Call 9923974222 for dealership.

गहू लागवड व व्यवस्थापन -भाग 2

गहू लागवडी संदर्भात भाग यापूर्वी प्रकाशित करण्यात आला असून तो वाचण्यासाठी इथे क्लिक करा. या भागात आपण उत्पादन वाढविण्यासाठी करायचे व्यवस्थापन, कमतरतेची लक्षणे व त्यांचे निराकरण याविषयी माहिती घेवू.

गहु चांगलाच हिरवागार असेल व पाने भरपूर असतील तर प्रकाशसंश्लेषण उत्तम होईल. हा पर्णसांबार शेवटपर्यंत चांगला हिरवागार टिकून रहायला हवा. यावर पिंगटपणा, डाग, चट्टे-पट्टे अशी अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे दिसायला नकोत. प्रकाशसंश्लेषण चांगले झाले तर ओम्ब्यांच्या संख्येत व लंबित सुधारणा होईल. दाणे भरण्याच्या काळात नत्र, स्पुरद, पालाश, मेग्नेशियम, झिंक या घटकांचे पोषण उत्तम असले तर दाणे चांगले व एकसारखे भरले जातील. उत्पादनात भरगोस वाढ होईल हे निश्चित. 

गहू पिकात १२ अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येवू शकतात. मृदेची अवस्था, खत नियोजन, जलव्यवस्थापन, गव्हाचे वाण अशा अनेक घटकांचा अन्नद्रव्य उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. लक्षणे दिसल्यावर लवकरात लवकर नियोजनात योग्य तो बदल करून पिकाची वाढीची अवस्था पूर्ववत करता येवू शकते. लक्षणे ज्या पट्यात दिसून येत आहेत त्याच पट्यात हवा तो बदल केल्याने खर्च नियंत्रणात ठेवणे शक्य आहे.

कमतरतेची पूर्तता करते वेळी मिश्रण खतांचा वापर करावा जेणे करून एका घटकाची कमतरता भरून निघाल्याने दुसऱ्या घटकाची कमतरता उचंबळून येणार नाही. कधी कधी एका घटकाच्या कमतरते मुळे दुसऱ्या घटकाची देखील कमतरता निर्माण होते. मिश्र खते वापरल्याने हि अडचण देखील आपसूक दूर होते.

सेंद्रिय घटकाच्या कमतरते मुळे अन्नद्रव्याच्या कमतरता बळावू शकतात. जर आपण पेरणी करते वेळी ४० किलो बियाण्यांसोबत एक किलो ह्युमोल गोल्ड दिले नसेल तर शक्य तितक्या लवकर एकरी दोन किलो ह्युमोल गोल्ड ४०० लिटर पाण्यात मिसळून द्यावे जेणे करून सेंद्रिय घटकाची कमतरता भरून निघेल व कमतरतेची लक्षणे दिसण्याचे प्रमाण घटेल.

नत्राच्या कमतरते मुळे येणारा पिंगटपणा: गव्हात पिंगट पणाची अनेक करणे असू शकतात पण जेव्हा पिंगट पणाची सुरवात जुन्या पानापासून होते तेव्हा प्रमुख्याने नत्राची कमतरता आहे असे लक्षात घ्यावे. यामुळे वाढीचा वेग (व्हीगर) कमी होते. पाने लहान राहू लागतात. लक्ष न दिल्याने हि पाने टोकाकडून पिवळी पडत जावून गळून पडतात, फुटवे कमी रहातात, पिक वेळेअगोदर पक्व होते, खुजे रहाते. ओंब्या छोट्या रहातात.

सामू चे असंतुलन, हलकी मृदा, मृदेतील सेंद्रिय घटकांची कमतरता, जल-असंतुलन या घटकामुळे नत्राची कमतरता अधिक तीव्र होऊ शकते.

पाटील बायोतेकची अमृत गोल्ड १९-१९-१९ व कॅलनेट हि दोन खते वापरून कमतरता भरून काढली जावू शकते.

स्पुरद कमतरतेचे जांभळे चट्टे: स्पुरदाची कमतरता झाल्यास हिरव्या पानावर, क्षिरांवर व खोडावर जांभळे चट्टे दिसुन येतात. जुन्या पानावर पहिले परिणाम होतो. पाने वेळेअगोदर निकामी होतात. वाढीचा दर मंदावतो, ओम्ब्या छोट्या रहातात.

