४० टक्यापर्यंत उत्पादन वाढवणारी खते कोणती?
पारंपरिक खते (सुपर फॉस्फेट, डाय- अमोनियम फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश) पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्यामुळे सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन व फवारणीच्या माध्यमातून देणे अवघड आहे. संपूर्ण जमिनीवर किंवा जमिनीतून दिल्यावर हि खते जमिनीत असणाऱ्या क्लेच्या संपर्कात येवून स्थिर होतात किंवा वाहत्या पाण्यातून निचऱ्यावाटे वाहून जातात. पारंपारिक खते तणांच्या वाढीस पूरक ठरून मजुरीचा खर्च देखील वाढवतात. एकूणच हि पारंपारिक खते तितकीशी फायदेशीर ठरत नाहीत.
हीच बाब लक्षात ठेवून पाटील बायोटेक घेवून आले आहे अमृत गोल्ड एन पी के खते - 100 टक्के पाण्यात विरघळणारी नत्र, स्फुरद व पालाशयुक्त, दर्जेदार बनावटीची अत्याधुनिक खते.
उत्पादनवाढीसाठी अमृत गोल्ड एन-पी-के खते फायदेशीर
विविध पिकांत सूक्ष्म सिंचनाद्वारे संपूर्ण विद्राव्य अमृत गोल्ड एन-पी-के खतांचा वापर केला असता असे निदर्शनास आले, की
- उसामध्ये 50 टक्के खतांची बचत होऊन 40 टक्के उत्पादनात वाढ झाली.
- केळीमध्ये 20 टक्के बचत करून 11 टक्के उत्पादनात वाढ झाली
- कांदा, बटाटा, टोमॅटो व भेंडीमध्ये 40 टक्के बचत करून उत्पादनात अनुक्रमे 16, 30, 33, व 18 टक्के वाढ झाली.
- द्राक्षात 40 टक्के, चिकूत 12 टक्के, नारळात 15 टक्के, पेरूत 27 टक्के उत्पादन वाढ झाली
ज्या ठिकाणी ठिबक अथवा तुषार सिंचनाची व्यवस्था नाही; परंतु पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, गरजेप्रमाणे ठराविक अन्नद्रव्ये जमिनीतील विविध प्रकार आणि अनिष्ट गुणधर्मांमुळे उपलब्ध होत नाही तेथे हि खते फवारणीद्वारे देता येतात. या खतांच्या फवारणीमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन फळांचे वजन, आकार व प्रतीमध्ये चांगली वाढ होते. साठवणुकीत तसेच निर्यातक्षम उत्पादन राहिल्याने उत्पन्नातही वाढ होते.
अमृत गोल्ड एन पी के चे विलक्षण फायदे
- मजूर, यंत्रसामग्री, इंधन, वीज, पाणी व खते यांची बचत होते.
- पिकाच्या गरजेनुसार योग्य ते अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात योग्य वेळी देता येते.
- हि खते बहुतांशी आम्लधर्मीय असून क्षारभार कमी असणारी आहेत
- सोडिअम व क्लोरिन मुक्त असल्याने जमिनीच्या गुणधर्मावर त्यांचा अनिष्ट परिणाम होत नाही.
- पाण्याचा व खतांचा कार्यक्षमतेने वापर झाल्याने जमिनीची सुपीकता टिकते, उत्पादनात चांगली वाढ होते.
- अमृत गोल्ड एन पी के खते ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रातच दिली जातात, त्यामुळे त्यांचे शोषण कार्यक्षमरीत्या होते.
- पिकाची वाढ जोमाने होते ते रोगास बळी पडत नाही, साहजिकच बुरशीनाशकांवरील खर्च कमी होतो.
- पिकाच्या वाढीनुसार म्हणजेच गरजेनुसार खते देता येतात, त्यामुळे खतांच्या मात्रेत संतुलन साधून बचत करता येते.
