Call 9923974222 for dealership.

पपई टूटीफ्रूटीचे प्रयोग

टूटीफ्रूटी आवडत नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही. पाव, केक, ब्रेड, आईसक्रिम, पान अश्या कितीतरी पदार्थात टूटीफ्रूटी वापरली जाते. लहानगेच काय! मोठाल्ले खवय्ये देखील टूटीफ्रूटी मोठ्या आवडीने खातात!! रंगीबेरंगी, सुगंधी, गोड टूटीफ्रूटीची मजाच काही और असते. 

तरुण, उत्साही व हुन्नरी शेतकरी बांधव टूटीफ्रूटीचा उपयोग पपईचे भाव राखण्यासाठी नक्कीच करू शकता. याचा फार मोठा कारखाना असावा असे नाही. जितक्या जास्त प्रकारच्या टूटीफ्रूटी आपण बनवू शकाल तितकि याची मागणी वाढू शकते. अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात करून, विविध प्रयोग करून बाजारात आपली ओळख व ब्रांड बनवणे शक्य आहे. जर आपण ओळख व ब्रांड बनवू शकला तर मग किती कमवता याचा काही मर्यादाच नसतील.

मनाचे मनोरे उंच करण्याअगोद टूटीफ्रूटी बनवायची मूळ प्रक्रिया काय असते ते बघू.

झाडावरील कच्ची पण चांगली पपई या प्रक्रीये साठे वापरली जाते. थोडी किंवा पूर्ण पिकलेली फळे अजिबात चालत नाहीत. फळे चांगली धुवावीत जेणेकरून त्यावर लागलेला मळ किंवा फवारणीचे अवशेष वाहून जातील. 

फळ बाहेरून सोलुन व अर्धे कापून आतल्या बिया देखील पद्धतशीरपण काढून टाकल्या जातात. बारीक फोडी कापून फ्रुट कटरच्या मदतीने त्यांचे अजून छोटेछोटे चौकोनी तुकडे करण्यात येतात. 

हे तुकडे ट्रेमध्ये एकसारखे पसरवून कडक वाफेवर ५ मिनिट शिजवतात जेणेकरून फळातील विकरे (एन्झाइम) निष्क्रिय होतील. 

जितकि साखर तितकेच पाणी घेवून, गरम करत साखर विरघळून घेतात, त्यात थोडे सायट्रिक एसिड (लिंबू सत्व) टाकातात. थोड्या प्रमाणात व्हेनीला, केवडा किंवा इतर तत्सम इसेस्न्स वापरून प्रयोग करून पाहू शकता. हे इसेन्स आपल्याला कुल्फी-गोलाचे साहित्य विकणाऱ्या दुकानात सहज मिळू शकतात. लिंबूसत्व वापरल्याने टूटीफ्रूटीची टिकवण क्षमता वाढते त्यामुळे ते चुकवू नये.

यावेळी आपण विविध खाद्यरंगांचा देखील समावेश करू शकतात. लाल, हिरवा, पिवळा व तांबडा हे रंग खाद्यपदार्थांना आकर्षक बनवतात. ब्रॅन्डिंगच्या दृष्टीकोनातून आपण नैसर्गिक रंगांचा उपयोग करू शकता. बीट पासून बनवलेला लाल रंग, पालकापासून बनवलेला हिरवा रंग, केसरापासून बनवलेला केसरी रंग व हळदीपासून पिवळा रंग! आपल्या कल्पनेची भरारी यात अजून काही रंग नक्की भरेल!

रंग व इसेन्स नुसार साखरेचे विविध द्रावण बनतील. यात शिजवलेले पपई ३ दिवसापर्यंत भिजवायचे. १२ तास झाले कि द्रावण वेगळे करावे, द्रावणाचे पाणी उडवून किंवा त्यात जास्तीचे साखर व इतर घटक विरघळून त्यात पुन्हा हे तुकडे भिजवावे. या प्रक्रीयेमध्ये पपईतील पाणी निघून जाते व स्वादयुक्त साखर आतपर्यंत एकसारखी पसरते.

तयार उत्पादन सौरउर्जेवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रीकल ओव्हन मध्ये ५०-६० डिग्री सेल्सिअस तापमानावर ५-६ तास सुकवतात. 

सर्वसाधारण पणे टूटीफ्रूटीचा आकार चौकोनीअसतो, पण याचा लगदा करून त्याला विविध आकारात बनवल्यास लहानमुलांना जास्त आकर्षित करू शकता व टूटीफ्रूटीचे एक वेगळे उत्पादन बनवू शकता. सुरुवातीला आपण फ्रुट कटर वापरून जे छोटेछोटे तुकडे करतो त्याऐवजी आपण त्याचे लांब काप बनवून मग पुढील प्रक्रिया करू शकता. अश्या पद्धतीने टॉफीचा आकार व तसे पेकिंग करता येईल!

पैकेजिंग विवध पद्धतीने करता येवू शकते. लहानमुलांच्या टूटीफ्रूटी पारदर्शक डिस्पोजेबल ग्लास मध्ये टाकून ग्लासच्या तोंडावर इंडक्शन सिलिंग करावे. या सिलिंग व आकर्षक व नेटके डिझाईन करावे. 

औद्योगिक टूटीफ्रूटी साठी १ किलोचे पाउच पेकिंग करून १० किलोचे खोके भरावेत.

मित्रहो, हा लेख आपल्याला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका.

लेख आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवासोबत नक्की शेअर करा.

"पपई-मैलाचा दगड" हे फेसबुक लाइव २७ फेब्रुवारी २०२० ला घेण्यात आले होते. यात पाटील बायोटेक तंत्रज्ञान देखील विषद करण्यात आले. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published