Call 9923974222 for dealership.

काकडी - टरबूज ची तयारी सुरु केली का?

हिवाळा जोरात आहे पण आपल्याला पुढील सिझनची तयारी करायला हवी. उन्हाळा येतो आहे. अनेक शेतकरी बांधवांनी टरबूज, काकडी अश्या पिकांचा हंगाम घ्यायचे ठरवले आहे. मागील वर्षी बाजारभावाचा फटका बसल्यामुळे काही शेतकरी या वर्षी हात आखडता घेतील तर काहींच्या शेतात उसाचा खोडवा काढल्यावर पुढील उस लागवड होईपर्यंत शेत रिकामे पडू नये म्हणून टरबूज-काकडी लागवडीचा निर्णय होईल. सर्वसाधारणपणे १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान लागवड करावी जेणे करून फळे ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार मिळतील. त्यांना मागणीदेखील अधिक असते. 

------------------

फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.

------------------

वालुकामय, पोयट्याची, मध्यम ते काळी, पाण्याचा निचरा असणारी, सेंद्रिययुक्त जमीन लागवडीसाठी उत्तम असते. आठपेक्षा जास्त सामू, चुनखडीयुक्त, चोपण जमीन लागवडीत हे पिक घेवू नये.

उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान चांगले मानवते. या पिकींच्या उत्तम वाढीसाठी २२ ते २५ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

 

वाणांची निवड, रोपनिर्मिती, विद्राव्य खते, ठिबक, मल्चिंग पेपर तसेच आधुनिक व एकात्मिक व्यवस्थापन या सर्वांचा नियोजनबद्ध अवलंब केला तर पिकाचे उत्पादन वाढते,दर्जा चांगला येतो व खर्चदेखील कमी होतो. अधिक मार्गदर्शनासाठी आपण आमच्या तज्ञांना संपर्क साधू शकता, आपला संपर्क देण्यासाठी खाली तंत्रज्ञानाची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आपली माहिती भरायला विसरू नका. 

{हा लेख फेसबुक वर शेअर करून आम्हाला मदत करा!} 

वर दाखवलेल्या पोष्ट मध्ये आमचे प्रतिनिधी श्री. संदीप जाधव दिसून येत आहेत. त्यांच्या सारखे आमचे अनेक प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यात असून ते लागवडी पासून काढणी पर्यंत योग्य मार्गदर्शन करतात. अनेक वेळेला शेतात येवून मार्गदर्शन केले जाते. पाटील बायोटेक तंत्रज्ञान विलक्षण आहे. लागवडीपासून काढणी पर्यंत प्रत्येक टप्यात अशी योजना केली जाते जेणे करून पिकाचे पोषण उत्कृष्ट होईल, कीड - रोग कमीत कमी येतील व उत्पादन अधिकाअधिक होईल. कोणत्याही शेतकरी बांधवाने लागोपाठ तीन ते चार वर्ष प्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरले कि ते त्याला आत्मसात होते. प्रत्येक हंगामात मागील हंगामापेक्षा अधिक चांगले उत्पादन येते, मृदेचा पोत सुधारतो, खर्चावर नियंत्रण येत जाते. 

--------------------

मित्रहो टरबूजाला चांगली किंमत मिळावी म्हणून आपण प्रयत्न करू शकता. आपल्या उत्पादनाविषयी आमच्या फार्म एक्स्चेंज मध्ये माहिती नोंदवा. त्यासाठी इथे क्लिक करा. 

--------------------

मित्रहो, कोणतेही पिक लागवड करते वेळीच त्याच्या विक्रीची योजना आखायला हवी. मागील वर्षी जळगाव शहरात केला. "नेरी फार्म चे प्रसिद्ध टरबूज" असे बोर्ड तयार करून फळांची विक्री थेट ग्राहकास केली. जेव्हा इतर दुकानांवर १५ रु किलोचा दर होता तेव्हा हि फळे 20 रु किलोने विक्री झालीत. योजना बद्ध लागवड, काढणी व विक्री व्यवस्थापन यातून चार पट उलाढाल करण्यात आम्ही यशस्वी झालो, नफा देखील तिप्पट मिळाला. इतर अनेक दुकानदार आमच्या नावाने टरबूज विक्रीचा प्रयत्न करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. याचा आम्हाला आनंदच झाला कारण लोक चांगल्या नावाचीच नक्कल करतात! प्रत्येकाने नियमितपणे नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रयत्न करायला हवा. येत्या हंगामात देखील आमची नवी योजना असणार आहे. 

