महारष्ट्रात वाढतोय रोपवाटिका उद्योग

महारष्ट्रात वाढतोय रोपवाटिका उद्योग

रोपांची वाढ करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करणे म्हणजे रोपवाटिका. हे जितके शास्त्र आहे तितकीच कला देखील त्यामुळे रोपवाटिका चालवायला आवड हवी. चांगल्या बियाण्याची, मातृवृक्षाची जाण असणे गरजेचे आहे. विविध प्रकारची कलमे करणे, रोपांना रोग व किडींपासून दूर ठेवणे, एकसारख्या, निरोगी, रोपांची निर्मिती करणे फार महत्वाचे आहे.


चांगली रोपवाटिका उपलब्ध असणे शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यांना आयती कलमे/रोपे उपलब्ध होतात. वेळ, पैसा व श्रम वाचतात व रोपांच्या गुणवत्तेची शंका राहत नाही. दुर्मिळ कलमे देखील सहज उपलब्ध होतात. फळबागा/ फळभाज्या लावण्यास वाव मिळतो

रोपवाटिका प्रस्थापित करतांना तरूण उद्योजकांनी चांगले ट्रेनिंग घ्यायला हवे. तसेच कोणत्या प्रकारची रोपवाटिका प्रस्थापित करायची आहे? कशी कार्यरत ठेवणार आहे? किती रोपे उत्पादित करावयाची आहे? जमीन, पाणी, मजुरांची उपलब्धता कशी आहे? मातृवृक्ष, खुंट यांची उपलब्धता आहे का? शेड ची गरज किती आहे अश्या अनेक बाबी लक्ष्यात घ्याव्यात. जागा ठरवते वेळी दळणवळण, वाहन उपलब्धता देखील आवश्यक आहेत.

पाटील बायोटेक प्रा. ली. या वेबसाईटच्या मध्यमातून आम्ही रोपवातीकांची यादी देत आहोत तसेच रोपवातीकांची नोंदणी देखील करीत आहोत. इथे क्लिक करून आपणास रोपवाटिकांची यादी पहाता येईल. जर आपन रोपवाटिका चालवत असाल व यापूर्वी नोंदणी केलेली नसेल तर खाली दिलेला फॉर्म भरायला विसरू नका.

Back to blog