पाटील बायोटेकच्या "फार्म एक्स्चेंज" कार्यक्रमात सामील व्हा!

मायक्रोडील सुपरमिक्स 33% ऑफ
 10 Sold

मायक्रोडील सुपरमिक्स 33% ऑफ

Vendor
Patil Biotech Pvt Ltd
Regular price
Rs. 310.00
Sale price
Rs. 207.00
Quantity must be 1 or more

या ऑफर मध्ये मायक्रोडील सुपरमिक्स १ किलो, 500 ग्राम व २५० ग्रामच्या  खरेदीवर ३३% सूट देण्यात येत आहे. मायक्रोडील सुपरमिक्स पोस्टाने घरपोच पाठवण्यात येईल.
सूक्ष्म अन्नद्रव्ये फार कमी प्रमाणात पिकांना लागत असली तरी त्यांपैकी प्रत्येकाची पिकाच्या वाढीसाठी जरुरी असते. यांपैकी एखाद्या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी झाले अगर वाढले तर त्याचा पिकाच्या वाढीवर वाईट परिणाम होऊन पिकाचे उत्पादन घटते. पूर्वी आपण शेतात दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, निरनिराळ्या पेंडी, बोनमील भरपूर वापरत होतो. या सेंद्रिय खतांत सूक्ष्म अन्नद्रव्ये असल्याने त्यांचा जमिनीस आपोआप पुरवठा होत असे. याशिवाय जमीन पड ठेवणे, पिकांची फेरपालट करणे यामुळेही जमिनीत असणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण पूर्वीच्या काळी कमी होत नसे. परंतु गेल्या २०-२५ वर्षात अधिक उत्पादन देणाऱ्या, संकरीत जातींच्या पिकांची लागवड करीत आहोत. तसेच पाणीपुरवठ्याची सोय वाढल्यामुळे एकाच शेतातून वर्षातून दोन-तीन पिके घेऊ लागलो. नत्र, स्पुरद व पालाशयुक्त रासायनीक खते देऊ लागलो. सेंद्रिय खते कमी वापरू लागलो. या सर्वांचा परिणाम म्हणजे आपल्या जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी झाले. त्याचा पिकावर वाईट परिणाम दिसू लागला. भरगोस प्रमाणात नत्र, स्पूरद, पालाश, कॅलशियम, मॅग्नेशियम, गंधक खते देवूनही उत्पादन घटू लागले. सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता असल्यास असे घडू शकते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
हि बाब लक्षात घेवून पाटील बायोटेक ने “मायक्रोडील” हि उत्पादन शृंखला बाजारात आणली आहे. या शृंखलेत अनेक उत्पादने असून त्यांचा योग्य वेळी वापर केल्याने उत्पादनात वाढ होऊ शकते. अनेकवेळेला पिकावरील चट्टे-पट्टे-डाग बघून आपल्याला वाटते कि पिकाला कोणता रोग झालेला आहे? बुरशी-जीवाणू-व्हायरस जन्य रोग असावा असा आपण कयास लावतो, प्रत्यक्षात मात्र त्या पिकास सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झालेली असते. महागडी औषधी फवारण्या पेक्षा मायक्रोडील आपली चांगली मदत करू शकते. 

चिलेटेड मायक्रोडील सुपर मिक्स मरा ग्रेड २ हे एक सहा सूक्ष्मअन्नद्रव्यांचे मिश्रण आहे ज्यात जस्त ३%, लोह २.५%, मंगल १ %, तांबा १%, बोरोन ०.५% व् मोलाब्द ०.१ % आहे. महाराष्ट्राच्या कृषी विभागाने राज्यातील पिकांच्या अभ्यासाच्या आधारावर या ग्रेड च्या फवारणीची शिफारस केली आहे. प्रत्येक पिकास वाढीच्या काळात केव्हा ना केव्हा, कोणत्या ना कोणत्या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता जाणवते. एका सूक्ष्मअन्नद्रव्याची कमी झाली के अन्य सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते याला को-डेफिसिअन्सी म्हटले जाते. त्यामुळे वैज्ञानिकांनी सूक्ष्मअन्नद्रव्य मिश्रण वापरायची सूचना केली आहे. कमीत कमी मात्रेत याचा अधिक चांगला फायदा दिसून येतो व मातीतील इतर सूक्ष्मअन्नद्रव्यांचे देखील शोषण होते. याच्या फवारणी ने पिकाची वाढ जोमाततर होतेच शिवाय रोग प्रतिकार क्षमता देखील विकसित होते.

मायक्रोडील सुपर मिक्स पूर्णपणे चिलेटेड स्वरूपात असल्याने १००% पाण्यात विरघळते, लगेच लागू होते, साध्या मिश्रणाच्या अनेक पट अधिक शक्तिशाली असल्याने कमी मात्रेत अधिक लाभ देते.

सेंद्रिय व रासायनिक अश्या दोघी प्रकारच्या शेतीमध्ये याचा उपयोग नक्की करावा. 

डोस: ०.५ ग्राम प्रती लिटर, विकासकाळात दोनदा पुनरावृत्ती करावी.

 बँकेच्या माध्यमातून पेमेंट करण्यसाठी आमच्या बँक खात्याची माहिती खलील प्रमाणे आहे

Patil BIotech PVT LTD. Bank Details, Axis Bank Ltd. Jalgaon A/c. NO.914020056268133 IFSC CODE:- UTIB0000174 PAN NO. AABCP2040F
आपण बँकेच्या माध्यमातून पेमेंट केल्यास, त्याची माहिती आपल्या पत्यासाहित ९७६४३३६३३३ या मोबाईलवर एसएमएस किंवा व्हाटसअप च्या माध्यमातून पाठवावी. 

टीप: आमच्या उत्पादनाची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी व हे उत्पादन त्यांना लगेच उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून आम्ही या ऑनलाईन ऑफर द्वारा भरगोस सूट देत आहोत. हि ऑफर कुठल्याही कृषी केंद्रात उपलब्ध होऊ शकणार नाही याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. पण आमची सर्व दर्जेदार उत्पादने महाराष्ट्रातील २००० पेक्षा अधिक कृषीकेंद्रात उपलब्ध आहेत, त्यांचा पत्ता मिळवण्यासाठी आमच्या सोशल ग्रुपला जॉईन व्हा किंवा पुढे दिलेल्या नंबर वारस संपर्क साधा खान्देश  7507775355  विदर्भ  9049986411  मराठवाडा  8554983444  पश्चिम महाराष्ट्र  7507775359