अति विम्ल अथवा अम्लारी मृदा, सेंद्रिय घटकाचा अभाव, गारठा-ओलावा, अविकसित मुळे, मृदेतील स्पुरादाचा अभाव, मृदेतील वाढीव लोह या मुळे स्पुरादाची कमतरता तीव्र होऊ शकते.

पाटील बायोटेक ची अमृत गोल्ड १२-६१-०० व ००-५२-३४ हि दोन खते वापरून कमतरता भरून काढली जावू शकते.

पोटाशच्या कमतरतेमुळे जळकी टोके: नवी पाने टोकावर निळसर हिरवी दिसतात. जुन्या पानांची टोके पिवळी दिसून जळू लगतात. जर हि अवस्था टिकून राहिली तर दोन पेरातील अंतर कमी राहिल्याने पिक ठेंगणे रहाते.

अति आम्ल मृदा, वालुकामय हलकी मृदा, अवर्षण, अति पाण्यामुळे अन्न द्व्य्व वाहून गेल्याने, मृदेत पालाश ची कमतरता, मृदेतील जास्तीचा मॅग्नेशियम यामुळे पोटाशची कमतरता वाढीस लागते.

पाटील बायोटेकची अमृत गोल्ड ००-००-५० व ००-००-२३ हि खते वापरल्याने कमतरता भरून निघेल. 

माळेसारखे चट्टे मॅग्नेशियम कमतरतेचे: जुन्या पानावर माळेप्रमाणे हिरवे व पिवळे चट्टे दिसतात. पानांची टोके जळकी दिसतात. पान सूर्यप्रकाशात धरल्यास चट्टे स्पष्ट दिसतात. वाढ खुंटते.

वालुकामय मृदा, अम्ल्धार्मी मृदा, अति पालाश, ओलसर थंडी यामुळे हि कमतरता वाढते.

पाटील बायोटेक चे ह्युमेग दिल्याने हि कमतरता भरून निघेल.

स्प्रिंगसारखी पाने-कॅल्शियम कमतरतेमुळे: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाने टोकाच्या बाजूला घड्याळातील स्प्रिंगसारखी वळतात. कधी कधी ते मध्य शिरेवरून आतमध्ये मोडतात. आम्लधर्मी हलकी मृदा, मृदेतील अति सोडियम व अल्युमिनियम मुळे, दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणी वाढू शकतात. पाटील बायोटेकचे कॅलनेट वापरून कमतरता कमी करता येईल. 

गंधक कमतरतेमुळे फिक्कट हिरवी पाने: गंधकाची कमतरता झाल्यास पाने पिंगट-हिरवी दिसतात. संपूर्ण रोपाची व ओम्ब्यांची वाढ खुंटते. नवीन पानावर अधिक परिणाम होतो.

आम्ल धर्मी हलकी मृदा, सेंद्रिय घटकाची कमतरता, पाणथळ यामुळे गंधकाची कमतरता वाढू शकते.

गंधक पाण्यात विरघळत नाही त्यामुळे साधी गंधक पावडर पाण्यात मिसळत नाही व शेतात नीट पसरत नाही. पाटील बायोटेक चे रीलीजर हे ९० टक्के गंधक आहे ते पाण्यात भिजले कि वेगाने पसरते. खूप बारीक केलेले असल्याने सहज पसरते व चार दिवसात लागू होते. गंधकाची कमतरता सहज भरून काढते. एकरी ३ किलोचा डोस आहे.

ओंब्या वाकड्या करणारी बोरानची कमतरता: पाने किंचित वाकडी-तिकडी होतात, कांद्या जाडसर होतात व वाढीचे टोक जळून जाते. ओंब्या एकदम खुड्क्या होतात, त्यात दाने नसतात, ओम्बीचे काटे वेडेवाकडे होतात.

वालुकामय मृदा, विम्ल मृदा, मृदेतील सेंद्रिय घटकाची कमतरता, अतिप्रमाणातील नत्र किंवा कॅल्शीयम, पाण्याचा ताण यामुळे हि अवस्था बळावू शकते.

पाटील बायोटेक चे मायक्रोडील बि-२० पाण्यात पूर्णपणे विरघळते व याची फवारणी करून हि अडचण दूर केली जावू शकते.

