वाटर सोल्युबल खताबद्दल काही नियम
वाटर सोल्युबल खते म्हटली कि आपल्याला वाटते कि पाण्यात टाकलेली सर्वच्या सर्व खते लगोलग विरघळून जायला हवीत. अनेकदा असे होत नाही आणि मग आपण विचार करतो कि आपण खरेदी केलेल्या खतात काही गडबड आहे. तसे नसते. लक्षात घ्या जर कुणाला गडबड करायची असेल तर तो वाटर सोल्युबल खतात साधे मीठ मिसळेल..कारण मीठ अगदी स्वस्त: असते व ते सहज विरघळते!
वेगवेगळी खते पाण्यात मिसळण्याचे प्रमाण कमी जास्त असते. पाण्याचे तापमान वाढवले तर विरघळण्याचे प्रमाण वाढते.
इथे चर्चा करतांना सर्वसाधारणपणे २०-३० डिग्री सेल्सिअस तापमानाला किती खत विरघळेल यावर आपण चर्चा करू. एक लिटर पाण्यात जवळपास खालील प्रमाणात खते विरघळतील
- २ किलो अमोनियम नायट्रेट
- १ किलो युरिया
- १.२५ किलो कॅल्शीयम नायट्रेट
- ७५० ग्राम अमोनियम सल्फेट
- ७०० ग्राम मेग्नेशीयम नायट्रेट
- ५०० ग्राम एन पी के १९-१९-१९
- ४५० ग्राम एन पी के १३-४०-१३
- ३५० ग्राम मोनो अमोनियम फोस्फेट (१२-६१-००)
- २८० ग्राम पोटॅशियम शोनाइट (००-००-२३)
- २५० ग्राम पोटॅशियम क्लोराईड (म्युरेट ऑफ पोटाश)
- २२५ ग्राम मोनो पोटॅशियम फोस्फेट (००-५२-३४)
- २०० ग्राम पोटॅशियम नायट्रेट (१३-००-४५)
- ११० ग्राम पोटॅशियम सल्फेट (००-००-५०)
ठिबक संचासाठी खताचे पाणी बनवतांना वर दिलेल्या यादीचा उपयोग करू शकता. दिलेल्या मात्रे पेक्षा अधिक मात्रा वापरू नका खत विरघळणार नाही, ठिबक ब्लोक होईल.
दोन खते एकत्र विरघळवायचा प्रयत्न केल्यास दोघींची विरघळण्याची क्षमता कमी होते.
पाण्यात क्षार असतील तर (पाणी जड असेल) तर खतांची विरघळण्याची क्षमता कमी होते.
काही खते एकमेकाला विरघळायला विरोध करतात किंवा त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन तिसरा न विरघळणारा घटक तयार होतो.
खाली अश्या खतांच्या जोड्या देत आहे त्या कधीही एकमेकात मिसळू नये.
- कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम सल्फेट
- कॅल्शीयम नायट्रेट - पोटॅशियम सल्फेट
- कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम फोस्फेट
- कॅल्शीयम नायट्रेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
- कॅल्शीयम नायट्रेट - फोस्पेरिक एसिड
- कॅल्शीयम नायट्रेट - सल्फ्युरिक एसिड
- अमोनियम फोस्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
- पोटॅशियम सल्फेट - अमोनियम सल्फेट
- कॅल्शीयम नायट्रेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
- पोटॅशियम कलोराइड - पोटॅशियम सल्फेट
- पोटॅशियम सल्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
- पोटॅशियम सल्फेट - सल्फुरिक एसिड
- अमोनियम फोस्फेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
- फोस्फरिक एसिड - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
--------------------------------
Aor
Sir give me a price list for the water soluble fertilyizer
विरुद्ध खते मिसळून दिल्याने काय परीणाम होतात उदा. जमिनीवर का पिकांवर
याची माहिती मिळाली उत्तम आहे
I lihe