टरबुज खरबुज लागवडीची पुर्वतयारी
शेतकरी मित्रहो,
सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिडीओ वर आधारित आहे. आमचे व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वेलवर्गीय पिकातील टरबुज व खरबुज पिकांची लागवड येत्या काही दिवसांत सुरु होऊ शकेल.पण ज्या ठिकाणी थंडी वाढुन तापमान १५ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे तिथे जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात लागवड करणे योग्य असेल.
रोपे बनवुन लावली तर हे पिक फक्त ७५ दिवसाचे असल्याने बेसल डोस मल्चिंग पेपर च्या खाली चांगला व उत्पादकतेच्या आधारे देणे आवश्यक आहे.
एकरी खतांचा डोस खालील प्रमाणे द्यावा
- डीएपी किंवा १०:२६:२६ - २ बॅग किंवा सुपर फॉस्फेट - ३ बॅग
- एमओपी ५० किलो
- मायक्रोडील कॉबी कीट २३ किलो
- ह्युमॉल जी हॉर्टिकलचर स्पेशल २० किलो
- रिलीजर ५ किलो
- निंबोळी पेंड १०० किलो
हा डोस मिसळून बेड तयार करावे, त्यावर लॅटरल व मल्चिंग पेपर टाकुन, लागवड पूर्व तयारी करून ठेवावी.

मायक्रोडील कॉबी कीट २३ किलो मध्ये बेसल डोस साठी आवश्यक खते जसे मॅग्नेशिअम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मेंग्नीज सल्फेट व बोरॅक्स समाविष्ट केलेली असतात. हि किट सर्व नामांकित कृषी केंद्रात उपलब्ध आहे.

ह्युमॉल जी हॉर्टिकलचर स्पेशल चा समावेश बेसल डोस मध्ये केल्याने नत्र, स्पुरद, पालाश, मॅग्नेशिअम, कॅल्शीयम यांचा अपटेक वाढतो.

रीलीजर हे अतिसूक्ष्म गंधक असून त्याचा बेसल डोस मध्ये समावेश केल्याने मुळाच्या क्षेत्रातील सामू सुधारतो. गंधकाचा पुरवठा होतो, रोगकारक बुरशी नष्ट होते. सर्व नामांकित कृषीकेंद्रात रीलीजर उपलब्ध आहे.
या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.