मित्रहो टरबूज व काकडी पिकात फळमाशीचा मोठा त्रास होतो. त्यासाठी आपण मक्षिकारी चा वापर करू शकता. टरबूज, खरबूज, काकडी, दुधी, कारली, दोडका अश्या वेलवर्गीय पिकात मक्षिकारीचे सापळे लावल्याने फळमाशी पूर्णपणे नियंत्रणात रहाते. इतर किडींचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण एकरी १५ यलो व 5 ब्ल्यू स्टिकी ट्रॅप लावावेत. या व्यतिरिक्त अमृत गोल्ड वाटर सोल्युबल एन पी के खतांच्या फवारणीतून देखील आपण खत मात्रा संतुलन साधू शकता. 

आमची उत्पादने ऑनलाईन खरेदि करू शकता.त्यासाठी इथे क्लिक करा.

मक्षिकारी सापळ्यात मरून पडलेल्या फळमाशा

पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर आधारित दुधी चा प्लॉट. दुधीचा ज्यूस पिल्याने बोजड शरीर कमी करता येते. हा ज्यूस म्हणजे लाइफस्टाइल प्रोडक्ट आहे त्यामुळे रुपयाचा दुधी दहाला सहज जावू शकतो. 

कारले हे पिक तुम्हाला सहज लखपती बनवू शकते. तुमच्या मेहनतीला पाटील बायोटेक तंत्रज्ञानाची जोड द्या व योग्य वेळी मार्केटिंगची तयारी सुरु करा. कारले ज्यूस व पावडर यांना शहरी भागात मोठी मागणी आहे कारण ते मधुमेहावर उपयोगी आहेत. 

 

मक्षिकारीवर सूट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

कोणतीही फवारणी न करता फळमाशी नियंत्रित होते यामागे "कामगंध तंत्रज्ञान" लपलेले आहे. या तंत्राचा उलगडा करून दाखवीत आहे आमचे तज्ञ श्री. हनुमंत सावंत.

मक्षिकारी चा सापळा वापरला नाही तर टरबूजाच्या प्लॉट मध्ये असे फळ नजरेस पडतात. दुर्लक्ष केले तर ७० ते 90 टक्के नुकसान होते.

 

तुमचे शेत नीटनेटके असेल तर एग्रोटुरिझम च्या माध्यमातून अधिक चांगली कमाई करता येते. जर तुमच्या शेताजवळ कुठला टुरिस्ट स्पॉट असेल तर हे विदेशी पर्यटक तुम्हाला भरपूर पैसा देवू शकता. त्यांच्या रहाण्या-खाण्याची सोय करा, सुरक्षित व आरामदायक व्यवस्था करा. वातावरण कौटुंबिक राहील असे बघा. 

शेताजवळून हायवे जात असेल तर टरबूजाचा ज्यूस 20 रु ग्लास दराने नक्की विक्री होईल. एका टरबूजात किती ग्लास बनतील? टरबूज तुमचे, मेहनत तुमची आणि पैसाही तुमचाच! धडाडी असेल तर ज्यूस चे टेट्रा पॅकिंग देखील होते. अर्थात त्यासाठी स्वप्न पहायची व त्यांना खरे करायची धमक हवीच ना. 

 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

5 comments

 • खुप छान माहिती दिली

  Anil Kapadi
 • Best mahiti

  atul apsunde
 • Nice

  Rahul Gadve
 • खूपच सुंदर लिहीलं आहे

  मोटे अतूल
 • छान

  व्यंकट

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published