पाटील बायोटेकच्या सोशल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी इथे क्लिक करा!

मक्या ल्युअर व ट्रैप (सेट ऑफ १०)
मक्या ल्युअर व ट्रैप (सेट ऑफ १०)
मक्या ल्युअर व ट्रैप (सेट ऑफ १०)
मक्या ल्युअर व ट्रैप (सेट ऑफ १०)
मक्या ल्युअर व ट्रैप (सेट ऑफ १०)
मक्या ल्युअर व ट्रैप (सेट ऑफ १०)

मक्या ल्युअर व ट्रैप (सेट ऑफ १०)

Vendor
Patil Biotech Pvt Ltd
Regular price
Rs. 750.00
Sale price
Rs. 600.00
Quantity must be 1 or more

Makya is a pheromone trap for Fall Armyworm (Spodoptera frugiperda). In this offer it is available in set of 10 lures and 10 traps. Product is shipped all over India.

या ऑफर मध्ये आपणास मक्याचे १० सापळे व १० ल्युअर पाठवण्यात येतील. 

मक्या काय आहे?

मक्या हा एक कामगंध सापळा असून यात अमेरिकन लष्करी अळीचे प्रौढ नर  आकर्षित होऊन मरतात. मक्याच्या मदतीने आपल्या शेतात अमेरिकन लष्करी बोंड अळी आली आहे कि नाही हे शेतकऱ्यास कळू शकते व त्यानुसार तो फवारणी चे नियोजन करू शकतो.

कोणकोणत्या पिकात वापरावे?

हि कीड नवीन आहे. २०१८ या वर्षी भारतात आली असून प्रार्थमिक पिक मका असले तरी ऊस, कापूस अश्या व्यापारी पिका सोबत १०० पेक्षा अधिक पिकांवर हल्ला करू शकते. 

अधिक माहिती

किडीची एक पिढी ३० ते ४० दिवसांची असते. पतंग - अंडी - अळीच्या विविध अवस्था - कोष - पुन्हा पतंग अश्या अवस्था आहेत. मादी पतंग अंडीपुंज घालते. त्यातून येणारी खादाड अळी १४ ते ३० दिवसात सहा अवस्था पूर्ण करते. शेवटच्या अवस्थेत अळीच्या डोक्यावर इंग्रजी L आकाराची खूण असते तर शेपटीकडे वरच्या पृष्ठभागावर चार काळे ठिपक्यांचा चौकोन दिसतो. हि अळी जमिनीमध्ये ८ ते १० दिवसासाठी कोषावस्थेत जाते. त्यातून बाहेर येणारे पतंग ७-८ दिवस जगतात. ते काटक असतात. उडून लांबपर्यंत जातात, मिलन करतात, अंडी घालतात व मरतात

इतर किडी प्रमाणे मादीने अंडी दिल्यावर काही दिवसात त्यातून अळी बाहेर येते. हि भुकेली व अधाशी अळी सुरवातीला कोवळ्या पानांवर ताव मारते. सुरवातीला फक्त पृष्ठभाग खरवडते पण नंतर तिची भूक अजून वाढते. थोडी मोठी झाल्यावर ती पानावर छिद्रे पाडू लागते. पानाच्या कडे पासून शिरेकडे पाने खाते. पानाच्या फक्त शिराच शिल्लक रहातात. पोन्ग्यात प्रादुर्भाव झाला असेल तर पान उघडल्यावर त्यावर रांगोळी प्रमाणे एका रेषेत भोके पडलेली दिसतात.


या किडीची भूक इतकी जास्त असते कि जर एका अळीच्या संपर्कात स्वजातीय दुसरी अळी आली तर बलाढ्य अळी कमजोर अळीला खावून टाकते त्यामुळे एका झाडावर/तोट्यावर आपल्याला फक्त एक अळी दिसली तर धोका कमी आहे असे समजू नका!

या किडीचे चे पतंग रात्रीच्या वेळी कार्यरत असतात त्यामुळे आपल्या दृषित सहजपणे सापडणार नाहीत. मक्या हा कामगंध सापळा किडीच्या नराला आकर्षून घेवून अडकवून ठेवतो त्यामुळे दिवसा फेरफटका मारल्यावर आपल्याला किडीचे पतंग अडकलेले दिसून पडतील व कीड आली आहे हे कळेल. शेतात फिरून आपण किडीने पाने खाल्ली आहे का हे पुढील ७-८ दिवस नियमित बघायला हवे व आपणाला पानांवर खुणा आढळून आल्यास कीड नियंत्रणा साठी क्मोबो कीटकनाशक प्रकर्षाने वापरावे.

या किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथाॅक्झाम (१२.६ टक्के) + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) झेड सी हे कोम्बो कीट नाशक ४ मिली प्रती १५ लिटर या दराने शिफारस करण्यात आलेले आहे. 

 त्या व्यतिरिक्त खाली दिलेली कीटकनाशके देखील आपण वापरू शकता.

   • लॅबडा-सायहॅलोथ्रीन (५ ई सी) १५ मि.लि. प्रति १५ लिटर
   • क्लोरॲन्ट्रानिलीप्लोर (१८.५ टक्के एस.सी.) ४.५ मिली प्रती १५ लिटर
   • नोमुरिया रिलेयी (जैविक कीटकनाशक) ६० ग्रॅम प्रति १५ लिटर

  डोस

  आवश्यकते नुसार ६ ते १२ सापळे प्रती एकर लावावेत. 

  Customer Reviews

  Based on 1 review Write a review