पिकवा सोने - जमिनीखाली!

पिकवा सोने - जमिनीखाली!

मित्रहो हळदीला जमिनीखालचे सोने समजले जाते. काही महत्वाचे मुद्दे सांभाळले तर हे पिक भरपूर उत्पादन देवू शकते. हे मुद्दे नोंदवहीत लिहून ठेल्याने नियोजनासाठी चांगली मदत मिळेल.. 

 • १५ मे ते जूनचा पहिला आठवडा हा कालावधी हळद लागवडीसाठी उत्तम समजला जातो
 • ४० डीग्री पेक्षा अधिक तापमान असेल तर तापमानात घट व्ह्यायची वाट पहा 
 • १५ जूननंतर हळदीची लागवड केल्यास हळदीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता असते
 • भारी, काळ्या चिकण, क्षारयुक्त किंवा चुनखडीयुक्त जमिनीत हळदीचे पीक घेवू नये
 • जमीन चांगली निचरा होणारी असावी
 • मृदेची खोली एक फुट असावी
 • मृदेचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा
 • कंदवर्गीय पिकाच्या जुन्या बेवडावरती पुन्हा हळदीची लागवड करू नये
 • बेडमध्ये हवा खेळती राहते अत्यंत महत्त्वाचे आहे


  • एकरी ७ ते ८ टन चांगले कुजलेले शेणखत ३ किलो हुमणासूर मध्ये मिसळून शेतात पसरवावे
  • एकरी २०-३० किलो हुमोल जी कंद स्पेशल वापरायला विसरू नये
  • ओल्या मळीचा वापर हळदीमध्ये करू नये
  • एकरी २५० किलो सुपर फॉस्फेट आणि १०० किलो अमृत गोल्ड एस ओ पी (००-००-५०) या खतांचा वापर जमीन तयार करतेवेळी करावा
  • बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. -एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत.
  • मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, तर हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असावीत

 

--------------------------------
-------------------------------

 • बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे
 • बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे
 • मऊ बेणे वापरू नये कारण त्याला कंद कुज झालेली असते
 • बीजप्रक्रियेच्या द्रावणात तरंगणारे बेणे काढून टाकावे

  हळद या पिकात अलीकडे हुमणी ची लागण होत असल्याचे बघितले गेले होते. जर आपण हळद लागवड करायचे ठरवत असाल तर इथे दिलेल्या ऑफर चा फायदा घेवू शकता.

  -------------------------------------------------------

   ---------------------------------------------------------

    

  या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

  तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

  इथे क्लिक करा.

  Back to blog