सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का?

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का?

भविष्य वर्तवणे हि एक मोठी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्री चा वार्षिक टर्नओव्हर अब्जोवधी रुपयाचा असावा. व्यक्तिगत भविष्य सांगितले जाते त्याप्रमाणे देशाची आर्थिक स्थिती कशी राहील? राजकीय स्थिती कशी राहील? तंत्रज्ञान कसे असेल? पर्जन्यमान कसे राहील? अशी भाकिते आपण नित्य ऐकत असतो.

डिसेंबर महिना हा व्यक्तिगत भविष्य सांगणाऱ्या लोकांचा मोठा सिझन असतो.  इतरही वेळेला त्यांचा धंदा सुरूच असतो पण डिसेंबर महत्वाचा. ज्या लोकांना आज-उद्याची फारशी पडलेली नसते, बाप-जाद्याचा रग्गड पैसा असतो असे लोकं मोठ-मोठ्या ज्योतिषांकडे जातात तर ज्यांच्याकडे काहीच नसते ते छोट्या ज्योतिषांकडे जातात.

माणसाचा जेव्हा स्वत:वरचा आत्मविश्वास कमी असतो तो भविष्य जाणून घ्यायचा प्रत्यत्न नकी करतो. माझ्या एका मित्राच्या डोक्यावर बोटाने मोजता येतील इतकेच केस शिल्लक आहेत. अजून लग्न व्हायचे आहे. खूप प्रयत्न करून व उपचार करूनही फायदा न झाल्याने त्याने मुंबई च्या एका नामांकित वैद्याकडे जायचे ठरवले. मी त्याची थोडी समजूत काढायचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नाही. त्याला म्हटले, जाण्यापूर्वी एखाद्या ज्योतिष्याला विचारून घे "डोक्यावर केस येणार कि नाही?"  आता मोठी गम्मत येणार आहे. ज्योतिषाने हो म्हणून देखील केस आले नाहीत तर "कुणाला चुकीचे म्हणणार?" व उलटे झाले तर?  यातील गमतीचा भाग सोडला तर...चिंता व अंदाज यांचा कायमचा संबंध आहे. चिंता कमी झाली तर भविष्य पहायची फारशी गरज पडणार नाही, हे निश्चित.

हवामानाच्या अंदाजाची गोष्टच वेगळी आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतीला मारक ठरतो.  कमी-जास्त पर्जन्य, वादळ, गारपीट यांचा मोठा फटका शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर पडत असतो. वातावरण कसे राहील याचा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यास हवा असतो. सरकारी वेधशाळा, व्यावसायिक वेधशाळा, परंपरागत भॆडवळ गावात होणारी घटमांडणी यांचा अंदाज नित्याने येत असतो. मे-जून हा यांचा मुख्य सिझन असतो. कोणती पद्धत अधिक चांगली आहे? भरोशाची आहे हे कसे शोधणार?  

बरीच मंडळी हाती वृत्तपत्र आले कि पहिले "आजचे राशीभविष्य" वाचतात. त्यावरून कुणी फारशे निर्णय घेत नसले तरी संकटाच्या वेळी कधी कधी आपले चांगले किंवा ठीकठीक राशीभविष्य वाचून मनाला थोडा धीर मिळतो. मी हा प्रयोग थोड्या वेगळ्या पद्धतीने करतो. "आजचे राशीभविष्य" सकाळी न वाचता, सायंकाळी झोपी जायच्या अगोदर वाचतो. ५० टक्के वेळा ते थोडेफार जुळते. जर प्रत्येक बारकाईने मुद्देसूद बघायला लागलो तर हा टक्का खाली खाली यायला सुरवात होते. 

 मग माझ्या भविष्याबद्दल आश्वस्थ असायचा मार्ग काय?

