आमच्या सोशल गृप चे सदस्य हण्यासाठी इथे क्लिक करा!

आमच्या डीलरनेटवर्कमध्ये सामील व्हा

पाटील बायोटेक प्रा. ली. हि एक वेगाने वाढणारी कंपनी असून, आम्ही कृषी उपयोगीतेची एक विस्तृत उत्पादन शृंखला उपलब्ध करून देत आहोत. आमच्या उत्पादन शृंखलेत वाटर सोल्युबल खते, दुय्यम खते, सूक्ष्मअन्नद्रव्ये, भूसुधारक, प्रतीजैविके, चिकटसापळे, कामगंध सापळे, जैविक कीटकनाशके, बियाणे अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे. 

हि सर्व उत्पादने दर्जेदार व किफायती तर आहेतच शिवाय मार्केटिंगला सोपी जावीत म्हणून आकर्षक पद्धतीच्या डिझाईन व पॅकिंग मध्ये उपलब्ध करून दिली जातात. आमची उत्पादने आधुनिक कृषी पद्धतीला साजेशी असून सेंद्रिय शेती साठी उपयुक्त आहेत. हि उत्पादने पर्यावरण पूरक आहेत शिवाय शाश्वत शेतीसाठी फायद्याची देखील आहेत. 

आम्ही फक्त उत्पादने देत नाही तर शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष शेतात, कार्यशाळेत, कॉलसेंटर द्वारे, ब्लॉग व युट्युब द्वारे सातत्याने तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत असतो. प्रत्येक पिकाची सखोल  माहिती तर दिलीच जाते शिवाय शेतकरी वेळोवेळी योग्य ती कृती हाती घेतो आहे कि नाही याचा पाठपुरावा देखील केला जातो. जनजागृतीच्या  सातत्यपूर्ण कार्यामुळे आमची उत्पादने हतोहात विक्री होतात. आज आमची उत्पादने २००० पेक्षा अधिक कृषीकेंद्रातून विक्री होत असून याच्या माध्यमातून अनेकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे.

जर आपण मातीशी जुळलेले, शेती बद्दल जाण राखणारे व शेतकऱ्याची सेवा करण्यास तयार असाल तर आमच्याशी जुळू शकतात. आमच्या उत्पादनांच्या प्रचार, प्रसार, वितरणातून आपण फक्त देशसेवाच नाही तर स्वत:साठी चांगला रोजगार निर्माण करू शकता. आपले व कुटुंबाचे स्वप्न साकार करू शकता.