हळदीतील प्रश्नोत्तरे
शेतकरी मित्रहो यापूर्वी आपण पिकव सोने-जमिनीखाली हा लेख प्रसिद्ध केला होता. वेळोवेळी शेतकरी बांधवांनी जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरे इथे संकलित स्वरुपात देत आहे. आपले काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये विचारू शकता.
प्रश्न: हळद काढणीला किती दिवस लागतात?
उत्तर: हळद काढणीला ६ ते ९ महिने लागतात. हळव्या जाती ६ महिन्यात तयार होतात, तर गरव्या जाती ९ महिन्यात तयार होतात. व्यापारी हळद गरव्या प्रकारातील असते. फुले स्वरूपा, सेलम, कृष्णा,राजापुरी, डुग्गीराला, वायगाव, कडाप्पा या व्यापारी जाती आहेत. ६० टक्क्या पेक्षा जास्त पाने कोरडी व्हायला लागली कि हळद काढणीस आली आये असे समजावे.
प्रश्न: दोन बेण्यातील अंतर व दोन सरीतील अंतर साधारण पने किती असावे? (आशिष कुमार गंगनर)
गादीवाफ्याच्या बरोबर मध्यभागी लॅटरल अंथरून लॅटरलच्या दोन्ही बाजूला १५ सें.मी. अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावेत म्हणजेच दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. होईल. दोन कंदांमधीलही अंतर ३० सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर दोन ओळी लावाव्यात.
प्रश्न: हळदीत किती मायक्रोन चे प्लास्टिक मल्चिंग वापरावे? (डॉ. शंकर इरप्पा धमनसुरे)
मल्चफिल्म निवडीसाठी आमच्या एका लेखात केलेल्या उल्लेखा नुसार भुइमुगात ७ मायक्रोन जाडीचा पेपर वापरायचा असतो. एका वर्षाच्या आत निघणाऱ्या पिकासाठी २० ते २५ मायक्रोन, मध्यम काळाच्या पिकासाठी ४० ते ५० मायक्रोन व बहुवार्षिक पिकासाठी ५० ते १०० मायक्रोन जाडीचा पेपर वापरावा. याचा संदर्भ घेतला तर हळदीत २०-२५ मायक्रोन जाडीचा पेपर वापरावा.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
1 ka bed var 3 line lavalya tar chalel ka?