- या खतांमुळे 20 ते 40 टक्के खतांची बचत, 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होऊन 25 ते 40 टक्के उत्पादन वाढ होते.
- खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.
- अमृत गोल्ड १९-१९-१९, नत्र, स्पुरद व पालाश चा समप्रमाणात पुरवठा करते. वाढीच्या अगदी सुरवातीच्या काळात याचा वापर करावा. निस्तेज झालेल्या पिकात सुधारणा करण्यासाठी याची फवारणी अतिशय प्रभावी ठरते.
- अमृत गोल्ड १३-४०-१३ शाखीय विकासासाठी याचा चांगला उपयोग होतो.
- अमृत गोल्ड १२-६१-०० म्हणजेच विद्राव्य मोनो अमोनियम फॉस्फेट; नत्र व स्पुरद चे उत्कृष्ट खत. सुरवातीच्या काळात जेव्हा नत्र व फॉस्फेट ची पिकास गरज असते, याचा वापर प्रभावशाली ठरतो. पिक फुलावर यायला यामुळे मदत मिळते.
- अमृत गोल्ड १३-००-४५ म्हणजेच विद्राव्य पोटॅशीअम नायट्रेट. या खतात नत्र नायट्रेट स्वरूपातील असल्याने लगेच शोषले जाते, शिवाय पोटॅशीअम च्या शोषणात मदत करते. यात क्लोराईड नसल्याने म्युरेट ऑफ पोटॅश पेक्षा चांगले आहे, क्षारपड जमिनीत याचा उपयोग लाभकारी आहे.
- अमृत गोल्ड ००-५२-३४ म्हणजेच विद्राव्य मोनो पोटॅशीअम फॉस्फेट; स्पुरद व पोटॅश चे उत्कृष्ट खत. फळांच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात जेव्हा पोटॅशीअम व फॉस्फेट ची पिकास जास्त भूक असते, याचा वापर प्रभावशाली ठरतो. फळे रसदार व गोड व्हावीत म्हणून फळांच्या वाढी च्या काळात याचा उपयोग करावा.
- अमृत गोल्ड ००-००-२३ म्हणजेच पोटॅशिअम शोनाइट, पालाश व मॅगनेशियम ची पूर्तता करते. दोघी अन्नद्रव्य सल्फेट स्वरुपात असतात त्यामुळे गंधकाचा पुरवठा होतो. क्लोरीन सहन न होणाऱ्या पिकात एम ओ पी ऐवजी याचा वापर केला जातो.
- अमृत गोल्ड ००-००-५० म्हणजेच सल्फेट ऑफ पोटॅश. पिकास पोटॅश व गंधकाचा पुरवठा करणारे विद्र्याव्य खत. यात क्लोराईड नसल्याने म्युरेट ऑफ पोटॅश पेक्षा चांगले आहे, क्षारपड जमिनीत याचा उपयोग लाभकारी आहे. फळांची टिकवण क्षमता वाढण्या साठी याची फवारणी करावी.
दुसरा महत्वाचा मुद्दा असा कि वाटर सोल्युबल खत भरभर देऊन मोकळे होऊ नका. शक्य तितके हळू व शक्य तितक्या जास्ती पाण्यात द्या जेणे करून ते मूळच्या भोवती एकसारखे पसरेल. जर खत भरभर दिले तर ते पिकाद्वारे वापरले जायच्या आधीच मूळक्षेत्रातून निघून जाईल. शिवाय जर ते एकसारखे पसरले नाही तर पिक त्याचे व्यवस्थित शोषण करू शकणार नाही.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Nice
माहिती छान आहे,
प्रतेक भाग सुटा करून खूप छान समजावून सांगितले आहे.
Khup chan mahiti ahe
Kites wela khatanchya rasaynik abhikriya mule drip band paste Tyasathi kay karta yeil
Sadhya mi D A P v potash denyacha vichar karit aho tari margadarshan karave.
मायक्रोन्युटरीएंट बद्यल दिलेली माहिती छान आहे.