"उत्पादन वाढवले तर आपले नुकसान होईल" - बागुलबुवा उवाच!

शेतीची उत्पादकता वाढवल्याने शेतमालाला कमी भाव मिळतो असे तुम्हाला वाटत असेल तर हा छोटेखानी ब्लॉग आपण नक्की वाचावा. 

पाटील बायोटेक तंत्रज्ञान हि आमची एक अनोखी संकल्पना आहे. कृषी उत्पादकतेत सातत्याने वाढ करायचा प्रयत्न करणे हे या संकल्पनेचे मूळ आहे. या तंत्रज्ञानात, कोणतेहि पिक असो, सर्वसाधारण उत्पादकते पेक्षा अधिक उत्पादन घेण्याचे लक्ष समोर ठेवण्यात येते. मृदेचा कस लक्षात घेवून पिक-पोषण व्यवस्थापन व  पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देण्यात येतो. उत्पादकता वाढते. हजारो शेतकरी बांधव या तंत्रज्ञानाच्या सातत्यपूर्णतेचा अनुभव घेत आहेत. तंत्रज्ञाना बद्दल अधिक माहिती हवी असल्यास खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करावे.

तंत्रज्ञाना व्यतिरिक्त आपण वाचत असेलेले ब्लॉग हा आमचा एक अग्रणी उपक्रम आहे. फेसबुक, व्हाटसएप, टेलेग्राम व युट्युबच्या माध्यमातून आम्ही नियमित ब्लॉगचा प्रसार करतो. या ब्लॉग द्वारे शेतकरी बांधवांशी जुळून रहाणे, त्यांना योग्य माहिती पुरवणे, कंपनीच्या उत्पादनांची माहिती देणे, उपक्रम व तंत्रज्ञानाबद्दल त्यांना अवगत करणे हि आमची उद्दिष्ट आहेत. कोणतेही वेळेचे बंधन न रहाता हे काम अहोरात्र व आपोआप सुरु रहाते. कुठलाही शेतकरी मित्र कोणत्याही वेळी आमच्या ब्लॉगिंग सेवांचा लाभ घेवू शकतो, आपल्या प्रतिक्रिया देवू शकतो किंवा आमच्या हाकेला प्रतिसाद देवू शकतो. आमचे ब्लॉग फक्त आमची जाहिरात नाही, टीव्ही/पेपर मधील जाहिरात जशी अडचणीची वाटते, तसे इथे होत नाही. ब्लॉगचा सकारात्मक उपयोग करून घेणारे हजारो शेतकरी बांधव आहेतच पण पाची बोटे सारखी नसतात. काही मित्र उगाचच नकारात्मकता घेवून जगतात. या नकारात्मकतेतून अनेकदा चुकीच्या प्रतीक्रिया येतात. नकारात्मक प्रतिक्रियांना चाळणी लावणे आवश्यक असते कारण त्या उगाचच इतर वाचकांत नकारात्मकतेची विषारी बीजे पेरतात.  

"उत्पादन वाढल्याने भाव कमी होतात, कर्ज होते व आत्महत्या होतात" अशा आशयाची एक प्रतिक्रिया वाचल्यावर मला फार वाईट वाटले. चुकीच्या पद्धतीने केलेली मांडणी धोकादायक असते. समाजातील काही बागुलबुवा सातत्याने अशी मांडणी करीत असतात.  त्यांना शह देण्यासाठी हा ब्लॉग लिहायचे ठरवले.