  • आर्थिकदृष्ट्या मजबुतीसाठी मी पैसा बचत करून विविध पद्धतीने त्यास गुंतवून ठेवतो व त्यावर चांगले व्याज मिळेल हे बघतो. चांगले भाडे मिळणार नसेल तर अनावश्यक स्थावर मालमत्तेत पैसा अडकवत नाही. कोणत्याही क्षणी माझे कर्ज माझ्या ठेवींपेक्षा जास्त होणार नाही हे सुनिश्चित करतो. शिवाय आरोग्यविमा, अपघाती विमा नियमित सुरु ठेवतो.
  • मानसिकदृष्ट्या मजबुतीसाठी आरोग्य चांगले ठेवतो. चांगली पुस्तके वाचतो. चांगले लिखाण करतो. मोजक्या मित्रांशी, कौटुंबिक पातळीवरील संगत ठेवतो. 
  • कौटुंबिकदृष्ट्या मजबुतीसाठी संस्कृती जपतो, प्रत्येकाच्या इच्छा-अपेक्षांची जाणीव ठेवतो, चर्चा व संवाद टिकवून ठेवतो.

यातून माझे भविष्य चांगले राहील अशी मला खात्री आहे. मृत्यू म्हणाल तर तो कुणाला सुटलेला नाही, दुख: म्हटले - ते हि कुणालाच सुटलेले नाही. या दोन गोष्टींना घाबरायची गरज नाही. 

या माझ्या व अनेक सुखी व्यक्तींच्या "कृती व अनुभवाचा" उपयोग करून आपण निसर्गाच्या लहरीपणाचा व शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाचा मेळ साधू शकतो का?

वेधशाळेचे अंदाज हे डेटाबेस वर अवलंबून असतात. डेटाबेसचे गणितीय व शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून वेध घेतला जातो. तरीही आजपर्यंत विश्वास ठेवावा इतकि अचूकता त्यात नाही हे सत्य आहे. आपल्या देशात भ्रष्टाचार बोकाळलेला असल्याने स्वार्थापोटी काही लोकं "अंदाजा" बद्दल फिक्सिंग करू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही.

मग नैसर्गिक परिस्थिती बद्दल आश्वस्थ असायचा मार्ग काय? शेतीला आर्थिकदृष्ट्या भक्कम करणे आवश्यक आहे. येणाऱ्या उत्पन्नातून बचत करत गुंतवणूक करणे शक्य आहे. हि गुंतवणूक क्रमवार पद्धतीने करावी. सर्वप्रथम मातीचा कस सुधारावा,काही भागात शेडनेट करावे, काही भागात ग्रीनहाउस करावे, शेतीचा एक भाग जोडधंद्यासाठी वापरावा. जर तुमच्याकडे तुमच्या आवाक्या पेक्षा जास्त जमिन असेल तर बाकी भाग इतरांकडून कसावा, जर तुमच्याकडे जमीन कमी असेल तर इतरांची जमीन कसायला घ्यावी. शेतीसाठी यंत्रसामुग्री, गोदामे यांची गरज असते. यात गुंतवणूक करून इतरांकडून भाडे मिळवले जावू शकते. ज्या गोष्टींचा अनुभव किंवा ज्ञान नाही ते क्रमवार पद्धतीने मिळवावे. पिकविमा तसेच इतर विमे नित्याने सुरु ठेवावेत. वेधशाळेचे अंदाज ढोबळ असतात हे धरून चालावे. तुमच्या शेतात छोटे वेधयंत्र लावले तर ते पुढल्या १२ ते २४ तासाचा अंदाज तुम्हाला देवू शकते. त्या यंत्राची माहिती खाली दिलेली आहे. फोटोवर क्लिक करून खरेदी करू शकता.

हे सर्व करून शेतीतील धोके संपतील असे नाही. अर्थात यास आपण घाबरायची गरज नाही. या धोक्यांशी लढत आपले पूर्वज इथवर आले. हि लढाई आपल्या रक्तात आहे. 

आवडले? शेअर करा!

Back to blog