस्थितपणे केल्यास ९० दिवसात फुलांचे दांडे दिसू लागतात, त्यानंतर १० ते २० दिवसात काढणीयोग्य होतात. काढणी धारदार चाकूने १५ अर्धाफुट उंचीवर करावी. कापल्यावर लगेच पाण्यात ठेवावी व ६ ते ८ तासाने वहातुक करावी.
अपेक्षित एकरी वार्षिक उत्पादन: २ ते ३ टन फुलांचे किंवा एकरी १.२५ ते १.७५ लाख फुलदांड्या.
दर्जेदार रखरखाव केल्यास एकदा लागवड केली कि तीन ते चार वर्ष पिक चालू शकते, त्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रयत्न गरजेचे आहेत.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |