Call 9923974222 for dealership.

वाटर सोल्युबल खताबद्दल काही नियम

वाटर सोल्युबल खते म्हटली कि आपल्याला वाटते कि पाण्यात टाकलेली सर्वच्या सर्व खते लगोलग विरघळून जायला हवीत. अनेकदा असे होत नाही आणि मग आपण विचार करतो कि आपण खरेदी केलेल्या खतात काही गडबड आहे. तसे नसते. लक्षात घ्या जर कुणाला गडबड करायची असेल तर तो वाटर सोल्युबल खतात साधे मीठ मिसळेल..कारण मीठ अगदी स्वस्त: असते व ते सहज विरघळते!

--------------------------------
-------------------------------

वेगवेगळी खते पाण्यात मिसळण्याचे प्रमाण कमी जास्त असते. पाण्याचे तापमान वाढवले तर विरघळण्याचे प्रमाण वाढते.

इथे चर्चा करतांना सर्वसाधारणपणे २०-३० डिग्री सेल्सिअस  तापमानाला किती खत विरघळेल यावर आपण चर्चा करू. एक लिटर पाण्यात जवळपास खालील प्रमाणात खते विरघळतील

 • २ किलो अमोनियम नायट्रेट
 • १ किलो युरिया
 • १.२५ किलो कॅल्शीयम नायट्रेट
 • ७५० ग्राम अमोनियम सल्फेट
 • ७०० ग्राम मेग्नेशीयम नायट्रेट
 • ५०० ग्राम एन पी के १९-१९-१९
 • ४५० ग्राम एन पी के १३-४०-१३
 • ३५० ग्राम मोनो अमोनियम फोस्फेट (१२-६१-००)
 • २८० ग्राम पोटॅशियम शोनाइट (००-००-२३)
 • २५० ग्राम पोटॅशियम क्लोराईड (म्युरेट ऑफ पोटाश)
 • २२५ ग्राम मोनो पोटॅशियम फोस्फेट (००-५२-३४)
 • २०० ग्राम पोटॅशियम नायट्रेट (१३-००-४५)
 • ११० ग्राम  पोटॅशियम सल्फेट (००-००-५०) 

--------------------------------
-------------------------------

ठिबक संचासाठी खताचे पाणी बनवतांना वर दिलेल्या यादीचा  उपयोग करू शकता. दिलेल्या मात्रे पेक्षा अधिक मात्रा वापरू नका खत विरघळणार नाही, ठिबक ब्लोक होईल.

दोन खते एकत्र विरघळवायचा प्रयत्न केल्यास दोघींची विरघळण्याची क्षमता कमी होते.

पाण्यात क्षार असतील तर (पाणी जड असेल) तर खतांची विरघळण्याची क्षमता कमी होते.

काही खते एकमेकाला विरघळायला विरोध करतात किंवा त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन तिसरा न विरघळणारा घटक तयार होतो.

खाली अश्या खतांच्या जोड्या देत आहे त्या कधीही एकमेकात मिसळू नये.

 • कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम सल्फेट
 • कॅल्शीयम नायट्रेट - पोटॅशियम सल्फेट
 • कॅल्शीयम नायट्रेट - अमोनियम फोस्फेट
 • कॅल्शीयम नायट्रेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
 • कॅल्शीयम नायट्रेट - फोस्पेरिक एसिड
 • कॅल्शीयम नायट्रेट - सल्फ्युरिक एसिड
 • अमोनियम फोस्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
 • पोटॅशियम सल्फेट - अमोनियम सल्फेट
 • कॅल्शीयम नायट्रेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
 • पोटॅशियम कलोराइड - पोटॅशियम सल्फेट
 • पोटॅशियम सल्फेट - फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
 • पोटॅशियम सल्फेट - सल्फुरिक एसिड
 • अमोनियम फोस्फेट - चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 
 •  फोस्फरिक एसिड  चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 
--------------------------------
-------------------------------
हा ब्लोग वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा

 

humol gold solubility

या फोटोत आम्ही एक प्रयोग करून दाखवला आहे. ह्युमोल गोल्ड म्हणजेच वाटर सोल्युबल पोटॅशीयम ह्युमेट तीन प्रकारच्या पाण्यात विरघळून बघितले असता ते आम्लधर्मी (Acidi pH)  पाण्यात विरघळत नाही तर उदासीन (Neutral pH) व विम्लधर्मी (Alkaline pH) पाण्यात सहज विरघळते. पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड दर्जेदार असून ऑनलाईन खरेदी केल्यास घरपोच पाठवले जाते. खरेदी करण्यासठी इथे क्लिक करा. 

 --------------------------------

------------------------------

6 comments

 • Thank you khup chaan mahiti milali.

  Hasib patel (HP)

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published