तांब्याची कमतरता आणि रिकाम्या ओंब्या:  

तांब्याची कमतरता असेल तर बहुतेक वेळा ओंब्या आवरणातून बाहेरच पडत नाही. पडल्या तर टोक पांढरे असते व त्यास काटेच नसतात. रोपाची पाने पंढरी, वाकलेली व पांढऱ्या टोकाची असतात. नवीन पाने उन्मळून पडतात व खालच्या बाजूची पाने मात्र गडद हिरवी असतात. रोपाची वाढ पूर्णपणे खुंटते. कमतरतेचे प्रमाण कमी असले तर ओंबी मधून वाकते. अश्या ओंब्या काच्याच रहातात. त्याच्या काही भागात हिरवा असतो.

नत्राचा जास्त वापर, अति सेंद्रिय घटक, चुनखडीची मृदा, वालुकामय मृदा यामुळे कमतरता बळावू शकते.

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. लक्षणे दिसू लागल्यावर मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

लोहाच्या कमतरतेमुळे येणारा पिंगट पणा: लोहाची कमतरता असल्यास निवीन पानाच्या शिरामधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्या रहातात. कमतरता दूर न केल्यास पूर्ण पानच पिवळे रहाते व जुनी पाने देखील पिवळी पडू लागतात.

विम्ल मृदा, पाणथळ मृदा, चूनखळी तसेच मृदेत गरजेपेक्षा जास्त तांबे, मेंग्नीज किंवा झिंक असल्यास लोहाची कमतरता बळावते.  

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. लक्षणे दिसू लागल्यावर मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

पाटील बायोटेक चे मायक्रोडील आयर्न-१२  पाण्यात पूर्णपणे विरघळते व याची फवारणी करून हि अडचण दूर केली जावू शकते.

मॅगनीज ची कमतरता आणि मोडणारी पाने: या घटकाची कमतरता झाल्यास सुरवातीला पिवळे डाग व चट्टे पडतात. पुढे ते पांढरे पडता- तपकिरी होतात. एकत्र येतात. हि लक्षणे प्रथम नवीन व आतल्या पानांवर दिसतात. जेव्हा डाग वाढतात तेव्हा तेथून पाने मोडतात-वाकतात. वाढ थांबते. उभ्या पिकात आपणास परिणाम झालेले पट्टे चे पट्टे दिसू शकतात.

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. लक्षणे दिसू लागल्यावर मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

मोलाब्दाची कमतरतेची लक्षणे आहेत नत्राच्या कमतरते सारखी: या घटकाची कमतरता असेल तर पिक पिंगट दिसते, वाढ थांबते. टोके जळू लागतात. आम्ल मृदा व सेंद्रिय घटकाच्या कमतरते मुळे हि मोलाब्दाची कमतरता बळावू शकते.

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. लक्षणे दिसू लागल्यावर मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

झिंकची कमतरता म्हणजे मोठे नुकसान: प्रत्येक ओम्बित उच्च प्रतीचे भरपूर दाणे भरण्यासाठी झिंक हा घटक अतिशय महत्वाचा आहे. विम्ल मृदा, मृदेत अतिरिक्त फोस्फेट किंवा त्याचा गरजेपेक्षा जास्त पुरवठा केल्याने झिंक ची कमतरता बळावू शकते.

कमतरता असलेले रोप निस्तेज असते. पानवर जांभळी छटा येते. जुन्या पानांवर गर्द तपकिरी कडा असलेले तपकिरी डाग पडतात. वाढ खुंटते. हरितलवकाच्या कार्यावर परिणाम होतो. पेर छोटे रहातात.

पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

 

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. लक्षणे दिसू लागल्यावर मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

पाटील बायोटेक चे मायक्रोडील झिंक-१२  पाण्यात पूर्णपणे विरघळते व याची फवारणी करून हि अडचण दूर केली जावू शकते.

गव्हातील रोग व कीड नियंत्रणाबद्दल माहितीसाठी गहू लागवड व व्यवस्थापन -भाग 3 लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

संदर्भ:

एफएओ.ओआरजी

आपणास हि माहिती कशी वाटली? प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

शेअर नक्की करा

 

1 comment

  • Useful information.nice.

    Nandkishor Goley

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published