cotton

कापूस म्हटलेकी

पाटील बायोटेक तंत्रज्ञान!

फोलीबीऑन - संकटमोचक आहे!

फोलीबीऑन आजच  जवळच्या कृषीकेंद्रात  विचारा

कापसाच्या भरीव पोषणासाठी

आपण किती खते देता, किती खर्च करता हे महत्वाचे नाही! 

पिकाचे पोषण चांगले होणे महत्वाचे आहे. 

अमृत प्लस आळवणी कीट - भूसुधार करते - पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवते. यामुळे मृदेत उपलब्ध नत्र, स्पुरद, पालाश, सूक्ष्मअन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात. 

खतमात्रेच्या संतुलनासाठी अवश्य वापरा एकरी एक कीट

लागवडीनंतर लगेच, २५-४५ व ६५ दिवसांनी करा आळवणी.

ऑनलाईन खरेदी केल्यास घरपोच येईल. सध्या ऑफर देखील आहे. 

रसशोषक किडी ठेवा नियंत्रणात

शेतात फेरफटका मारून निरीक्षण केले तरी अनेक किडी नजरेत येत नाहीत कारण त्या एकतर लपून बसलेल्या असतात किंवा निशाचर असतात. अश्या वेळी शेतात चिकट सापळे लावून ठेवले तर या किडी सापळ्यावर चिटकून बसतात व आपल्या निरीक्षणात सहज उमटून पडतात. 

चिकट सापळे वापरून किडीचा जोर कमी असतांनाच आपण कीडनियंत्रणाचे योग्य नियोजन करू शकतो. 

एकरी १४ पिवळे व ६ निळे चिकट सापळे लावावीत. 

आमच्या चिकट सापळ्यावरील गोंद 

    • उन्हात सुकत नाहीत, टपकत नाही
    • पावसात विरघळत नाही 

ऑनलाईन खरेदी करा, घरपोच मिळवा.

शास्त्रीयदृष्ट्या अचूक मार्गदर्शन मिळवा

शेतकऱ्यास योग्य तांत्रिक मार्गदर्शन केले तर तो अधिक चांगले नियोजन-व्यस्थापन व अर्थार्जन करू शकतो. आम्ही सेंद्रिय शेतीसाठी उत्तम मार्गदर्शन करतो. आमच्या तज्ञांशी संपर्क साधण्यासाठी आमचा फोर्म भरा. 

इथे क्लिक करून आपण आमचा फॉर्म भरू शकता


मला चांगले मार्गदर्शन मिळाले

मी अनेक वर्षापासून पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून कपाशीचे भरगोस उत्पादन घेत आहे. आपणही असे करू शकता.

आमच्या फेसबुक पेजला भेट द्या, लाईक करा आणि शेअर देखील करा

बीटी तंत्रज्ञानातील सकारात्मकता


सुरवातीपासून टीकाकारांचा एक वर्ग बीटी तंत्रज्ञानाच्या विरोधात उभा होताच. या तंत्रज्ञानाचे अनाकलनीय धोके आहेत असे ते मानत. दीर्घकाळात मित्र/शिकारी कीटकावर याचे दुष्परिणाम होतील असे त्यांना वाटायचे. त्यांच्या या वैचारिक थाटनितून त्यांनी बीटी तंत्रज्ञानाचा दुराग्रही व आक्रमक विरोध केला. माझ्या दृष्टिकोनातून या बूनबुडाच्या विरोधकांनी शेतकऱ्याचे एका प्रकारे अपरिमित नुकसान केले. त्यांच्या आक्रमकतेमुळे इतर पिकातील बीटी तंत्रज्ञान भारतात  येवू शकले नाही. आपण काळाच्या मागे पडलो...पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुलाबी बोंडअळीचा सापळा

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरवातीला फुलावर असतो. त्यामुळे फुले पूर्ण उमलत नाहीत. ती अर्धवट उमललेल्या अवस्थेत गळून पडतात. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरते व हे छिद्र बंद होते. कोवळ्या बोंडातील सर्वच भाग ती खाऊन टाकते, तर जुन्या बोंडातील ३-४ बिया ही अळी खाते. एका बोंडामध्ये एकापेक्षा जास्त अळ्या असू शकतात. अळीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ६० ते ९० दिवसांनी येतो. 

पिंक्या काय आहे?

पिंक्या हा एक कामगंध सापळा असून यात गुलाबी (शेंदरी) बोंडअळी चे नर प्रौढ आकर्षित होऊन मरतात. पिंक्याच्या मदतीने आपल्या शेतात गुलाबी बोंड अळी आली आहे कि नाही हे शेतकऱ्यास कळू शकते व त्यानुसार तो फवारणी चे नियोजन करू शकतो. 

चिलेटेड - झिंक

जर उभ्या पिकात झिंक कमतरतेची खाली दिलेली लक्षणे आढळली तर लगेच मायक्रोडील झिंक चीलेटेडची फवारणी करावी. 

  1. फळझाडांना पाने कमी लागतात व झाडांची वाढ खुंटते

  2. गहू या पिकात पानांवर कथिया रंगाचे डाग पडतात

  3. मका या पिकामध्ये पानाचा अर्धा भाग पांढरा होतो. कणसांमध्ये दाणे भरत नाहीत

चिलेटेड लोह

जर उभ्या पिकात लोह कमतरतेची खाली दिलेली लक्षणे आढळली तर लगेच मायक्रोडील लोह चिलेटेडची फवारणी करावी.

झाडांच्या/पिकाच्या वरच्या भागाची पाने पिवळी पडतात

फळझाडांच्या पाने व शिरांमध्ये पिवळेपणा     येतो

विशेषतः शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो ४. झाडांची वाढ खुंटते.


चिलेटेड मिश्रण

चिलेटेड मायक्रोडील सुपर मिक्स मरा ग्रेड २ हे एक सहा सूक्ष्मअन्नद्रव्यांचे मिश्रण आहे 

यात

जस्त ३%, लोह २.५%

मंगल १ %, तांबा १%

बोरोन ०.५% व् मोलाब्द ०.१ % 

यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या ग्रेडच्या फवारणीची शिफारस केली आहे.

कापसाचे सुरवातीचे नियोजन 

मित्रहो, अनेक शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेवून पाटील बायोटेकचे कापूस नियोजन तीन भागात देत असून पहिला भाग २० व्या दिवसाच्या नियोजना पर्यंत चा आहे. आपण याचा नक्की लाभ घ्यावा.

२१ ते ४५ दिवसाचे नियोजन

या काळात आपल्या शेतात यलो व ब्ल्यू स्टिकी ट्रॅप लावल्याने येणाऱ्या किडीची वर्दी मिळेल व त्यानुसार कीटकनाशक निवडता येतील.

४० दिवसा नंतरचे नियोजन

या काळात कापसाचे पिक परिपक्व होणार असल्याने, होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यायचे आहे. वाढीच्या वेगवेगळ्या टप्यात येणारे रोग व किडी हे देखील वेगवेगळे असतात, त्यानुसार बदल करणे आवश्यक असते.