कितीही झाले तरी शेती हा एक व्यवसाय आहे. कुठल्याही व्यवसायाप्रमाणे शेतीतही एका पेक्षा अधिक समस्यांना सामोरे जावे लागते. पाटील बायोटेक तंत्रज्ञान पोषण व्यवस्थापनावर व गरज पडली तरच कीड-रोग नियंत्रणावर काम करते. पिकाची निवड, इतर रखरखाव, उत्पादन, विक्री अश्या इतर अनेक बाबींचा विचार शेतकरी बांधवांनाच करायचा असतो. इतर समस्यांचा सामना करून नफा कमवायचे कसब शेतकरी बांधवाच्या "मेहनत, हुशारीवर व सरतेशेवटी नशिबावर" अवलंबून असते. आधुनिक शेतीच्या कक्षादेखील आता खूप रुंदावल्या आहेत. नव युगातील शेतकऱ्यास अनेक बदलांचा सामना करावा लागतो आहे. हवामान बदल, जमिनीची धूप, जैव विविधतेच ऱ्हास, ग्राहक अपेक्षेतील बदल, कृषी तंत्रज्ञानाबद्दलचे समज असे अनेक बदल घडत आहेत. शेती करणे, इतर अनेक व्यवसाया प्रमाणे, जिद्दीचे काम आहे. नफा कमवायचा असेल तर व्यवस्थापन तोडीचे करावे लागते. 

आपण प्रत्येकाने जिगर मुरादाबादीचा एक शेर लक्षात घ्यावा - 

ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे
इक आग का दरिया है और डूब के जाना है 
मित्रहो शेतीची उत्पादकता वाढवल्याने शेतमालाला कमी भाव मिळतो असे अजिबात नाही. तुमच्याकडे उपलब्ध क्षेत्रासाठी उत्कृष्ट व्यवस्थापन करा.
काही महत्वाच्या बाबी लक्षात घ्या - 
  • पिक पद्धतीत अचानक व अमूलाग्र बदल करू नका. आपल्या भागात किती पर्जन्यमान आहे, भूजल पातळी कशी आहे यानुसार पिक ठरवा. कमी पर्जन्यमान व खोल भूजल पातळी असलेल्या क्षेत्रात जास्त पाणी लागणारी व दीर्घकालीन पिके ३०-४० टक्के पेक्षा जास्त क्षेत्रात लावू नका. 
  • संपूर्ण शेतात एकच पिक लावू नका. ३० टक्के क्षेत्रात एक व्यापारी पिक, २० टक्के क्षेत्रात फळ झाडे, २० टक्के क्षेत्रात मृदेचा कस वाढवणारी द्विदलवर्गीय पिके,  १५ टक्के क्षेत्रात चारा पिके व उर्वरित क्षेत्रात भाजी-पाला, फळ भाज्या, औषधी पिके, घरगुती गरजा भागवणारी पिके घ्या. आपल्या हिशोबाने आपण योग्य बदल करू शकता पण शेतीतून नियमित आवक होत राहील असे बघा. दर आठवड्याला, दर तीन महिन्याला काही ना काही भरीव आवक येत राहील असे नियोजन आखा.
  • प्रत्येक हंगाम एकाच पद्धतीने विकू नका. शक्य तितक्या वेगवेगळ्या पद्धती वापरा. काही उत्पादनावर प्रक्रिय करा, काही भाग थेट विक्री करा व शेवटी व्यापारी आहेच.
  • मी झिरो बजेट शेती करू? सेंद्रिय शेती करू? कि रासायनिक शेती करू? अश्या द्विधेत फसू नका. शेती हा व्यवसाय आहे व नफा कमवला तरच व्यवसाय सुरु रहातो हे लक्षात ठेवा. आपण १०-२० टक्के क्षेत्रात प्रयोग करू शकता पण पूर्ण शेतात झिरो बजेट- सेंद्रिय शेती असे प्रयोग करू नका.
  • कमी काळात, कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचा ध्यास सोडू नका. पाटील बायोटेक तंत्राचा अवलंब करा. नफा कमवायचा हा गुरुमंत्र आहे हे लक्षात घ्या.
  • नकारात्मकता पसरवणाऱ्या बागुलबुवापासून सावध राहा. त्याला सुधारणे कठीण आहे, वेळोवेळी त्याला हुसकावून लावा. स्वत:ला सकारात्मक ठेवा.

  

अनेक पिकांसाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.